Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

गरोदर असताना गुप्तांगा जवळील केस काढणे कितपत योग्य आहे ?

गरोदरपणापूर्वी किंवा गरोदरपणानंतर लगेच गुप्तांगा जवळील केस काढणे हे योग्य कि अयोग्य हा वाद-विवादाचा मुद्दा आहे. अनेक हॉस्पिटल या काळात हे केस न काढण्याचा सल्ला देतात. पण काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे या काळात हे केस काढल्याने फायदा होतो. अश्या परस्परविरोधी विधानांमुळे अनेक स्त्रिया गोंधळून जातात. तुमचा हा गोंधळ थोडा कमी होण्यासाठी आम्ही या बाबत फायदे आणि तोटे दोन्ही तुम्हांला सांगणार आहोत.

प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर काही दिवस आधी वॅक्स किंवा कोणत्याही पद्धतीने गुप्तांगाजवळील केस काढू नये असा सल्ला देतात.कारण त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

फायदे

१. गुप्तांगा जवळील केस हे जिवाणूची वाढ होण्यास पोषक वातावरण निर्माण करत असतात. त्यामुळे याभागात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागातले केस काढून या भागाची स्वच्छता करणे आवश्यक असते. त्यामुळे जंतू संसर्ग टाळण्यासाठी य भागातले केस काढणे आवश्यक असते.

२. या भागातील केसांच्या वाढीमुळे जर जंतुसंसर्ग झाला तर हा जंतू संसर्ग बाळा पर्यंत पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे या भागातील केस काढल्यामुळे बाळाला संसर्ग होण्यापासून बचाव होऊ शकतो.

३. या भागतील केस काढले असतील तर तुमच्या स्त्रीरोगतज्ज्ञांना तपासणी करणे सोयीस्कर होईल. तसेच तापसण्यामध्ये वापरण्यात येणारे साहित्य योग्य पद्धतीने वापरता येईल.

४. या भागातील केस काढले किंवा ट्रिम केले तर घाम कमी होईल किंवा लगेच टिपला जाईल.

५. स्वच्छ आणि आणि केस काढलेलं असल्यामुळे प्रसूती दरम्यान आणि नंतर रक्तस्त्राव होत असताना स्वच्छता करताना सोईस्कर जाईल.

तोटे (Risks)

१. जर या काळात निर्जंतुक आणि पुनर्वापर न करता येणाऱ्या साहित्याचा केस काढण्याचा वापर केला नाही आणि स्वच्छता बाळगली नाही तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

२. वॅक्सिंग नंतर परत केसांची वाढ होताना जर त्या भागात कंड , खाज सुटली आणि खाजवत आले नाही तर ही गोष्ट खूप अस्वस्थ करणारी असते. आणि खाजवले तरी समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

३. योग्य पद्धतीने जर केस काढेल गेले नाही तर तिथे फोड किंवा काही इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आणि या फोडांमुळे त्या भागात वेदना जाणवण्याची शक्यता असते.

४. या तुम्हांला या काळात दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यावी लागण्याची शक्यता असते कारण पोटामुळे तुम्हांला त्या भागातले व्यवस्थित दिसणे अशक्य असते. त्यामुळे तुम्हांला योग्य तो अंदाज येत नाही.

या काळात जर गुप्तांगाजवळील केस काढायचे असतील तर

वॅक्सिंगमध्ये त्वचा जोरात ओढली जाऊन त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पर्यायाबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. शक्यतो हा पर्याय टाळलेले बरे. जर या आधी कोणत्या क्रीमचा वापर केला असेल नि त्या पासून काही त्रास झाला नसेल तर ते क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरा पण या काळात पोटाचा घेर वाढल्यामुळे तुम्हांला यासाठी कोणाची तरी मदत घावी लागण्याची शक्यता असते. यानंतर येणार इलेक्टॉनिक मशीनच्या शयन तुम्ही करू शकता पण ते नेहमी निर्जंतुक असावे आणि त्यामुळे कापणार नाही याची काळजी असावी तसेच पोटाच्या घेराची समस्या इथे देखील येण्याची शक्यता असते म्हणून या काळात तज्ज्ञ व्यक्तीकडून आणि डॉक्ट्रांच्या सल्ल्यानेच वॅक्सिंग किंवा शेविंग करावे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon