Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

गरोदरपणात तोंड आल्यावर घरगुती उपाय

 

तुमचे जर गरोदरपणात तोंड आलेच तर काहीच खाता येत नाही. खाताना त्रास होतोच आणि त्यामुळे गरोदरपणात व्यवस्थित डायट करायला खूप अडचण येते. त्यामुळे बाळाच्याही पोषणात अडथळा येतो. त्यावेळी तुम्हाला गोळ्या घ्यायलाही अडचण येते. गरोदरपणात जास्त गोळ्या घेता येत नाही तेव्हा ह्यावर काही घरगुती उपाय करता येईल का ? तर हो तुम्हाला खूप साधे व सोपे उपाय करता येतील.

तोंड का येते ?

१) बऱ्याचदा जेवणात असंतुलित आहार घेतला जातो, पोट खराब असते, खूप वेळा तर गरम खाल्यामुळे तोंड पोळून निघते म्हणूनही तोंड येते, काही वेळा ऍलर्जी मुळेही होते.

२) काही वेळा दात व्यवस्थित न ठेवल्याने त्यात घाण अडकून त्यातून बॅक्टरीया हे तोंड येण्यास कारणीभूत ठरतात.

३) खूप ऍसिडिक पदार्थ खाणे, काही ऍलर्जीयुक्त पदार्थ खाणे.

४) आजारी पडल्यावर काही व्यक्तींचे तोंड हमखास येत असते.

५) काही वेळा तोंड यायला काही कारण लागत नाही येऊन जाते.

तोंड आल्यावर काय घरगुती उपाय करता येतील

* एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.

* तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या.

आपण खातो त्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.

खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात.

* लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.







Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon