Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

स्तनाग्रे गडद का होतात

गर्भवती असताना त्या महिलेमध्ये विविध शाररिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात. सकाळी उठल्यानंतर येणाऱ्या थकव्यापासून ते स्तनांचा आकार बदलण्या पर्यंत. या जगात एका छोट्याशा जीवाचे स्वागत करणे खूप आव्हानात्मक आहे. गर्भवती असल्याचे एक लक्षण म्हणजे शाररिक बदलांची सुरवात विशेषतः स्तनाग्रांजवळील त्वचा गडद होऊ लागते. सर्व महिलांमध्ये जवळजवळ त्यांच्या गर्भधारणेच्या सहाव्या आठवड्यापासून हा बदल दिसतो.

ज्या महिला हे बदल बघून घाबरून जात असतील त्यांच्यासाठी या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंका आणि त्यावरील उपाय सुचविणारा एक मार्गदर्शन करणारा असा हा ब्लॉग आहे.

गर्भवती असताना स्तनाग्रे गडद का होतात?

गर्भवती असताना होणाऱ्या सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शाररिक आणि मानसिक बदलांमागे बदलती संप्रेरके आणि त्यांचे प्रमाण हे एकमेव कारण आहे.

हे तुम्हाला माहीत असेलच की, त्वचेचा रंगासाठी मेलेनिन रंगद्रव्य कारणीभूत असते. मेलेनिन जितके जास्त प्रमाणात असते तितका रंग जास्त गडद असतो. गर्भधारणेदरम्यान, एस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि एमएसएच किंवा मेलेनोसॅट स्टिम्युलेटिंग या संप्रेरकाच्या पातळीत वाढ होते. नावाप्रमाणे एमएसएच, मेलनोजेनेसिस या प्रक्रियेद्वारे, संश्लेषण आणि मेलेनिन रंगद्रव्य रिलीज करण्याच्या प्रक्रियेतमध्ये सहभागी आहे. एमएसएचच्या एका उच्च पातळीने मेलेनिनचे वाढते उत्पादन आणि त्यामुळे स्तनाग्रे गडद होतात. मेलॅनिनचे प्रमाण वाढल्यामुळे होणारे हायपरपिग्मेंटेशन आणि स्तनाग्रांचा रंग गडद होण्यासाठी कारणीभूत असलेले इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे वाढलेले प्रमाण देखील प्रमुख भूमिका बजावते.

गर्भवती असताना स्तनामध्ये होणारे आणखी काही बदल

गर्भधारणेच्या सहाव्या ते आठव्या आठवड्यात स्तन मोठे होतात.

स्तनांना उगाचच खाज येते, लाल दिसतात, ताण येतो, स्ट्रेच मार्क दिसतात.

बऱ्याच गर्भवती महिलांमध्ये नंतरच्या टप्प्यात, कॉलेस्ट्रॅम नावाचे स्त्राव स्त्रवतो. (गर्भधारणेदरम्यान स्तनपानासाठी येणारे पहिले दूध)स्तनाग्रांचा गडदपणा आणि इतर त्रास कसे हाताळाल

गर्भवती असताना स्तनाग्रे काळी किंवा गडद होतात हे सामान्य लक्षण आहे आणि तात्पुरते आहे लक्षात ठेवा. (बाळाचा जन्मानंतर यामध्ये लक्षणीय सुधारणा होते)

पुढील काही टिप्समुळे तुम्ही काळेपणा नियंत्रणाखाली ठेवू शकता.

तीव्र उन्हामध्ये स्तन नीट झाकून मग बाहेर पडावे. शक्यतो बाहेर पडू नये. खूपच महत्वाचे काम असल्यास दर्जेदार सनस्क्रीन लावून मगच बाहेर पडावे.

गर्भवती असताना विशिष्ट लोशनचा वापर फायदेशीर ठरू शकतो, त्यापूर्वी नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे गर्भवती असताना कोणतेही दुष्परिणाम किंवा अत्यंत गुंतागुंत टाळता येते.

 तुमच्या मनावर असलेला तणाव तुमचे संप्रेरकांचे प्रमाण असंतुलीत करू शकतो. परिस्थिती आणखी गुंतागुंतीची करतो. आपल्या गर्भधारणेचा पूर्ण आनंद घ्या. आराम करणे सोपे असतो. निरोगी व पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्याने भविष्यातील नुकसान टळते.

निरुपद्रवी असले तरी, गडदपणा बरोबर ताप येणे, स्तनाग्रातून रक्तस्त्राव होणे, स्तनांमध्ये तीव्र वेदना, यासारख्या गोष्टी देखील होऊ शकतात, असे झाल्यास, वेळेचे अपव्यय न करता तत्काळ आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon