Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

तुम्ही गरोदर आहात आणि विसराळु झाला आहात का ?


गर्भवती असणाऱ्या ५० ते ८० % स्त्रिया विसराळूपणा किंवा गोष्टी लक्षात न राहणाची तक्रार नोंदवतात. त्यांना एखाद्या गोष्टीवर नीट लक्ष केंद्रित करता येत नाही असे त्यांचे म्हणणे असते. या स्थितीस ‘ प्रेग्नेन्सी ब्रेन’ असे म्हणतात. गरोदरपणातील विसराळूपणास प्रोजेस्टेरोन आणि इस्ट्रोजन ही दोन संप्रेरके कारणीभूत असतात. या संप्रेरकांच्या पातळीतील अचानक झालेली वाढ तुमच्या लक्षात ठेवण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. यात झोपेची कमतरता आणि गरोदरपणात येणारा थकवा यांची भर पडल्यामुळे लक्ष केंद्रित करणेही सहज शक्य होत नाही. काही तज्ञांच्या मते गरोदरपणाच्या शेवटच्या त्रैमासिकात मेंदूच्या पेशींची घनता संकुचित होते तेंव्हा प्रेग्नेन्सी ब्रेनमुळे विसरभोळेपणा वाढतो. हे कायमसाठी नसते. प्रसुतीनंतर मेंदू पुर्ववत काम करायला लागतो त्यामुळे याविषयी चिंता न करता खालील काही गोष्टी करा ज्या तुम्हाला काही प्रमाणात मदत करतील.

३.गोंधळून जाऊ नका.

गडबडून जाणे आणि त्या गोष्टीचा ताण घेणे यात काहीच अर्थ नाहीये. तुमच्या विसरभोळेपणाला कारण आहे त्यामुळे शांत राहा. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करत राहा. एखादे पुस्तक वाचणे, गाणी ऐकणे किंवा तुमची आवडती डीश बनवणे अशा गोष्टीत स्वतःला रमवून घ्या . टेन्शन घेऊन आणि इतरांवर त्रागा करून काहीच साध्य होणार नाही. मन शांत ठेवण्यास प्रयत्न करा.


७. तयारी ठेवा.

गरोदरपणात किंवा नंतर तुमच्याकडून काही छोट्या मोठ्या चुका होऊ शकतात. यात काळजी करण्याचे कारण नाही. तुमचे बाळ आल्यानंतर त्या हुशार बाळाची हुशार आई तुम्ही होणारच आहात ! तुमचा मेंदू पूर्ववत होणार आहे. परंतु तत्पूर्वी काही लहान-सहान चूक तुमच्याकडून झाल्यास त्यांसाठी तयार रहा. तुमच्यातील हा बदल माहित असणे तुम्हाला उपयोगाचे ठरेल.   

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon