Link copied!
Sign in / Sign up
7
Shares

गरोदरपणातील रक्तक्षय (ऍनिमिया) म्हणजे काय ? आणि त्यामुळे गर्भावर हे परिणाम होऊ शकतात

गरोदरपणात बहुतांश स्त्रियांना रक्तक्षयाच्या म्हणजेच ऍनिमियाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. हे असे का होते हे जाणून घेणे महत्वाचे आणि गरजेचे आहे. रक्तक्षय हि समस्या मुख्यत्वे शरीरातील लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होते. सौम्य स्वरूपातील रक्तक्षय (ऍनिमिया) होणे सामान्य गोष्ट आहे. परंतु गंभीर स्वरूपातील ऍनिमियावर त्वरित उपचार होणे आवश्यक असते.

रक्तक्षयाचे  (ऍनिमियाचे) प्रकार 

-लोहाच्या कमतरतेमुळे होणारा रक्तक्षय हा इतर अवयवांना आणि उतींना ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेने होतो.

-फॉलेटच्या कमतरतेमुळे निर्माण होणारा ऍनिमिया हा ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. जे पालेभाज्या, हिरव्या भाज्यांमध्ये आढळते. फॉलिक ऍसिडच्या गोळ्या किंवा औषधे हा फॉलेटसाठीचे मानव निर्मित पर्याय आहेत

-ज्यावेळी गरोदरपणात महिला दुग्धजन्य पदार्थ अंडी आणि मांस याचे योग्य प्रमाण सेवन करत नाहीत,त्यावेळी जीवनसत्व ब-१२ची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे स्वस्थ आणि निरोगी लाल रक्तपेशी निर्माण होण्यास अडथळा येऊ शकतो.

रक्तक्षय (ऍनिमियाची) लक्षणे

ही समस्या लागोपाठ गरोदर राहिल्यामुळे तसेच एकापेक्षा जास्त मुल एकाच वेळी गर्भाशयात असतात त्यावेळी तसेच जास्त प्रमाण उलट्या होणाऱ्या महिलेला तसेच पोषक आहार न घेणाऱ्या महिलांना होण्याची शक्यता असते. ऍनिमिया असणाऱ्या महिलेला श्वास घेताना त्रास होणे, धाप लागणे, फार कमी कष्ट केल्यावर सुद्धा लगेच थकवा जाणवणे, निस्तेज आणि पांढरट ओठ त्वचा आणि नखे, छातीत धडधडणे, चेहरा पांढुरका दिसणे.

रक्तक्षयचे(ऍनिमियाचे) परिणाम

१. गरोदरपणात गंभीर प्रकारचा ऍनिमियामुळे प्रसुतीपश्चात येणाऱ्या नैराश्याची शक्यता वाढू शकते. जर या काळात ही परिस्थिती दीर्घकाळ राहिली तर आपल्याला रक्तसंक्रमण करावे लागण्याची शक्यता असते .

२. या समस्येमुळे बाळाच्या विकासात अडथळा निर्माण होऊन जन्मात काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. काहीवेळा बाळ वेळे आधीच जन्मला येऊ शकते किंवा कमी वजनाचे जन्माला येऊ शकते.

उपचार

तुम्हांला सर्वप्रथम हिमोग्लोबिनची पातळी तपासायला सांगण्यात येईल,ज्यावरून तुम्हांला हि समस्या आहे कि नाही याबाबत अंदाज घेण्यात येईल. जर तुम्हांला रक्तक्षयाची समस्या असेल तर तुम्हांला लोहयुक्त आणि जीवनसत्व बी-१२ किंवा फॉलिक ऍसिडची औषधे तुमच्या ऍनिमियाच्या प्रकारानुसार देण्यात येतील देण्यात येतील. तसेच तुम्हांला वेळोवेळी हिमोग्लोबिनची पातळीची तपासणी करण्यास सांगण्यात येईल. तसेच आहारात लोहयुक्त आणि फॉलिक ऍसिड युक्त पदार्थांचा समावेश करण्यास सांगण्यात येण्याची शक्यता असते. ड़ॉक्टर याबाबत तुमच्या समस्येच्या तीव्रतेनुसार  औषध उपचार पद्धती सुचवतात. अश्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मानाने काही उपाय करू नये. ते  तुमच्यासाठी आणि बाळासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon