Link copied!
Sign in / Sign up
50
Shares

गरोदरपणात तुमची स्पेस आणि सासूबाई

 

गरोदर असताना तुमच्या सासूबाई  तुमच्या होणाऱ्या बाळाविषयी खूपच काळजी घेतात  का ?आणि त्यांना असेही वाटते का की, तुम्ही नवीन आई होण्याअगोदर बाळाच्याबाबतीत कोणतीच चूक करायला नको. आम्ही तुमची या बाबतीतची स्थिती समजू शकतो. खरं म्हणजे बऱ्याचदा तुमच्या सासू, तुम्ही पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्यात किती सक्षम आहात त्याची चाचपणी करत असतात. परंतु काही वेळा तुम्हाला ह्या गोष्टीचा थोडाफार रागही येत असेल. पुढील बाबतीत त्या तुमच्या स्पेसच्या आड येत आहेत असे तुम्हांला वाटत राहते.

 

१) खाणे-पथ्यबाबत बोलणे 

जर तुम्ही जर एखादा पदार्थ सासूबाईंना न विचारता खायला लागलात तर त्या  त्यावेळी खाण्याच्या पथ्याबाबत आठवण करून देतील . आणि त्या नेहमी विचारत असतात हे खाल्ले का ? ते खाल्ले का? हे तुझ्या बाळासाठी व तुझ्या आरोग्यासाठी पोषक आहे . असे सतत सांगत असतात  पण तुम्हाला त्या खाण्यातल्या गोष्टीची चव आवडत नाही. आणि सासू नेहमी त्या बाबत सांगत राहतात . सासूला अनुभव असतो म्हणून ती सांगते, पण ह्यामुळे तुम्ही चिडून जातात. व तुम्हाला कंटाळा येतो. यात सासूबाईंची काही चुकत नाही, त्या तुमच्या आरोग्यासाठीच सांगत असतात. तुम्ही तुम्हाला ज्यावेळी एखादा पदार्थ खावासा  वाटत नसेल तर त्यावेळी सासूबाईं  स्पष्टपणे आणि काळजीपूर्वक समजावून सांगत जा.

 

२)  पालकत्वाची जबाबदारीची जाणीव देत राहणे

सासूबाईं नेहमी त्यांच्या  मुलाच्या सुखरूप जन्माविषयी सांगून त्यांनी  कशी काळजी घेतली तेच ऐकवत असतात. तुम्हालाही पालकत्वाची तुमच्या पद्धतीने जबाबदारी पार पडायची असते. आणि सासूबाई  नेहमी तुमच्या नवऱ्याला म्हणजे त्यांचा  मुलाला कसे वाढवले त्यासाठी काय- काय केले, आणि तुम्हीही काय काळजी घ्यायला हवी, असे सांगत असतात . त्यामुळे तुम्ही चिडतात. ह्यासाठी शांतपणे त्यांच्याशी संभाषण करा. त्यांना  समजावा की, तुम्ही जरी पहिल्यांदा आई होणार असला तरी सर्व काही सांभाळू शकता, अशी खात्री त्यांना द्या. 

 

३) तुमच्या कामाविषयी तक्रार

 

तुम्ही नोकरीवर असता आणि प्रसूतीच्या सुरवातीला काम करू शकता व तुम्हाला तसे सोयिस्करही वाटत असते. पण तुमच्या सासूबाईचा त्याला विरोध असतो कारण त्यांना तुमची व बाळाची काळजी असते तेव्हा त्यावेळी तुम्हाला स्वतःचे कॅरियर पण महत्वाचे वाटते व सासूबाईंना दुखवायचे नसते. अश्यावेळी  नवऱ्याशी बोलून त्यांना सासूबाईना समजावयाला सांगा.

 

४) तुमच्या पाककृती

 

नेटवरून किंवा नवीन मातेच्या आहारासाठी तुम्ही पुस्तक घेतले व त्या पुस्तकामधून पाककृती करायला लागलात आणि त्यावेळी सासूबाई त्याबाबत सल्ला द्यायला लागल्या तर त्यांना तुमच्या पदार्थही कृती सांगा. त्यात जर काही बदल त्याने सुचवले आणि तब्बेतीसाठी योग्य असतील तर ते स्वीकार विरोधाला विरोध करू नका  शेवटी बाळाच्या आणि तुमच्या तब्बेतीचा प्रश्न आहे.

 

) तुमची स्पेस

खरं म्हणजे, तुमचे सासू - सासरे त्यांच्या नातवंडाबाबत खूपच प्रेमळ व हळवे असतात. ते त्यांच्या पद्धतीने नातवांना वाढवायला बघतात व तुम्हाला तुमच्या पद्धतीने त्यांना वाढवायचे असते. अशी समस्या काही पालकांना व काही कुटुंबात असते. अश्यावेळी सुवर्णमध्य गहूं निर्णय घ्यायला हवा. आणि हे होत असते कारण दोघांमध्ये एका पिढीचे अंतर असते. पण आजी आजोबाचाही प्रेम माया देखील महत्वाची असते व मुलांना आजी आजोबा हवे असतात . त्यामुळे त्या बाबतीत तुमची स्वतःची स्पेस आणि मुलांचे संगोपन यांच्यात मध्य शोधण्याचा प्रयत्न करावा

Click here for the best in baby advice
What do you think?
100%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon