Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

अशी करा मोड आलेल्या गव्हाची उसळ


आपण विविध मोड आलेल्या कडधान्याची उसळ नेहमी करत असतो आज आपण मोड आलेल्या गव्हाची उसळ करणार आहोत.

साहित्य (३ ते ४ जणांसाठी)

१.  मोड आलेले गहू ३ ते ४ कप (इतर उसळीचा अंदाजाप्रमाणे)

२. मसाला 

३. लाल तिखट वा मिरच्या

५. मीठ

६. चवीपुरता गूळ आणि  चिंच किंवा आमसूल 

७.  फोडणीचे साहित्य तेल हिंग, जिरे वा मोहरी, हळद 

८) वरून घेण्यासाठी ओले खोबरे, लिंबू, कोथिंबीर वगैरे

गव्हाला मोड कसे आणाल 

गव्हाला कडधान्याप्रमाणेच मोड काढता येतात. फक्त थोडा वेळ लागतो.   गहू ते साध्या पाण्यात २० ते २४ तास भिजत घालावेत. बाकी इतर कडधान्यप्रमाणेच 

१) कूकरमधे तेलाची फोडणी करून त्यात कांदा परता आवडत असल्यास कढीपत्ता टाका 

२) मग मोड आलेले गहू टाका, मसाले व मीठ घाला, दोन कप पाणी टाका.

३) कूकरचे झाकण लावून प्रेशर येऊ द्या व त्यानंतर गहू १० ते १२ मिनिटे शिजवा.

४) कूकर थंड झाला की उघडा, चिंच किंवा आमसूल व गूळ टाका आणि आवडीनुसार पाणी कमी-जास्त आटवून घ्या.

५) वरून ओले खोबरे व कोथिंबीर घ्या, लिंबू पिळा.




Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon