Link copied!
Sign in / Sign up
21
Shares

गरोदरपणातील ही लक्षणे गरोदरपणातील समस्या दर्शवतात.


तुमचं छोटंसं बाळ पोटात असताना स्वतःची आणि बाळाची काळजी घेणे हे फार जिकरीचे काम असते. या काळात स्त्रीची परिस्थिती ही खूप नाजूक असते. त्यात बाळाच्या वाढीत समस्या निर्माण होऊ नये म्हणून देखील काळजी घेणे आवश्यक असते. बाळाला काही समस्या असतील किंवा त्याचा /तिच्या वाढीत काही अडथळा असले, तर ते जाणून घेणे तसे अवघड असते. या काळात डॉक्टरांशी सतत संपर्कात असणे आवश्यक असते. गरोदपणात पुढील काही लक्षणे गरोदपणात  निर्माण होणाऱ्या समस्या दर्शवतात.

१. हृदयाचे ठोके

जरी बाळाचे हृदयाचे ठोके हे ५ व्या आठवड्यात पडायला सुरवात होत असले तरी, आपण बाळाच्या हृदयाचा ठोका गर्भधारणेच्या १० व्या आठवड्यच्या आसपास डॉप्लर चाचणीच्या आधारे ऐकू शकतो. परंतु कधी-कधी हे ठोके योग्य प्रमाणात आणि योग्य गतीने पडत नाहीत, ही गोष्ट बाळाच्या वाढीतील समस्या दर्शवते. अश्यावेळी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपाय आणि उपचार करणे आवश्यक असते.

२. पेटके (क्रॉम्प्स )

गरोदर असताना पोटात आणि ओटीपोटा जवळ पेटके येणे ही सामान्य गोष्ट आहे. हे पेटके तुमची मासिकपाळी चालू असताना येतात त्याच प्रकारचे असतात. परंतु हे पेटके वारंवार आणि सतत यायला लागले तर आणि विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या त्रैमासिकात येणारे पेटके हे वेळेपूर्वी येणाऱ्या प्रसूती कळांचे लक्षण आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना याबाबत सांगा.

३.रक्तस्त्राव

गरोदरपणात योनीमार्गातून होणारा रक्तस्त्राव हा मुख्यतः गर्भपाताचे लक्षण असते. प्रत्येकवेळी होणारा रक्तस्त्राव हा गर्भपातचे लक्षण असेलच असे नाही. परंतु याबाबत दक्षता घेणे अवश्यक असते.या काळात योनीमार्गतून होणारा रक्तस्त्राव हा गरोदरपणतील समस्या दर्शवतो.

४. सततची पाठदुखी

गरोदर स्त्रीला गरोदरपणात पाठदुखीला एकदा तरी सामोरे जावे लागते. विशेषतः ज्यावेळी पोट दिसायला लागते आणि बाळाचे वजन जाणवायला लागते आणि पोटाचे आकारमान वाढायला लागते. अश्यावेळी त्यामुळे पाठीवर ताण येऊन पाठ दुखायला लागते. परंतु काही थोडा आराम केल्यावर हे दुखणे थांबते. परंतु सतत जर सहन न होणारी पाठदुखी झाल्यास पाठ का दुखत आहे हे डॉक्टरकडून जाणून घ्या. कारण अशी सहन न होणारी पाठदुखी ही मूत्रपिंड किंवा मूत्राशयाचा संसर्गाचे लक्षण असू शकते.

५. अनियमित योनीस्त्राव

योनीतुन होणारा सामान्य योनीस्त्राव हा रंगहीन आणि गंधहीन पांढरा किंवा पिवळसर छटा असणारा असतो. पण जर तीव्र गंध असलेला किंवा रक्तमिश्रीत योनीस्त्राव हा किंवा अनियमित योनीस्त्राव हे बाळा आणि आईला निर्माण झालेल्या समस्यासेचे लक्षण असू शकते. कदाचित गर्भशयाचे मुख वेळे आधी उघडण्याचे लक्षण असू शकते 

६. हालचाल न जाणवणे

गरोदरपणाच्या २० व्या आठवड्याच्या आसपास बाळ लाथ मारायला लागतं जाणवतील अश्या हालचाली करायला लागतं. याकाळात जर मध्येच बराच काळ काही हालचाल जाणवली नाही तर ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अश्यावेळी घाबरून जाऊ नका त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. कदाचित काळजी करण्यासारखे काही नसू शकते. परंतु या गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाहीत.

गरोदर स्त्रियांनी हे लक्षात असू द्या ही माहिती तुम्हांला घाबरवण्यासाठी नसून जागरूक करण्यासाठी आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon