Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

घरात भांडणे होऊ नये या करता काय कराल ?

अनेक वेळा एकमेकांचे विचार न पटणे एकमेकांच्या वागण्या-बोलण्याने दुखावले जाणे, एकमेकांबद्दल गैरसमज करून घेणे अश्या अनेक गोष्टीमध्ये घरामध्ये जोडीदारा बरोबर भांडणे होत असतात. ही भांडणे होऊ नये म्हणून दोघांनी काही गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. किंवा काही गोष्टी टाळणे आवश्यक असते. ज्यामुळे घरात भांडणे होणार नाही.

१. प्रएकमेकांना प्रत्युत्तर देऊ नका.

एक व्यक्ती रागानं बोलत असते, तेव्हा दुसऱ्यानं शांतपणे ऐकून घेतलं तर वाद टाळता येतो. तुम्ही कितीही चिडला असाल तरी प्रत्युत्तर देण्याचं टाळा.. वादात कोण जिंकलं यापेक्षा घरातील शांती टिकवणं महत्त्वाचं आहे हे कायम लक्षात असू द्या.

     २. एकमेकांच्या भावना समजून घ्या.

कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता, सहनशीलतेनं आपण जोडीदाराचं बोलणं ऐकून घेतलं तर त्याचा राग कमी होईल आणि घरातली शांतात टिकून राहील याची काळजी घ्या. एकमेकां दोषी ठरवण्यापेक्षा एकमेकांच्या भावना समजून घ्या. एखाद्याचं बोलणं तुमच्या मनाला लागलं असेल तर, तो मुद्दामून बोलला आहे /बोलली आहे असं समजू नका. मन दुखावल्यामुळं किंवा रागाच्या भरात नाही-नाही ते बोलून गेला असावा. त्यामुळे त्याबाबत त्याला /तील समजून घ्यावे.

 

३. शांत राहा आणि मनावर ताबा ठेवा

शांत राहण्यासाठी आपला राग शांत करण्यासाठी तिथून निघून जाणं कधी-कधी योग्य ठरते. स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या खोलीत किंवा घराबाहेर कुठंतरी जाऊ शकता. असं केल्याने तुम्ही ती परिस्थितीला घाबरून टाळत नसता तर दोघांना शांत होण्यासाठी वेळ देत असता.

४. काय बोलणार आणि कसं बोलणार याचा नीट विचार करा.

तुम्ही आपल्या जोडीदाराला टोचेल असं काही बोलणार असाल तर अशानं परिस्थिती आणखी बिघडेल. यापेक्षा त्याच्या दुखऱ्या मनाला फुंकर घालता येईल असं काहीतरी बोला. त्यानं कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे सांगण्यापेक्षा, प्रेमानं त्याला झाल्या प्रसंगाबद्दल विचारा आणि त्यानं सांगितलेल्या गोष्टींबद्दल किंवा दिलेल्या सल्ल्याबद्दल त्याचे आभार माना.

५. काही झाले तरी एकमेकांवर आवाज चढवू नका

कितीही राग आला असला तरी, टोचून बोलणे आणि आवाज चढवणे टाळा किंवा अपमानास्पद बोलण्याचं टाळा. आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांची मने दुखवू नका असे आरोप करू नका कारण यामुळं एकमेकांचं मन दुखावू शकतं. यापेक्षा “तुम्ही जेव्हा असं. एकमेकांवर हात उचलणं हे चुकीचे आहे.

६. लगेच क्षमा मागा आणि मार्ग काढा

तुम्ही एकमेकांबरोबर भांडता तेव्हा दोघंही हरता पण शांती टिकवून ठेवता तेव्हा दोघांचाही विजय होतो. नात्यासाठी आणि घरातील शांतात टिकवून ठेवण्यासाठी क्षमा मागणे कमी पणाचे नाहीतर समजूतदारपणाचे लक्षण आहे. भांडण वाढविण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल याला प्राधान्य द्या 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon