Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

गरोदरपणातील पाठदुखी (सायटिका पेन) आणि त्याचा कसा सामना करावा


गरोदरपणा हा स्त्रियांसाठी खूप विशेष काळ असतो आणि त्या त्याचा शक्य तितका आनंद घेण्याचा प्रयत्न करतात; कारण हा त्यांच्या छकुल्याकडे जाण्याचा प्रवास असतो. पण गरोदरपणा हा नेहमीच सुखद नसतो. त्याच्या स्वतःच्या काही समस्या असतातच! पुष्कळ गर्भवती स्त्रियांना गरोदर काळात अस्वस्थता वाटू लागते आणि त्याचा प्रमुख भाग दुखणी आणि वेदना हे असतात. पाठदुखी हा त्यातीलच एक सामान्य विकार असतो आणि पुष्कळ वेळा स्त्रिया सायटिका पेनने त्रस्त असतात जो त्यांच्या पाठीच्या खालच्या भागापासून पायांपर्यंत पसरतो. तुम्हालाही हा अनुभव येऊ शकतो; पण तो सामान्य विकार आहे म्हणून आपण तो भोगायलाच पाहिजे, असे थोडीच!

साइटिकाची लक्षणे

गरोदरपणातील सामान्य पाठदुखी आणि साइटिका यातील फरक म्हणजे साइटिका हा तुमच्या पाठीच्या खालच्या भागापासून चालू होतो आणि एका वा दोन्ही पायांपर्यंत जातो. तुमचे दुखणे तुम्ही कसे स्पष्ट करता; यावर डॉक्टर साइटिकाचे निदान करतात.

गरोदरपणात सायटिका कसा होतो?

पुष्कळ स्त्रियांना साइटिका हा त्यांच्या पाठीच्या खालच्या भागातील दुखण्याच्या रूपात होतो. साइटिका हा बाकी दुखण्यांपेक्षा वेगळा कसा? तर बाकी सामान्य पाठदुखी सारखा हा फक्त पाठीतच नसतो; तर तुमच्या पायांमध्ये देखील असतो. हे दुखणे पायांपासून पाठीपर्यंत पसरलेल्या साइटिक मज्जातंतूशी संबंधित असते.

गर्भारपणातील साइटिकाची लक्षणे ही स्नायूंमधील तणाव आणि अस्थिर सांध्यांमुळे निर्माण होऊ शकतात; तसेच ओटीपोटाच्या क्षेत्रातील स्नायूंच्या हार्मोन्सच्या बदलामुळे होणाऱ्या आकुंचन आणि प्रसरणानेही होऊ शकतात.

ही वेदना तुम्ही कशी रोखू शकता?

तुम्ही गर्भवती असताना कोणत्याही प्रकारे साइटिका रोखू शकत नाही. वास्तविकपणे साइटिकावर कोणताही रामबाण उपाय नाही; पण तुम्ही त्याची लक्षणे कमी करण्याकरता वा वेदना शमविण्याकरता काही गोष्टी करु शकता. त्या गोष्टी पुढीलप्रमाणे:

१. सोपा उपाय म्हणजे ज्या बाजूला दुखत आहे त्याच्या विरुद्ध कुशीवर झोपा. समजा जर तुम्हाला डाव्या बाजूस दुखत असेल; तर तुम्ही उजव्या कुशीवर झोपू शकता.

२.  वेदना रोखण्याकरता जास्त वेळ उभे राहणे आणि जड वस्तू उचलणे टाळा. जर तुम्हाला खूप जड वस्तू उचलायची असेल; तर बाकीच्यांची मदत घ्या.

३. साइटिकासाठी अनेक वेळा हिटिंग पॅड किंवा कोल्ड कंप्रेसचा वापर केला जातो आणि पुष्कळ स्त्रियांना वेदना रोखण्यासाठी याबाबत चांगला अनुभव आलेला आहे. ही कृती अनेक वेळा आणि जेव्हाही गरज असेल; तेव्हा करता येते. तथापि हिटिंग पॅड खूपच गरम नाहीत ना, याची दक्षता बाळगा.

४. कार्यक्षम राहणेदेखील महत्त्वाचे आहे. हलके व्यायाम जसे की स्ट्रेचिंग, योगा आणि पोहणे हे साइटिकापासून आराम देते वा दूर ठेवते.

५. जर दुखणे कालांतराने गंभीर झाले असेल; तर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणेच हिताचे ठरते.

६.  बसताना आणि उभे असतानाच्या तुमच्या स्थितीवर लक्ष ठेवा; कारण तुमच्या पाठीवर व मानेवर जास्त दाब देण्याने सायटिकाचा प्रभाव वाढू शकतो.

७.  हिल्स आणि तत्सम गैरसोयीची पादत्राणे वापरायचे टाळा. नेहमी तुम्हाला सोयीस्कर असलेली आणि तुमच्या पायांना आधार देणारी पादत्राणे वापरा.

स्वतःला आरामात ठेवा आणि तुमच्या शरीराला प्राधान्य द्या. स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. सायटिकाचा प्रभाव रोखण्यासाठी वरील टिप्स आणि ट्रिक्स अंगीकारा. तुमच्या साइटिकासाठी तुम्ही इतर काही मार्ग अवलंबला आहे का? तुम्हाला कोणता उपाय लागू पडला?

सूचना: ब्लॉगमध्ये दिली गेलेली माहिती ही संदर्भ उद्देशानेच दिलेली आहे. कृपया याला वैद्यकीय सल्ला मानू नका. तुमच्या आरोग्याविषयी कोणतीही शंका असेल; तर नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon