Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

गरोदरपण संबंधित डॉक्टर हे शब्द बऱ्याचदा वापरतात पण त्याचा नेमका अर्थ काय ?

कोणत्याही क्षेत्रातील व्यावसायिकांकडे त्या त्या क्षेत्रातील क्लिष्ट नामकरणांचा संच असतोच! आणि याला डॉक्टर्स नर्सेस आणि अन्य वैद्यकीय व्यावसायिक देखील अपवाद नाहीत. या सर्व वैद्यकीय संज्ञा पाहून तुम्हाला नक्कीच बावचळल्यासारखे वाटत असेल. म्हणून गरोदरपणात तुमचा हा ताण हलका करण्याकरता आम्ही येथे प्रचलित संज्ञा आणि त्यांच्या व्याख्या देत आहोत:

१. अबॉर्शन - Abortion

वैद्यकीय प्रक्रियेद्वारे किंवा विहित औषधांद्वारे बाळंतपणा रोखणे

२. ऍमनीओटिक फ्लुईड Amniotic fluid

गर्भाशयातील द्रव; ज्यामध्ये तुमच्या अर्भकाची वाढ होते.

३. ऍमनीओटिक सॅक Amniotic sac

तुमचे बाळ आणि ऍमनीओटिक फ्लुईडचा समावेश करणारी पिशवी

४. अनेस्थेटिक Anaesthetic

शरीराचा एक भाग वा पूर्ण शरीराची थोडीशी वा पूर्ण संवेदना गायब करणारे औषध

५.अँटिनाटल/ प्रिनाटल/ अँटिपार्टम 

Antenatal/Prenatal/Antepartum

म्हणजे जन्माअगोदर

६. अँटिपार्टम हॅमरेज - Antepartum haemorrhage

गरोदरपणात योनीतून रक्तस्त्राव होणे

७. बर्थ प्लॅन Birth plan

प्रसूतीवेदना आणि जन्माबाबत महिलेचा प्राधान्यक्रम असलेले लिखित कागदपत्र

८. ब्रॅक्स्टन हिक्स काँट्रॅक्शन/ फॉल्स लेबर 

Braxton Hicks Contractions/False Labo

गर्भाशयाचे आकुंचन होणे; जे प्रसूती वेळेचे आकुंचन वाटू शकते.

९. ब्रेकिंग ऑफ वॉटर Breaking of water

एका टोकदार उपकरणाने ऍमनीओटिक सॅक फोडणे. हे प्रसुतीला गती देण्यासाठी केले जाते.

१०. ब्रीच  Breech 

गर्भाशयात बाळाच्या डोक्याऐवजी त्याचे पाय खाली असण्याची स्थिती

११. सिझेरियन/ सी-सेक्शन Caesarean Section/C-Section

प्रसुतीची एक वैद्यकीय प्रक्रिया; ज्यामध्ये पोट आणि गर्भाशयात छेद केला जातो.

१२. सर्व्हिक्स Cervix

गर्भाशयाचा खालचा भाग जो अरुंद असतो. प्रसूतिवेदनेवेळी ते मृदू होते आणि उघडते. हे प्रसूतीमध्ये सहायता करते.

१३. कंसेप्शन/ फर्टिलायझेशन/ इम्प्रेग्नेशन/इन्सेमिनेशन 

Conception/Fertilisation/Impregnation/Insemination

वीर्य आणि अंडपेशीचे मीलन होऊन एक संयुक्त पेशी तयार होणे आणि त्यामुळे गरोदर होणे 

 

 १४. काँट्रॅक्शन Contraction

प्रसूतीवेळी गर्भाशयाचे तीव्र आणि वेदनादायक आकुंचन होणे

१५. क्राउनिंग Crowning

प्रसूतीमधील टप्पा ज्यामध्ये बाळाच्या डोक्याचा वरचा भाग बाह्य योनिमार्गामध्ये पोहोचतो.

१६. एक्टॉपिक प्रेग्नेंसी Ectopic pregnancy

गर्भाशयाबाहेर (विशेषतः फेलोपियन ट्यूबमध्ये) फलित अंड्याचे रोपण आणि वाढ करणे

१७. एम्ब्रायो Embryo

कंसेप्शनच्या टप्प्यापासून आठव्या आठवड्यापर्यंतचे फलित अंडे

१८. फर्टिलिटी Fertility

शिशुला जन्म देण्याची आणि गरोदरपणा पूर्ण होईपर्यंत वहन करण्याची क्षमता

१९. फर्स्ट ट्रायमेस्टर First trimester

गर्भारपणाचे पहिले 14 आठवडे

२०. फॉलिक ऍसिड Folic acid

बी-जीवनसत्वाचा स्त्रोत जे ॲनिमिया रोखते आणि जन्मावेळचे दोष कमी करण्यात मदत करते.

२१. फुल टर्म Full term

गरोदरपणाचा सामान्य काळ (साधारण 37 ते 42 आठवड्याचे जेस्टेशन)

२२.जेस्टेशन  Gestation

बाळ गर्भाशयात असण्याचा काळ (दिवस वा आठवड्यांमध्ये)

२३. जेस्टेशनल डायबेटीस  Gestational diabetes

गरोदरपणात होणारा मधुमेहाचा प्रकार. जेव्हा गरोदर स्त्रीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त असते; तेव्हा इन्सुलिनच्या अपुऱ्या प्रमाणामुळे हा मधुमेह होतो. हा रोग बरा होण्यासारखा असतो आणि बाळंतपणानंतर आपोआप गायब होतो.

२४. गायनाकॉलॉजिस्ट Gynaecologist

स्त्रीच्या आरोग्याविषयी विशेष प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर

२५. हॅमरेज Haemorrhage

अतिशय जास्त रक्तस्त्राव

२६. इन युटेरो In utero

गर्भाशयाच्या आत

२७. इंकॉन्टिनेन्स Incontinence

मूत्राशयाच्या वा आतड्यांच्या हालचाली नियंत्रित करण्याची असमर्थता

२८. इंड्युस्ड लेबर Induced labour

वैद्यकीय व्यावसायिक कृत्रिमरीत्या प्रसूतिवेदना चालू करू शकतात.

२९. लेबर Labour

बाळाला जन्म देताना स्त्रीचे शरीर ज्या अवस्थेतून जाते ती अवस्था

३०. मिडवाईफ Midwife

गरोदर स्त्रियांची बाळंतपण, प्रसुतीवेदना, जन्म आणि त्यानंतरची अवस्था यांमध्ये काळजी घेण्याचे प्रशिक्षण घेतलेली व्यक्ती

तुम्हाला आता कोणतीही माहिती मिळाली; तर ती समजून घेण्यासाठी आता सोपे मार्गदर्शक लाभले आहे. मग आता क्लिष्ट शब्दांमुळे घाबरून जायचे काहीही कारण नाही!

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon