Link copied!
Sign in / Sign up
36
Shares

गरोदरपणाच्या शेवटच्या काही आठवड्यात निर्माण होणाऱ्या काही समस्या


गरोदरपणाचे आठ महिने पार पडल्यानंतर शेवटच्या काही आठवड्यात काही समस्या निर्माण होतात. तसेच हे काही आठवडे अनेक स्त्रियांना कंटाळवाणे जातात. या दरम्यान अनेक स्त्रियांना पुढील समस्या जाणवतात.

१. पाठ दुखणे.

आठव्या महिन्यांपर्यंत बाळाची बहुतांश प्रमाणत वाढ झालेली असते त्यामुळे पाठीच्या कण्यामध्ये मोठ्या प्रमाणात  बदल झाल्या-मुळे पाठीवर ताण येतो. आणि पाठ आणि  पाठीच्या खालच्या कमरेचा भाग दुखायला लागतो. याकाळात योग्य खुर्चीचा तसेच झोपायला योग्य पलंगाचा वापर करा. 

२. श्वास घेण्यास त्रास होणे.

शेवटच्या काही महिन्यांत पोटाचा आकार बराच वाढतो त्यामुळे फुफ्फुसांचा खालचा भागही दबला जातो. यामुळे बहुतेक स्त्रियांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो.  झोपल्यावर त्रास वाढतो. 

३. झोप न लागणे 

पोटाचा वाढता आकार, श्वास घ्यायला होणारा त्रास, बाळाची सतत होणारी हालचाल, वारंवार बाथरूमला जावे लाणे, अश्या अनेक कारणांमुळे रात्री नीट झोप न लागण्याची समस्या अनेक स्त्रियांना निर्माण होते. यासाठी एका अंगावर झोपण्याचा प्रयतन करा. दुपारच्या वेळात आराम खुर्चीत बसून आराम करा. या खुर्चीत बसताना,उठताना काळजी घ्या. 

४. मूळव्याधीचा त्रास होणे.

 या काळात स्त्रियांना मलावरोधचा त्रास होतो. तसेच शौच्याला जोर देखील करता येत नाही.  अश्यावेळी आहारात तंतूमय पदार्थांचे म्हणजेच भाज्या-आणि फळांचे सेवन करावे, तसेच योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. मसालेदार आणि पोटाला जड होतील असे पदार्थ न खाता. हलका आणि पाण्याचे योग्य प्रमाण असलेला आहार घ्यावा. 

५. ओटीपोटात आणि कमरेच्या हाडाजवळ दुखणे 

 बाळाचे डोके जर माकडहाडामध्ये घट्ट बसले असेल तर दुखू शकते.अश्या प्रकारच्या वेदना होण्याची शक्यता आहेत. 

६. पायावर सूज येण 

सगळ्याच महिलांच्या पायावर या काळात सूज येते. यासाठी जास्त नाही पण थोड्या प्रमाणात हालचाल करणे. तसेच व्हिटॅमिन्स व क्षार भरपूर प्रमाणात मिळतील असा आहार घेणे.

७. मानसिक गोंधळ 

या काळात बहुतांश सगळ्याच स्त्रियांच्या मनात किती त्रास होणार, सी-सेक्शन करावा लागणार का ? प्रसूती जवळ आली  कसं ओळखू अश्या अनेक प्रश्नांनी स्त्रियांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असतो. आणि जरा पहिलेच बाळंतपण असेल तर हा गोंधळ जास्त असतो. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon