Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

गरोदरपणात होणारा नाभीचा हर्निया याबाबत तुम्हांला माहित आहे का ?


हे अगदी बाहेर आलेल्या नाभी सारखे दिसते, त्यामुळे ही नाभीच्या हार्नियाची लक्षणे असू शकतात किंवा नाही. जर आपण गर्भवती असाल किंवा जास्त वजन असेल तर आपल्या ओटीपोटावर दबाव वाढतो त्यानी हर्नियाचे लक्षण वाढते. बहुतेक प्रकरणांमध्ये, जर तुम्ही गर्भवती असला तर यावर उपचार तुमच्या प्रसूती नंतर केल्यास योग्य ठरते. एकदा का तो अडकला किंवा पिरगळून बसला तर तो हाताळणे अवघड होऊन बसते, त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यावर उपचार घ्यावेत. हे जरी तुम्हाला पसंत नसले तरी वेळेवर निदान झाल्यास त्यावर सहज उपचार करू शकता.

१)  नाभी जवळचा भाग व्यापते 

तुम्ही गर्भवती असताना नाभी हार्निया झाला आणि त्याचा परिणाम जर तुमच्या बाळावर होईल अशी शंका मनात असेल तर तुम्ही लक्षात घ्या की, हे केवळ तुमच्या नाभी जवळच्या भागातच घडते. या परिस्थितीचा नेमका बिंदू म्हणजे जेथे आपली नाळ आपल्या बाळाशी जोडतो आणि दबावाने वाढू शकतो.आपल्या नाभीवर कोमलते ऐवजी वेदना जाणवत असल्यास हे देखील एक धोक्याची घंटा समजा. नाभीसंबधीचा हर्नियाची बाळाच्या जन्मानंतरची गुंतागुंत आणि समस्या आपण नुसते बाळाला आपल्या हातात उचलून घेतले तरी वाढू शकते.

२) गर्भधारणेनंतर नाभी हर्नियाचा धोका असतो 

बाळाच्या जन्माच्या दरम्यान, स्नायू जास्तीतजास्त ताणले जातात ते आपल्या ओटीपोटातील स्नायूला कमकुवत करू शकतात. परिणामी गर्भधारणेनंतर नाभी हार्नियाचा धोका वाढवतात. शरीराच्या आतील अवयव बाहेर पडल्यामुळे वेदना आणि अस्वस्थतेचा अनुभवू येतो. आपल्या नाभीसंबधीचा हर्नियासारखा जीवघेणा आजार होण्याआधी, योग्य मार्गदर्शनासाठी आपल्या डॉक्टरांशी बोलणे नेहमीच योग्य ठरते.

३)  गर्भवती महिलांमध्ये नाभीसंबधीचा हर्निया जास्त काळ असतो 

तुमच्या बाळाच्या ओटीपोटात एक छोटे छिद्र असते ज्याद्वारे ते तुमच्या नाळेशी ते जोडले जाते. तुमच्या प्रसूती नंतर हे छिद्र परत बंद होते पण जर हे पूर्ण बंद झाले नाही तर त्याचे रूपांतर नाभीच्या हार्नियामध्ये होते. गर्भधारणेदरम्यान सतत नाभीवर दबाव असतो त्यामुळे गर्भवती महिलांमध्ये नाभीचा हर्निया दीर्घकाळ असतो. आपल्या पोटातील दबावामुळे आपल्या ओटीपोट आणि उदरामधील अवयव पुढे सरकू शकतात आणि त्यातील पेशी बाहेर नाभी जवळ दिसायला लागतात. हा दबाव जर का खूप तीव्र असेल तर नाभी जवळ उंचवटा देखील दिसतो.

४)  नाभी संबधीचा हर्निया कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता 

 गर्भधारणेनंतर, हर्नियापासून सुटका होण्यासाठी शस्त्रक्रिया हा सर्वात सुरक्षित पर्याय असला तरी आपण काही व्यायामांची निवड करू शकता जे गर्भधारणेनंतर त्याच्या समस्या कमी करण्यासाठी आहेत. यासाठी तुम्ही योगासने करण्याचा प्रयत्न करु शकता, दररोज पाच वेळा किमान दहा सेकंद नौकासन करावे. याशिवाय सायकलिंग करणे हा या नाभी हार्नियावरचा सर्वात प्रभावी उपाय आहे. तुमच्या दैनंदिन व्यायामात याचा समावेश केल्यास हा हार्निया नैसर्गिकरित्या कमी होऊ शकतो.

नाभीसंबधीचा हर्नियाच्या निराकरणासाठी कदाचित शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असू शकतो तरी ही स्थिती कधीही दुर्लक्षित करू नका. तुम्ही जर गर्भवती असाल तर तो बरा होण्यासाठी प्रतीक्षा करा कारण त्याच्या पासून तुम्हाला आणि बाळाला काही धोका नाहीये. या परिस्थितीशी संबंधित कोणत्याही प्रकारची गुंतागुंत आपल्याला वाटत असेल तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon