Link copied!
Sign in / Sign up
769
Shares

गरोदरपणात पतीकडून या गोष्टी अपेक्षित असतात

गरोदरपण ही गोष्ट फक्त आई आणि बाळापुरती मर्यादित नसते. हो, आई नक्कीच बाळाला ९ महिने पोटात सांभाळते पण बाळाचे बाबा देखील ह्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. आता तुम्हाला नक्कीच असं वाटत असेल की वडिलांची यात  काय महत्त्वाची भूमिका असू शकते? पत्नीचा आधार बनण्याशिवाय अजून अनेक अशा छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही तिचा हा काळ सुसह्य करू शकता.


१. तिला समजून घ्या.

तुमची पत्नी ह्या काळात संप्रेरकांच्या अनेक प्रकारच्या बदलांमधून जात असते. त्यामुळे स्वभावात बदल होणे, काही काळासाठी तिचे मूड बदलणे सहाजिक आहे. तिला तुमच्या आधी आवडणाऱ्या गोष्टी आता पण आवडत असतील किंवा तिचे आवडते पदार्थ आता ती खाईलच असं नाही. तिला लागणारे डोहाळे पुरावा, तिच्यात अनेक बदल होणार आहेत त्यांना आनंदाने आणि समंजसपणे सामोरे जा .

२. सहनशील राहा .

तिचे बदलणारे मूड आणि तिचे स्वभाव बदल ह्यांना सांभाळण्यात तुमची कसोटी आहे. तिला काय हवे आहे, काय खावेसे वाटते आहे ह्याची चौकशी करा. तिचे वागणे हे तिच्यात होणाऱ्या बदलांशी निगडीत आहे हे समजून घ्या आणि तिच्यासमोर न चिडता सहनशील रहा.

३. तिच्याजवळ रहा.

हा असा  काळ असतो  ज्यात तिच्यात अनेक शारीरिक बदल होत असतात. तिला आपण पूर्वीसारखे आकर्षक आहोत असे वाटेलच असं नाही. इथेच तिची तुमच्याबद्दलची असुरक्षितता वाढू शकते. अशावेळी तिला ती सुंदर असल्याची नेहमीप्रमाणे जाणीव करून दया. तिचे सगळे हट्ट पुरवा आणि तिला तुमच्या प्रेमाची जाणीव करून दया.

४. तिच्या इतर शाररिक गरजांना देखील प्राधान्य  द्या

हा एक खूप मोठा गैरसमज आहे की गरोदरपणात स्रीला  शारीरिक संबंधांची इच्छा नसते. उलट या काळात प्रणय इच्छा वाढते. तिच्या या गरजा वाढतात त्यांना देखील प्राधान्य दया. तिच्याशी प्रेमाने वागा.

५. तिला धीर दया.

पत्नीला या काळात धीर देणे अतिशय महत्वाचे आहे. गरोदरपणात काही गोष्टींनी खचायला होते, अशावेळी तुम्ही धीर देण्यासाठी तिच्याजवळ असणे गरजेचे आहे. तीच तुम्हाला कशी आनंदी ठेवू शकते आणि ती कशी एक परिपूर्ण आई बनणार आहे अशा गोष्टी तिला प्रेमाने सांगा, ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. ह्या गोष्टींमुळे बराच फरक पडेल.

६. वेळापत्रक बनवा.

गरोदर स्रीला अनेक गोष्टींची धास्ती वाटत असते. एक जोडीदार म्हणून तुम्ही ह्यावेळी चिंता दूर सारण्यासाठी जवळ असणे गरजेचे असते. काही महत्वाच्या गोष्टी जसे की, स्त्रीरोगतज्ञाकडे नियमित जाऊन चेक-अप करून घेणे, गरजेच्या सर्व चाचण्या करून घेणे, बाळाच्या आगमनाची तयारी, व्यवस्था, त्यासाठी कपडे, त्याचे नाव ठरवणे अशा सर्व पायऱ्यांवर नियोजन करून, तिचे मत विचारून तिची साथ देणे तिची खूप मदत करून जाईल .

७. तिला मानसिक आधार दया.

शेवटी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ती प्रसूती वेदनेत असताना तिला आधार देणे. ती अशावेळी खूप त्रासातून जाते तेंव्हा तिचा धीर खचू नये म्हणून तिचा हात पकडून तिला आधार देणे आवश्यक आहे. कदाचित तिला प्रसुतीवेळी तुम्ही जवळ नको असाल किंवा तिला एखादे गाणेच ऐकायचे असेल, तर तिचं ऐका. पत्नीला पतीची साथ आयुष्यात प्रत्येक पायरीवर हवी असते,आणि गरोदरपणात तर आवर्जूनच. इथे ती एक नवीन जीव आपल्या शरीरात वाढवत असते म्हणून तुमची प्रेमळ साथ तिला निकडीची आणि हवीहवीशी वाटणारच.!          

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon