Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

घरातल्या स्वच्छतेवर तुम्ही आनंदी व्हाल ! हो

आवडते खाद्यपदार्थ, शॉपिंग, सेक्स यापेक्षा वेगळे काहीतरी असे म्हणजे ‘स्वच्छ आणि चमचमते घर’ यामध्ये अनेक लोकांचा आनंद सामावलेला असतो. घरात फरशीवर किंवा पलंगावर पडलेले खेळणे, मळलेले पडदे, खुर्चीवर टाकलेले कपडे या सर्वांचा अशा लोकांना त्रास होतो. त्यांच्या मनाची शांती एका नीटनेटक्या आणि पद्धतशीर घरात सामावलेली असते.

घरात पसारा असेल किंवा धूळ असेल तर अशा लोकांचा संताप होतो. ते जास्तीचा वेळ काढून घर साफ करतात जोपर्यंत ते चमचमत नाही ! तुम्हीपण यापैकीच असाल आणि तुम्हाला स्वच्छतेची आवड असेल तर आमच्या या शोर्टकट टिप्स नक्कीच तुमच्या कामाला येतील.

१)  प्रत्येक रूम ‘रेडी’ ठेवा

एकाच वेळी पूर्ण घर आवरणे जरा अवघड काम आहे. सगळ्या घरातला पसारा आणि इकडे तिकडे पडलेल्या वस्तू एकाच वेळी आवरणे म्हणजे वेळ खूप लागतो. त्यापेक्षा तुम्ही दररोज तुमच्या खोलीसाठी ५ मिनिटे जास्तीची दिलीत कधीही उत्तम.! यासाठी दररोज तुमच्या खोलीतून कामासाठी बाहेर जातांना तुम्हाला तुमची खोली लगेच आवरून घेऊन वस्तू जागच्या जागी ठेवायच्या आहेत. कधी कधी कप टेबलावर आणि चावी पलंगावर राहून जाते आणि यात आपल्याला खूप काही पसारा असल्यासारखे वाटत नाही पण वस्तू जागच्या जागी नसतील तर नंतर झालेल्या पसाऱ्यात त्या हरवतात आणि आपल्या लक्षात देखील येत नाही. हा ५ मिनिटे जास्तीचे देण्याचा नियम पाळा आणि आठवड्यातून एकदा सगळे घर आवरण्याचा तुमचा भार वाचवा. तुमचा वेळही वाचेल आणि वेळेवर वस्तूही सापडतील.

२)  कमी समान म्हणजे कमी पसारा

तुमचे संपूर्ण घर रोज खालून वरपर्यंत आवरणे म्हणजे वेळ आणि उर्जा दोन्हीचा वापर होणार. यापेक्षा जर तुम्ही तुमच्या खोलीत कमी आणि महत्वाचे समान ठेवलेत तर गोष्टी सोप्या होतील. ज्या वस्तू महत्वाच्या आहेत आणि ज्यांची तुम्हाला रोज गरज आहे अशाच वस्तू खोलीत ठेवा. अशाने त्यांचा योग्य सांभाळ तुमच्याकडून होईल आणि स्वच्छता देखील राखली जाईल. ज्या वस्तू तुम्हाला लागत नाहीत किंवा ज्या अनावश्यक आहेत त्यांचा साठा खोलीत करून ठेवल्याने आवरतांना अजून वेळ वाया जाईल. गरजेच्याच वस्तू विकत घ्या. तुम्हाला कशाची गरज आहे आणि कशाची नाही याचं वर्गीकरण करून ठेवा.. इमेल असो कि पलंगावर पडलेले खेळणे, साचत गेले कि त्या गोष्टीच त्रासाच होतो. तेंव्हा नको असलेल्या वस्तू आत्ताच स्टोअर रूम मध्ये जाऊ देत.

३) आत्ताच सुरुवात करा

घर अवरातांना कुठून सुरुवात करावी असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडत असेल. छोटी छोटी गोष्ट आवारात बसल्यास वेळ लागू शकतो आणि नंतर कंटाळा देखील येणे साहजिक आहे. अशावेळी जी जागा तुम्हाला सर्वात जास्त पसारा असलेली वाटते तिथून सुरुवात करा. जे समोर आहे ते आवरा. या गोष्टीत कंटाळा केल्याने काम पुढेच ढकलले जाते. तुमच्या घरातली जी जागा लगेच दृष्टीस पडते अशा ठिकाणी सुरवात करा. घर आवरणे ही गोष्ट जादूच्या काडीने फिरवून होत नाही. खास करून जेंव्हा तुमच्या मनाची शांती त्या नीटनेटकेपणात दडलेली असते तेंव्हा तुम्हालाच आलास झटकून कामाला लागावे लागते.

४)  स्वच्छता करण्याचा नियमितपणा

घर कायम तुमच्या मनासारखे आणि नीटनेटके ठेवण्यासाठी रोज आवारा-आवर करणे गरजेचे आहे. सुट्टीच्या दिवशी एकदाच सगळा दिवस ह्यात घालवण्यापेक्षा रोजचा झाडू मारणे, सकाळी वस्तू जागच्या जागी ठेवणे, वरवरची धूळ झटकणे अशी कामे तुम्ही करू शकता. अगदी रोज काना-कोपरा साफ करण्याची गरज नाही. ते काम तुम्ही सुट्टीच्या दिवशी करा. रोजच्या रोज झटपट घर आवरले गेले कि तुमचे मन देखील प्रसन्न राहते आणि नीटनेटकेपणा सुद्धा राहतो. अशा वातावरणात फ्रेश वाटते आणि उर्जा मिळते. तुम्ही हा नियमितपणा आणलात तर तुमची बरीच कामे सहज होतील.

या टिप्स तुम्ही अमलात आणल्यात तर तुमचे घर तुम्हाला पुन्हा कधी पसारा भरलेले वाटणार नाही. हा एक शोर्टकट आहे. तुमच्या आवडत्या जागेत मोकळेपणाने आणि शांत मनाने रहा ! 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon