Link copied!
Sign in / Sign up
13
Shares

गरोदरपणातला पोटाचा घेर ह्या कारणांनी वाढत असतो


तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही गरोदर आहात हे इतरांकडून तुमच्या पोटाच्या घेरावरूनच पहिल्यांदा ओळखले जाते. यात तुमचे गोंडस बाळ मस्त आराम करत असते. बाळाची लाथ किंवा हालचाल जाणवते का हे बघण्याची आतुरता सगळ्यांना असते त्यामुळे हे पोट दिसू लागले की सगळ्यांना तुमच्या पोटाला हात लाऊन बघण्याची इच्छा होते. कधी कधी अनोळखी व्यक्ती देखील तुमच्या पोटाच्या घेराकडे बघून एक छानशी स्माईल तुम्हाला देते, जणू काही आई होण्यासाठी त्या शुभेच्छा असतात. हा काळ सुखावह असतो कारण येणाऱ्या नवीन जीवासाठी सगळेच आनंदी असतात, अनोळखी व्यक्ती सुद्धा!

त्मच्या ओतचा हा घेर जर जास्त मोठा असेल किंवा छोटासा जरी असेल तरी याबाबतीत काळजी करण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या बाळासाठी यात काहीही चुकीचे नाहीये. हा घेर रत्येक आईचा वेगळा असतो. याच्या आकारात वेगळेपण अनेक कारणांमुळे येऊ शकते. याची कारणे आम्ही खाली दिली आहेत त्यावरून तुमच्या मनात काही भीती असेल तर ती आताच दूर करा.

१)  गर्भधारणेची वेळ

तुमच्या मैत्रिणीचे किंवा इतर कोणा स्त्रीचे पोट तुमच्यापेक्षा मोठे किंवा लहान असेल तर अजिबात त्याविषयी विचार करत बसू नका. गर्भधारणा कितवी आहे यावर पोटाचा घेर अवलंबून असतो. जर तुम्ही पहिल्यांदा आई होणार असाल तर हा घेर कमी दिसतो कारण त्यावेळी पोटातील स्नायू घट्ट असतात. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गर्भधारणेत पोटाचा घेर मोठा होतो कारण पोटातील स्नायूंचे प्रसरण होते आणि खिचाव कमी होतो. तुमच्या आधीच्या गर्भधारणेपेक्षा आता घेर वाढू शकतो.

२) बाळांची संख्या

जर तुमच्या पोटात २ गोंडस बाळ असतील तर अर्थातच तुमच्या पोटाचा घेर या दोन जीवांच्या योग्य विकासासाठी पोषक अशी जागा निर्माण करेल आणि तुमचे पोट मोठे दिसेल. दोघांना लागणारी जागा नक्कीच एकापेक्षा जास्त असणार तेंव्हा मैत्रिणींनो तुम्हाला एका ऐवजी दोन गिफ्ट्स मिळणार आहेत !

३)  बाळाच्या भोवती असणारे गर्भातील द्रव

बाळाच्या वाढीसाठी गर्भात पोषक वातावरणाची गरज असते. त्यांच्या शरीरातील अनावश्यक गोष्टी रक्तातून बाहेर काढल्या जातात आणि रक्तातूनच बाळासाठी पोषकद्रव्ये आईकडून दिली जातात. केवळ रक्तच नव्हे तर बाळाच्या आजूबाजूला असणारे गर्भातील द्रव देखील बाळाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते. बाळाच्या संरक्षणासाठी हे द्रव खूप महत्वाचे आहे. या द्रवाच्या पातळीमुळे देखील पोटाचा घेर बदलतो.

४) बाळाची स्थिती

कोणास माहित, कदाचित तुमच्या पोटात पुढचा माईकल जॅक्सन किंवा प्रभूदेवा वाढत असेल ! विनोदाचा भाग सोडला तर बाळाच्या गर्भातील स्थितीवर देखील पोटाचा घेर अवलंबून असतो. बलाने त्याची स्थिती बदलली की पोटाचा घेर बदलतो. तुमच्या हे एव्हाना लक्षात आले असेलच.

५)  आईचे शरीर

एक जबाबदार आई बाळासाठी सर्व काही करते. बाळाच्या योग्य विकासासाठी श्वसनाचे प्रकार, व्यायाम आणि उत्तम आहार घेणे हे त्या आईचे नियम असतात. व्यायाम केल्याने उर्जा तर मिळतेच पण सोबत शरीरचा एक उत्तम ढब कायम राहतो. थोडक्यात काय तर तुमची गरोदरपणात स्वतःला कसे ठेवता, आणि तुमच्या झोपण्याची स्थिती, चालण्याची पद्धत यावर पोटाचा घेर लहान किंवा मोठा ते ठरतो.

या काळात पोटाचा घेर किती आहे ही काळजी करण्याची गोष्ट नाहीच आहे. लहान, मोठे किंवा गोल पोट असले तरीही त्याचा काहीच संबंध नसतो. बाळ आतमध्ये व्यवस्थित वाढत असते. तुम्ही फक्त बाळाच्या विकासाची आणि तुमच्या उत्तम आहाराची काळजी घ्या. एक सुपर-मॉम बनण्यासाठी सज्ज व्हा !     

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon