Link copied!
Sign in / Sign up
17
Shares

घरगुती उपाय काही साध्या समस्यांवर

घरातच तुमचे मेडिकल आहे आणि तुम्ही स्वतः डॉक्टर आहात. हो खरंच. घरगुती उपाय म्हणजे होम रेमेडीज. घरात खूप काही नॅचरल पदार्थ असतात की, त्यांच्या उपयोगाने समस्या सोडविता येते. आणि ह्या समस्या खूप मोठ्या नसतात की, त्यासाठी डॉक्टरांकडे जावे. आणि स्वतःचे पाकीट खाली करून घ्यायचे. तेव्हा ह्या साध्या व सोप्या उपायांनी ह्या समस्या सोडवा.

१) केसात कोंडा असल्यास आंबट दही किंवा ताकात मुलतानी माती मिसळून केसांच्या मुळांना मसाज करा. काही वेळ झाल्यावर केस धुवा.  

जर तुम्हाला स्थूलपणा कमी करायचा आहे तर रोज गरम पाणी प्या. गरम पाण्यात गोमूत्राचा अर्क घालून प्यायल्याने महिन्याभरात २ किलो वजन घटेल. 

२) दररोज एक ग्लास ताकात लवणभास्कर किंवा हिंग्वाष्टक चूर्ण घालून प्या. अपचनाची समस्या व मलावरोधाची समस्या दूर होईल. 

५० ग्रॅम त्रिकटू चूर्ण, १० ग्रॅम प्रवाळ पिष्टी किंवा गोदंती भस्म एकत्र करून ठेवा. आर्धा ग्रॅम मधासोबत सकाळ-संध्याकाळ घ्या.ज्या स्त्रियांना थायरॉइडचा त्रास असेल  त्यांना मदत होईल.

३) टायफॉइड झाल्यास ८-१० मनुका, ४-५ अंजीर आणि १-२ ग्रॅम खुबकळा (मोहरीच्या दाण्यांसारख्या) वाटून त्याची चटणी सकाळ-संध्याकाळ खा.

४) मधुमेह कमी करण्यासाठी रात्री २५ ते ३० मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी सकाळी प्या आणि भिजलेले मेथीचे दाणे चावून खा.

५) दररोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या, आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.

६) दररोज गरम पाणी आणि निंबू व मध हे पिण्याची सवय करा, नैसर्गिकरित्या वजन कमी होते. कोरफडचा गर चेहऱ्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon