Link copied!
Sign in / Sign up
5
Shares

गरोदरपणातील पाठदुखीची कारणे आणि प्रतिबंध

गर्भधारणा शाररिक,मानसिक असे बरेच आंतरिक बदलांना घेऊन येते. यासोबत आनंद, उत्साह, थोडी गोंधळाची, जाणीव करून देणारी भावना आहे. आई होण्याची स्वप्ने पाहणार्‍या सर्वजणींनाच या वेदनेतून जावे लागते. विशेषत: जेव्हा प्रसूती वेदना (लेबर पेन) आकुंचन होयला सुरवात होते. हे त्यांच्या प्रसूती वेदनांचा एक भाग असून यामध्ये हात-पाय, कपाळ,डोके,स्तन हे सर्व भाग दुखायला लागतात. गर्भवती महिलांना ज्या प्रसूती वेदनांना सामोरे जावे लागते त्यामध्ये प्रामुख्याने पाठदुखी असते.स्नायू आखडल्याने परत वेदना तीव्र होतात आणि आकुंचन अगदी कमी तीव्रतेने सुरू होते. या प्रसूती वेदना परत येतात.

पाठदुखी मागची कारणे 

 पाठदुखीचे मुख्य कारण म्हणजे गर्भातील बाळाची स्थिती. जेव्हा बाळाचे डोके खाली असते आणि तेव्हा डोके मणक्यावर स्थित असते. त्यावेळी आईच्या पाठीवर दबाव येतो. कधी-कधी गर्भात बाळाची स्तिथी तशी नसली तरी स्त्रियांना पाठदुखीचा त्रास होतो. ज्या महिलांची उंची कमी असते त्यांच्यामध्ये सामान्यपणे हे दुखणे आढळते. बाळ गर्भात असताना त्याला वाढीसाठी पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे सुद्धा अशी दुखणी उदभवतात. गर्भधारणे दरम्यान चुकीच्या स्थितीमुळे हे होऊ शकते. तुम्ही उभे राहिल्यानंतर कंबर पुढे करून गुडघे लॉक करून उभ्या राहील्यामुळे पाठदुखीच्या वेदना होऊ शकतात. हे आपल्या मणक्याचा शेवटचा भाग आणि माकड हाडाच्या स्थितीवर देखील अवलंबून असते. बहुतेक मातांचे ही हाडांची स्थितीं अतिशय मजबूत असते ज्याची त्यांना प्रसूती दरम्यान मदत होते. पूर्वी जर एखादी दुखापत झाली असेल, तर त्यामुळे सुद्धा हाडे दुखण्याची समस्या प्रसूती वेदनातील पाठदुखीसारखी वाटते.

पाठदुखी आणि प्रसूती दरम्यानच्या पाठदुखीमधील फरक 

 साधी पाठदुखी आणि प्रसूती दरम्यानच्या पाठदुखीमध्ये फरक असतो. प्रसूती दरम्यानची पाठदुखी ही खरंतर सातत्याने प्रसूती वेदना सुरू झाल्यावर होते. हे लवकर देखील सुरू होऊ शकते पण तसे दुर्मिळ आहे. पाठदुखीवर उपचार करणार्‍याची मदत घेऊन या दुखण्यापासून सुटका करून घेऊ शकता. दोनदा आकुंचन पावणार्‍यामध्ये जर तुम्हाला कळ येत असेल तर त्याला प्रसूती दरम्यानची पाठदुखी म्हणतात आणि त्यामधल्या काळत तुम्हाला बरे वाटते. जर तुमची पाठ एक सारखी दुखत असेल आणि मध्येच कळ येत नसेल तर त्याला प्रसूती दरम्यानची पाठदुखी म्हणता येणार नाही.

पाठदुखीपासून कशी मुक्तता मिळवाल यासाठी टिप्स 

१. नेहमी बसताना ताठ बसावे, कशाला तरी टेकून बसावे.

२. नेहमी व्यवस्थित आधार घेऊन आणि सरळ उभे राहण्याची सवय लावून घ्या.

३. आपल्या बाळाच्या स्थितीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करा.

४.  गर्भधारणे दरम्यान आपल्या पाठीला बळकट करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने सराव करा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon