Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

गरोदरपणात होणाऱ्या डिहायड्रेशन विषयी हे माहिती करून घ्या

डिहायड्रेशन ही जगात सर्वत्र आढळणारी सामान्य समस्या आहे. यात शरीर पिलेले पाणी शोषून घेण्यापेक्षा जास्त बाहेर टाकते. यामुळे शारीरिक कार्यांच्या उर्जेसाठी लागणारे पाणी कमी पडते. डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता होणे, यातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये चक्कर येणे, थकवा येणे, खूप तहान लागणे, लघवीला कमी लागणे आणि स्नायूंमधील कमजोरी इत्यादी लक्षणे दिसतात.

गरोदरपणात डिहायड्रेशन होणे म्हणजे काय? एखाद्या गरोदर स्त्रीला या काळात पाण्याची भरपूर गरज असते. शरीराच्या कार्यांसाठी आणि गरोदरपणाशी संबंधित शारीरिक क्रियांसाठी पाणी लागते ते पुरेसे मिळायला हवे. त्यामुळे या काळात योग्य ती काळजी घेऊन डिहायड्रेशन टाळायला हवे.

हे कसे करावे?
लक्षणे 

सर्वात आधी तुम्हाला डिहायड्रेशन समस्या आहे की नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे यासाठी याची काही लक्षणे आम्ही खाली दिलेली आहेत.

१. खूप तहान लागणे आणि तोंड कोरडे पडणे.

२. लघवीचा रंग गडद पिवळा असणे.

३.  लघवीला कमी वेळा लागणे.

४. शरीराची उष्णता वाढणे.

५. बद्दकोष्ठ.

६. आळस आणि थकवा.

७. चक्कर येणे आणि लक्ष न लागणे.

८. डोकेदुखी.

९. मळमळ ( कोरड्या उलट्या होत आहेत त्या व्यतिरिक्त)

कारणे 

डिहायड्रेशन शरीराने पाण्याचा वापर कमी करून जास्त पाणी बाहेर टाकल्यामुळे होते. हा असमतोल अनेक कारणांमुळे घडतो.

१. पुरेसे पाणी न पिणे.

२.  डायरिया होणे.

३. सतत उलट्या होणे.

४. गरजेपुरते पाणी न पिता उष्ण वातावरणात जास्त काळापर्यंत राहणे/ व्यायाम करणे.

५. ताप येणे.

६.  गरमीमुळे किंवा दमट हवामानामुळे खूप घाम येणे.

७.विमानातून प्र सतत वास करणे. (जर तुम्ही जास्त काळासाठी विमानातून प्रवास करणार असाल तरच तुम्हाला डिहायड्रेशन चा त्रास उद्भवतो.)

डिहायड्रेशन चे परिणाम 

याचे परिणाम तुमच्यावर तसेच तुमच्या बाळाच्या आरोग्यावर खाली दिलेल्या प्रमाणात होऊ शकतात.

आईवर होणारे परिणाम

डिहायड्रेशन मुळे मळमळ होते आणि मळमळ झाल्यामुळे तुम्ही पाणी पिणे नाकारता. हे चक्र सुरु होते. पाण्याच्या कमतरतेमुळे मळमळ होते आणि त्याचमुळे अजून पाणी पिणे अवघड होऊन बसते. यामुळे तुम्हाला पेटके किंवा कळा येऊ लागतात. यांना ब्राक्सटोन हिक्स कॉन्ट्रॅकशन असेही म्हणतात.

गर्भावस्थेतील बाळ.

गर्भ पिशवीतील द्रवला समान ठेवण्यासाठी आईने पाणी पिण्याची अत्यंत आवशक्यता असते. डिहायड्रेशन मुळे या गर्भातील द्रवाची कमतरता पडल्यास बाळाच्या वाढ आणि विकासावर परिणाम होतो. बाळाच्या शारीरिक वाढीत यामुळे फरक पडू शकतो आणि खास करून त्याच्या किडनीच्या विकासात दोष उत्पन्न होऊ शकतो. काही वेळा बाळाच्या न्यूरल ट्यूब मध्ये देखील दोष आढळून येऊ शकतात.

काही परिणाम जे आई आणि बाळ या दोघांवर विपरीत ठरू शकतात ते म्हणजे मुदतपूर्व प्रसूती किंवा गर्भपात.

उपचार 

शरीराला परत पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

१. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन घ्या.

२. दिवसभरातून थोडे थोडे करून पाणी प्या.

३. एकाचवेळी खूप पाणी न पिता घोट घोट पाणी पिल्याने शरीरातील साखर आणि मीठ विरघळून जाणार नाही.

४. फळांचा रस किंवा डीकॅफीनेटेड चहा किंवा कॉफी पिल्याने फायदा होईल.

जर डिहायड्रेशन खूप झाले असेल तर तत्काळ तुमच्या डॉक्टरांना कळवा कारण तुम्हाला आईव्ही सोल्युशनची गरज असू शकते.

काळजी

सर्वांकडून या समस्येसाठी सुचवण्यात येणारा उपाय म्हणजे काळजी करण्यापेक्षा काळजी घ्या. काळजी घेण्यासाठी इथे काही टिप्स दिल्या आहेत.

१. दररोज ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. जर तुम्हाला हे काम अवघड वाटत असेल तर तुम्ही पाण्याला फ्लेवर देऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे लिंबू सरबत, मध - अदरक अशा चवींमध्ये द्रव पदार्थ प्राशन करा.

२. खूप जास्त किंवा जास्त वेळपर्यंत व्यायाम करणे टाळा . कारण यामुळे घाम येऊन डिहायड्रेशन धोका वाढतो.

३.  पाण्याचे प्रमाण जास्त असलेले अन्न घ्या( फळे, भाज्या, सूप ) आणि फळांचा रस प्या. ( फळांच्या रसामधून साखरेचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे ह्याचे प्रमाण योग्य तितकेच ठेवा)

४. कोणत्याही द्रवामधून कॅफेन घेणे टाळा. कारण यामुळे लघवी लागते आणि तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

५.  गरमी मध्ये किंवा दमट वातावरणात जास्त काळ घालवणे टाळा.

६. शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. 

लक्षात असू दया की डिहायड्रेशन केवळ तुम्हालाच नव्हे तर तुमच्या बाळावरही परिणाम करणार आहे. यामुळे तुमच्या स्तनातील दुधाचे प्रमाणही घटू शकते जे तुमच्या बाळावर जन्मानंतर देखील परिणाम करेल. याने बाळाला पुरेसे पोषण न मिळण्याचा धोका आहे. स्वतःला नेहमी हायड्रेटेड ठेवणे हे तितकेसे अवघड नाही जितके तुम्हाला वाटते आहे. तुमच्याजवळ पाण्याची एक बाटली नेहमी असू दया आणि दिवसभरात एक एक घोट पाणी पीत राहा. पाण्याची बाटली समोर असल्याने देखील तुम्हाला पाणी प्यावेसे वाटेल. डिहायड्रेशनवरील उपचार देण्यापेक्षा ते टाळणे जास्त सोपे आहे. जर तुम्हाला हा त्रास होत असेल तर तत्काळ तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्यात संकोच करू नका.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon