Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

गरोदर असताना तिखट आणि मसालेदार खाल्यावर काय होते ?

आपण गर्भवती असताना ही एकमेव गोष्ट आहे जी तुमची अपराधीपणाची भावनेतून सुटका करते. तुम्ही एकट्या अशा आई नाही आहात की, जिला मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत आहे. काही विशिष्ट स्वादिष्ट सुगंध आणि अन्नपदार्थ आहेत की जे कोणत्याही गर्भवती आईला आवडतात. गर्भवती मातेला खाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. खाण्या-पिण्यातील वेडेपणाबाबबत दोष द्यायचाच असेल तर गर्भावस्थेत निर्माण होणाऱ्या संप्रेरकांना द्यावा.

आपल्या बहुतेक खाद्यपदार्थांमध्ये गोड, खारट, तुरट, कडू आणि आंबट चवी असतात. यात मजेदार भाग हा आहे की आपल्याला या सर्व प्रकारचे फ्लेवर्स एकाच वेळी एकत्रितपणे खाण्याची इच्छा होते.

बऱ्याच गर्भवती महिला मसालेदार आणि चमचमीत अन्नपदार्थ खातात. एका सर्वेक्षणानुसार हे स्पष्ट झाले आहे की, गर्भवती महिलांचे हे वागणे अभ्यासले आणि त्यांची ही वागणूक अतिशय सामान्य असून शरीराची या कमतरता भरून काढण्याची एक पद्धत आहे.

काही पारंपरिक गैरसमज असे आहेत की, गर्भधारणेदरम्यान मसालेदार पदार्थ खाल्ल्याने प्रसूती दरम्यान गुंतागुंत वाढते आणि मुदतपूर्व प्रसूतीकळा होण्याची शक्यता वाढते. तथापि, या गैरसमजाची वैधता सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत.

खरंतर संशोधनानुसार,गर्भवती असताना जितके जास्त विविध प्रकारचे फ्लेवर खाल तितकी त्या बाळाची भविष्यात चव विकसित होत जाते. थोडक्यात बाळाच्या वाढीच्या टप्प्यात हे चांगले असते. तर, मसालेदार अन्नाचे सेवन गर्भवती असताना त्याचा आपल्या बाळावर परिणाम होतो का ? या विषयी आणखी माहिती घेऊ.

यावर तज्ज्ञांचे काय मत आहे?

काही तज्ज्ञ म्हणतात की, मसालेदार पदार्थांचा गर्भावर परिणाम करत नाही. याचे कारण असे की, आपण जे काही खात आहात त्यापैकी काही लहान कण गर्भाशयातील द्रवात (अम्निओटिक द्रवपदार्थात) जातात. तुम्ही कार्बोहायड्रेटने समृद्ध अन्न खात असल्यास जे तुमच्या शरीरातील शर्कराचे प्रमाण वाढवू शकतात, आपल्या गर्भाशयात सक्रियपणे बाळापर्यंत नेते. अन्यथा, नियमित काहीही खाणे (मसालेदार पदार्थ सह) सामान्य आहे.

शिवाय, इतर देशांतील अनेक गर्भवती महिला मसालेदार अन्न खातात आणि तरीही बाळाला जन्म देतात आणि प्रत्येक ठिकाणी इतर लहान मुलांप्रमाणेच निरोगी होतात. परंतु, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेणे हे आरोग्यास हानिकारक असते आणि गर्भवती स्त्रियांनी त्यांच्या या खाण्याच्या सवयींकडे आणि त्या काय खात आहेत या कडे लक्ष द्यायला हवे. मसालेदार पदार्थांचा जरी आपल्या बाळाला थेट धोका नसला तरी भरपूर मसालेदार अन्नपदार्थ खाल तर आपल्या शरीरात अनेक बदल होऊ शकतात.

मसालेदार पदार्थ गर्भवती मातेच्या शरीरावर कसा प्रभाव टाकते

गर्भवती महिलेच्या आरोग्यावर त्याचा मध्यम परिणाम आहे. याचा प्रभाव कसा होतो त्याची निरीक्षणे खालील प्रमाणे

१.सकाळी उठल्यावर येणारा थकवा 

 गर्भवती असताना शरीर अतिशय नाजूक झालेले असते, विशेषतः सुगंध ज्ञान एकदम वाढते. म्हणूनच, आपल्या आहारातील मसाल्यांचा समावेश टाळा.

२. छतीत जळजळणे 

मसालेदार खाद्यपदार्थ खाल्ल्यास 'गॅस्ट्रोएफॉजल रिफ्लक्स' आजार होऊ शकत नाही, परंतु जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर यामुळे लक्षणे वाढू शकतात.

३. बद्धकोष्ठता किंवा पोट बिघडणे.

या काळात बद्धकोष्ठता आणि जुलाब हे दोन्ही प्रकार प्रकृतीच्या दृष्टीने त्रासदायक आणि गरोदरपणात समस्या निर्माण करणारे असतात. 

महत्वाचे  

आपल्या आवडीनिवडी आणि भुकेची तीव्रता कमी करण्यासाठी मध्यम प्रमाणात मसालेदार खाणे योग्य आहे. जर तुम्हाला एखादा मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर आधी थोड्या प्रमाणात तो चाखून बघा जर का तुमच्या शरीराला तो सोसवत असेल तर तो खा. परंतु हा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या! ते तुम्हाला मदत करण्यास आणि भविष्यात मार्गदर्शन करण्यास सक्षम असतील.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon