Link copied!
Sign in / Sign up
11
Shares

घरच्या घरीच तुमचा स्वतःचा पूर्णतः नैसर्गिक हेअर कंडिशनर बनवा....हो सोपंय ...एकदा वाचून बघा

          केसांसाठीचा एक वाईट दिवस हा अतिशय नैराश्यपूर्ण आणि त्रासदायक ठरु शकतो. अशा वेळी अनियंत्रित कुरळे केस, खराब झालेला केसांचा पोत, विभाजित टोके, केसांचा गुंता, कोरडेपणा आणि त्यांचे तुटणे हे नेहमीचेच आहे. परंतु एक चांगला कंडिशनर फायद्याचा ठरु शकतो; कारण तो तुमचे केस मुलायम बनवतो, कुरळेपणा नियंत्रित करतो आणि गुंत्यापासून तुमची सुटका करतो.

आजकाल प्रसिद्ध ब्रॅण्ड्सचे भरपूर उच्चप्रतीचे कंडिशनर्स उपलब्ध असतात; पण त्यांतील अनेक कंडिशनर्स हे तुमच्या केसांची निरोगी निगा राखण्यात कमी पडतात. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या केसांसाठीच्या हेअर केअर प्रोडक्ट्सची देखील बाजारात वानवा आहे.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला स्वतःसाठी कंडिशनर बनवता येत असेल, जो तुमच्या केसांसाठी परिपूर्ण असेल; तर? हे सत्य आहे की, घरगुती कंडिशनर्स हे बनवायला खूप सोपे असतात आणि खूप स्वस्तही पडतात. अजून काय? तर हे कंडिशनर्स जर योग्य प्रकारे बनवले, तर ते बाजारातील कंडिशनर्स इतकेच प्रभावी ठरतात! सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला कधीही असह्य रसायनांचा सामना करावा लागणार नाही. तुम्ही घरच्या घरीच तुमचा स्वतःचा हेअर कंडिशनर कसा बनवाल, हे पुढे वाचा:

अवोकॅडो आणि बनाना कंडिशनर

हा घरगुती कंडिशनर बोथट आणि खराब झालेल्या केसांसाठी परिपूर्ण आहे. यासाठी तुम्हाला केळी, अवोकॅडोज, अंडी, मध आणि जास्त शुद्ध असलेले ऑलिव्ह तेल यांची गरज पडेल. केळी तुमच्या केसांना पोषण देतात आणि त्यांना कुरळे होण्यापासून रोखतात; तर अवोकॅडोज केसांची वाढ व ओलसरपणा सुधारण्यास मदत करतात. ऑलिव्ह तेल तुमचे केस चमकदार आणि निरोगी राखतात आणि मध तुमच्या केसांमध्ये झळाळी आणि तेज आणते.

सर्वप्रथम अवोकॅडोची साल काढा आणि त्याचा लगदा बनवा. आता त्याच्यात अर्धे केळे आणि २ चमचे ऑलिव्ह तेल मिसळा. हे मिश्रण ब्लेंडरमध्ये ठेवा आणि त्यात एक अंडे एक चमचे मधासोबत मिसळा. आता हे मिश्रण नरम होईपर्यंत घुसळा. हा कंडिशनर तुम्ही तुमच्या केसांच्या वरच्या भागापासून सुरुवात करून, नंतर केसांच्या टोकांपर्यंत लावू शकता. हे तुमच्या टाळूवर न लावण्याची काळजी घ्या. ते धुण्याआधी योग्य त्या परिणामांसाठी १० मिनिटांसाठी केसांवर तसेच ठेवा.

व्हिनेगार कंडिशनर

हा कंडिशनर बनवायला तुम्हाला अंडी, ऑलिव्ह तेल, मध, व्हिनेगार आणि लिंबूचा रस यांची गरज पडेल. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये २-३ अंड्यांचे बलक घेऊन पूर्णपणे घुसळा. त्यात १०० मिली व्हिनेगार आणि लिंबूचा रस टाका आणि मिश्रण बनवा. आता २०० मिली ऑलिव्ह तेल हे २-३ चमचे मधाबरोबर टाका आणि हे मिश्रण ब्लेंडरमध्ये पूर्ण घट्ट लगदा होईपर्यंत घुसळा. हा कंडिशनर तुमच्या खराब झालेल्या केसांच्या टोकांना लावा आणि ते धुण्याआधी १०-१५ मिनिटे केसांवर तसेच ठेवा.

कोकोनट मिल्क आणि बदाम तेल कंडिशनर

जर तुमचे केस खूपच कोरडे झाले असतील, तर हा कंडिशनर तुमच्यासाठी खूपच लाभदायक आहे. यासाठी तुम्हाला मध, दूध, नारळाचे दूध (कोकोनट मिल्क), बदाम तेल आणि गुलाबजल यांची गरज लागेल. सर्वप्रथम वरील सर्व घटक एक-एक चमचा या प्रमाणात एका बाऊलमध्ये मिसळा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. यानंतर तुमचे केस धुतल्यानंतर हा कंडिशनर तुमच्या केसांवर थोड्या थोड्या प्रमाणात लावा आणि १५-२० मिनिटे तसेच राहू द्या. तुम्ही जास्त परिणाम साधण्यासाठी डोक्याभोवती टॉवेल गुंडाळू शकता किंवा शॉवर कॅप घालू शकता. आता तुम्ही हा कंडिशनर कोमट किंवा सौम्य पाण्याने धुवू शकता.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon