बहुतांश स्त्रिया या गरोदर असताना संभोग करण्याचे टाळतात. बाळाला काही त्रास होईल या भीतीने स्त्रिया गरोदर असताना संभोगास नकार देतात. गरोदरपणात काळजीपूर्वक करण्यात येणारा संभोग हा बाळाला इजा पोहचवत नाही. गरोदरपणात संभोग करताना कोणती काळजी घ्यावी हे आपण पुढे पाहणार आहोत
१. गरोदरपणात काळजीपूर्वक केलेला संभोग हा सुरक्षित असतो.
गरोदर असताना काळजीपूर्वक केलेला संभोग सुरक्षित असतो. कदाचित तुमच्यातील बदलामुळे तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला या काळातील संभोगाचा वेगळंच अनुभव येऊ शकतो. परंतु गरोदर स्त्रीची तब्बते गरोदरपणात काही समस्या असल्यास याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
२. संभोगामुळे तुमच्या बाळाला कोणतंही हानी पोहचत नाही
संभोगामुळे गर्भाला काही हानी पोहचेल या भीतीने बरीच जोडपी या काळात संभोग करण्याचे टाळतात. बाळ बऱ्याच आवाराणमध्ये सुरक्षित असते. त्यामुळे संभोगामुळे बाळाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचत नाही. फक्त संभोग करताना. नेहेमीपेक्षा जास्त जागरूक असावे. आवेशाच्या भरात पत्नीला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच घाई गडबड कमी करून शांतपणे आनंद घेण्याचा प्रयन्त करावा.
३. संभोगाच्या पोझिशनबाबत जागरूक राहा.
या काळात संभोग करताना स्त्रीच्या पोटावर दाब येऊन चालत नाही. तसेच तुमच्या पोटावर वजनाचा भार आलेला देखील योग्य नसते. त्यामुळे याकाळात संबोग करताना स्त्रीच्या पोटावर दाब येणार नाही अशी पोझिशन असावी. आणि याबाबतीत कटाक्षाने जागरूक असावे. १५-२० आठवड्यांची गरोदर असताना करणे साधारण टाळावे.अन्यथा स्त्रीच्या पोटावर दाब पडणार नाही अश्या पोझिशनचा वापर करावा. तसेच काही पोझिशनच्या आधार तुम्ही गरोदरपणाचे सर्व महिने संभोगाचा आनंद घेऊ शकता.
४. निरोधचा वापर करा
या काळात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन टाळण्यासाठी निरोधचा वापर करावा. त्यासाठी कोणते निरोध योग्य ठरेल याची खात्री करून घ्यावी.
५. संभोगा नंतर होणार रक्तस्त्राव
या काळात संभोग करत असताना क्राम्प येणे शिव सामान्य बाब आहे. आहे परंतु जर या काळात संभोगानंतर स्त्रीला योनी मधून रक्तस्त्राव झाल्यास आणि तो तसाच सुरु राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधने आवश्यक असते.
गरोदरपणात संभोग हे जरी चुकीचे नसले तरी. प्रत्यके स्त्रीची शाररिक परिस्थिती वेगळी असते त्यामुळे संभोगाआधी तुमची शाररिक परिस्थिती, बाळाची वाढ याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. या काळात तुमच्यामुळे तुमचा जोडीदार दुखावला जात आहे अशी भावना याकाळात मनात ठेऊ नका. मुल हे दोघांचे आहे.आणि या सर्व काळातील परिस्थितीची कल्पना तुमच्या जोडीदाराला असल्यामुळे ते या काळात सर्व गोष्टी आपल्या बाळासाठी संयमाने घेतात त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही