Link copied!
Sign in / Sign up
131
Shares

गरोदरपणात दुखणारे ओटीपोट

 

जर गरोदरपणात तुमचे ओटीपोट दुखत असेल तर तुम्ही एकट्या नाही आहात. जवळपास ८३% गरोदर महिला ओटीपोटाचे दुखणे अनुभवतात, खास करून शेवटच्या त्रैमासिकात जेंव्हा ओटीपोटावरील दाब हा सर्वात जास्त असतो. यास पेल्व्हिक गिरडल पैन (PGP)  असे म्हणतात. हे दुखणे अजून त्रासदायक होते जेंव्हा सुरवातीच्या कळा सुरु होतात. (बाळ तुमच्या पेल्व्हिक रिजन मध्ये येते म्हणजेत ओटीपोटाच्या वाटीमध्ये सरकते, ही कळांची सुरवात असते. हे प्रसुतीच्या २ ते ४ आठवडे आधी घडते. काही महिलांना ही जाणीव प्रसव कळांच्या वेळी होते.) असे असले तरीही ही बाब गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यावर घडू शकते. आणि याचे परिणाम म्हणून होणाऱ्या वेदना अगदी सौम्य ( काही सौम्य कळा, आणि ओटीपोटावर दाब आल्याने जडपणा) ते अतिशय त्रासदायक व अशक्त करणाऱ्या (कंबर आणि ओटीपोटात तीव्रतेने दुखणे) अशा असू शकतात. या वेदनांचे नेमके स्थान सांगणे कठीण जाते कारण हे दुखणे संपूर्ण ओटीपोट आणि कंबर या परिसरात असते.

हा दाब असतो कि वेदना ?
हे जाणून घेणे गरजेचे आहे कि दुखणे हे ओटीपोटातील वेदना आहेत की ओटीपोटावरील दाब आहे. ( Pelvic  pressure or Pelvic pain) . कारण ओटीपोटावरील दाब हे कळा सुरु होऊन बाळाचे खाली सरकणे याचे लक्षण आहे. यास सर्वीकल एफेस्मेंट (Cervical effacement) असे संबोधले जाते. या प्रक्रियेत गर्भाशयाची शेवटची जागा पातळ होते आणि बाळ खाली सरकण्यास सुरवात होते. यामुळे कळा सुरु होतात. ही प्रसूतीची तयारी असते. होणाऱ्या वेदना या मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदनांसारख्याच असतात. कंबर व उटीपोट या जागेत दुखते. हे शक्यतो तुमच्या दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गरोदरपणात होते. याची लक्षणे म्हणजे ओटीपोटतील तीव्र वेदना, जड वाटणे, चालताना अवघड जाणे किंवा ताणल्यासारखे वाटणे ( जणू काही ओटीपोट हे तुमच्या पोटापासून दूर ओढले जात आहे).
वेदनेचे कारण काय असते ?            
तुमच्या पोटातले बाळ जे आता वजनाने बरेच मोठे झाले आहे ते प्रसूतीसाठी तुमच्या ओटीपोटाच्या दिशेने सरकले जात आहे. त्याचे छोटेसे डोके तुमच्या उटीपोट, मूत्राशय आणि पार्श्वभागाच्या दिशेने ढकलले जात आहे ज्यामुळे तुमच्या स्नायूंवर, हाडांवर आणि सांध्यांवर खूप दाब निर्माण होत आहे.
याचीच दुसरी आणि चांगली बाजू म्हणजे तुमची प्रसूती झाल्यावर तुमचे गर्भाशय तुमच्या फुफुसांवर दाब देणार नाही त्यामुळे तुम्ही मोठे आणि दीर्घ श्वास आरामशीरपणे घेऊ शकाल.
तुमच्या माहितीसाठी..     
तुमचे ओटीपोट दुखणे हे ‘सिम्फसीस प्युबीस डीसफंक्शन’ (Symphysis pubis dysfunction (SPD) यामुळे सुद्धा उद्भवलेले असू शकते. यामुळे होणाऱ्या वेदना या सामान्यपणे होतात आणि स्नायूंवर दाब पडणे हे त्याचे कारण नसते. SPD मुळे दुखणे हे उटीपोटावरील दाबाशी ही संलग्न नसते. यात उटीपोटाच्या वाटीचा भाग असणारा ‘प्युबीस’ हा एक सांधा आहे जो ताणला गेल्यामुळे त्याची हालचाल होते व वेदना शक्यतो ओटीपोटातच होतात.  
तुम्ही या बाबतीत खालील गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.
 १ )पार्श्वभाग टेकवून आराम करा.
 २) गरम पाण्याने अंघोळ करा.
 ३) बेली स्लिंग’ विकत घ्या. हे तुमच्या पोटाला आधार देण्यासाठी क्रॉस पट्ट्यांमध्ये असणारे साधन आहे जे तुम्हाला पोटाचे वजन पेलण्यास मदत करते.याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा हे साधन उपलब्ध आहे.
 ४) मसाज घ्या किंवा एखादी दुसरी थेरेपी तुम्ही करू शकता. अनेक स्त्रिया याकारीता अॅक्युपंचरचे उपचार करून घेतात. हे उपचार गरोदरपणाशी संबंधित सर्वच दुखण्यावर  केले जातात.
 ५) डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या प्रकृतीला आणि गरोदरपणात घेण्यास सुरक्षित असणाऱ्या पेनकिलर्स घ्या. दुखणे असह्य असल्यास स्नायू मोकळे होण्यासाठी सल्ल्याने   औषधी घ्या.    

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon