Link copied!
Sign in / Sign up
33
Shares

गरोदरपणात टाळायच्या सेक्स पोझिशन्स.

सर्वात आधी तुम्ही आई होणार आहात याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन! ही बातमी कळल्यानंतर तुम्हाला खूप आनंद झाला असेल. नव्या जीवाच्या आगमनासाठी तुम्ही आता सज्ज आहात. या काळात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ अगदी मन भरून खाऊ शकता. गरोदरपणा म्हटले की जशा जबाबदाऱ्या येतात तसे काही बंधने सुद्धा येतात. अनेकदा काम, जेवण, तुमची दिनचर्या यात तुम्हाला बदल करावा लागतो. काही पदार्थ खाण्यास या काळात बंदी असते.

अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की गरोदरपणात संभोग करणे चुकीचे आहे. तुमच्या गर्भात एक जीव वाढतो आहे याचा अर्थ तुम्ही या काळात कामसुखापासून दूर राहावे असा अजिबात होत नाही. या काळात बंधन एवढेच आहे की तुम्हाला सेक्स करतांना काही काळजी घ्यावी लागते.त्यासाठी तुम्ही एकदा डॉक्टरांशी बोलून घेणं आवश्यक आहे. काही  विशिष्ट पोझिशनमध्ये सेक्स करणे या काळात टाळावे कारण यामुळे बाळाला इजा होऊ शकते. तुमच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी आम्ही इथे काही टिप्स दिल्या आहेत.

१. पहिले त्रैमासिक

या पहिल्या ३ महिन्याच्या काळात जवळपास सगळ्या पोझिशन्स चालतात. बाळाची पूर्ण वाढ झालेली नसल्यामुळे इथे त्याला इजा होण्याचा प्रश्न येत नाही. फक्त सेक्स करतांना तुम्हाला जास्तीच्या वेदना होत नाहीयेत हे पहा. या काळात ओरल सेक्स अजिबात करू नका, कारण यामुळे एअर एमबॉलिझम चा धोका असतो जो तुम्ही आणि तुमच्या बाळासाठी अयोग्य आहे. 

अॅडव्हेन्चर पेक्षा तुमच्या कम्फर्टकडे जास्त लक्ष द्या

२. दुसरे त्रैमासिक .

आता तुम्ही गरोदरपणाच्या दुसरा त्रैमासिकात आला आहात तर तुमचे मिसकॅरेज होण्याच्या शक्यता खूप कमी आहेत. तुम्ही आता सेफ झोन मध्ये आहात. पण या काळात तुमच्या सेक्स पोझिशन्स वर बंधने येणार आहेत कारण तुम्हाला आता पाठीवरच झोपावे लागेल. मिशनरी पोझिशनमुळे तुमच्या बाळाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर ताण येतो.

तरीही तुम्ही डॉगी स्टाईल किंवा स्पुनिंग किंवा वूमन आॅन टाॅप अशा पोझिशन्स या काळात एन्जोय करू शकता. तुमच्या शेवटच्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात तुम्हाला पूर्ण पेनेट्रेशन सेक्स करता येणार नाही. तुम्हाला वेदना होत नसतील तर आता जे करत आहात त्याचा आनंद घ्या.

 

३. तिसरे त्रैमासिक

या शेवटच्या त्रैमासिकात तुमच्या सेक्स लाईफ वर अनेक बंधने येणार आहेत. तुमचे पोट आता खूप मोठे असल्यामुळे तुम्हाला आधीसारखा सेक्स करता येणे शक्य होणार नाही. सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे या काळात तुमच्या शरीराचे ऐका. जेंव्हा त्रास होत असेल किंवा वेदना होत असतील तर ते करू नका.

या काळात सुद्धा मिशनरी पोझिशन टाळावी कारण तुमच्या पाठीवर याचा खूप ताण पडतो. यासोबतच या त्रैमासिकात डीप पेनेट्रेशन टाळावे. तुमच्या पोटावर ताण येईल किंवा बाळाला इजा होईल अशी कोणतीही पोझिशन या काळात करू नका. नेहेमी तुमच्या कम्फर्टनुसार सेक्स करा. यात तुम्ही साईड स्पुनिंग चा पर्याय निवडू शकता, ज्यात तुमचे मोठे पोट देखील मधे येणार नाही.

तुम्ही आधीपासूनच सेक्स बद्दलच्या या सर्व टिप्स पाळत असाल तर तुम्ही तुमचे प्रेमाचे हे क्षण आनंदाने आणि चिंता न करता एन्जॉय करू शकता. तसेच याबाबत डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon