Link copied!
Sign in / Sign up
26
Shares

गरोदरपणात अ‍ॅनिमियामुळे होणारा त्रास व थकवा

 

अ‍ॅनिमियामध्ये खूप अशक्तपणा  वाटतो. आपल्या शरीरात सर्व अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी प्रत्येक पेशीला पुरवला जाणारा ऑक्सिजन लाल रक्त पेशींमधून मिळतो. त्या लाल रक्त पेशीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे म्हणजेच अ‍ॅनिमिया. ह्या आजाराने आपल्या शरीरात काम करत असलेल्या पेशींना ऑक्सिजन कमी मिळत असतो. आणि त्यामुळे तुम्ही खूप थकून जाता.   

तुम्हाला अशक्तपणा जाणवतो म्हटल्यावर याचा त्रास तुम्हाला प्रसूतीदरम्यान होत असतो कारण डिलिव्हरीच्या वेळी खूप अशक्तपणा राहिल्यास आईच्या जीवाला धोका येऊ शकतो. तसे ‘अ‍ॅनिमिया जर एखाद्या स्त्रीला असेल तर तिच्या पोटातल्या बाळाचे वजन वाढत नाही, त्याची योग्यरित्या वाढही होत नाही.

 

अ‍ॅनिमिया हा काही वेळा दूषित पाणी व दूषित अन्नामुळेही होतो त्या पाण्यातील जंतूमुळेही होऊ शकतो. जर तुम्हाला खूपच थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला अ‍ॅनिमिया असेलच पण जर दररोजचज थकवा आणि अशक्तपणा वाटत असेल. काही काम केल्यावर लगेच थकवा येतोय असे वाटल्यावर तुम्ही रक्ताची तपासणी करून घ्या. त्याच्यातून हिमोग्लोबिन कमी आहे का तपासून घ्या.

यावरती उपाय आहेच तो तुम्ही करायला हवा. आहार खूप महत्वाचा आहे. आहारातून आवश्यक घटक मिळाल्यास ऍनिमिया होऊच शकत नाही. त्यासाठी

१) व्हिटॅमिनयुक्त खाणे

ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन क खूप प्रमाणात आहे. त्यांचा खाण्यात समावेश करावा. ह्या फळातील घटक तुमच्या शरीराला ऍनिमिया पासून सरंक्षित करतात. जमल्यास भाज्या विशिष्ट पद्धतीने शिजवून खायला हवे. लोखंडाच्या भांड्यांत जर तुम्ही स्वयंपाक करत असला तर तुम्हाला त्याच्यातून लोह मिळेलच.

२) आयरन डायट

लोहयुक्त खाण्यामुळे रक्त तर वाढतेच शिवाय हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. हिरव्या भाज्यांमध्ये खूप प्रमाणात लोह असते. काळसर असलेल्या  मनुका, अक्रोड, गूळ, अशा पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. नट्स, मसूर, अंडी, यांच्यातही लोहाचे प्रमाण जास्त असते. पण गरोदर स्त्रीसाठी हिरव्या पालेभाज्या योग्य आहेत.  वाढलेल्या वयानुसार बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळीत खूप रक्तस्त्राव होतो. मासिक पाळीत बाहेर पडणारे रक्त अशुद्ध असते म्हणून बाहेर पडतं चांगलेच आहे, त्यामुळे शरीर शुद्ध होतं. पण खूपच रक्तस्त्राव होत असेल तर त्यामुळे थकवा येऊ शकतो तेव्हा त्या संबंधी तपासणी करून घ्यावी.Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon