Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

गरोदरपणातील IUGR जाणून घ्या (मराठीतून)


प्रेग्नन्सी हा आईच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ असतो. आईसह सर्वजण होणाऱ्या बाळाला आपल्या कुशीत घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीपासूनच आई होणाऱ्या बाळाची काळजी घेण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत असते. पण सर्व काळजी घेऊनही बाळाची वाढ होण्यात काही समस्या उद्भवू शकतात. या समस्या आईच्या नियंत्रणाबाहेर असतात. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं. त्या समस्यांपैकी एक समस्या IUGR म्हणजेच IntraUterine Growth Restriction चीही असू शकते.

१) IUGR म्हणजे काय ?

जेव्हा गर्भ त्याचा अनुवांशिकरित्या निर्धारित संभाव्य आकार साध्य करत नाही. त्यासाठी IntraUterine Growth Restriction ( IUGR ) ही संज्ञा वापरली जाते. यात गर्भाशयातील बाळाची वाढ जेवढी व्हायला हवी, त्यापेक्षा कमी होते. गर्भाशयात बाळाची वाढ खुंटल्यामुळे प्रेग्नन्सी, प्रसूती आणि बाळ जन्मल्यानंतरच्या काळातही बाळाला विविध आजार उद्भवण्याचा धोका जास्त असतो.

२) IUGR ची कारणे

गर्भाशयात बाळाची वाढ खुंटण्याची अनेक कारण आहेत.

- नाळेतील दोष. नाळेची चुकीची वाढ झाल्यामुळे किंवा लहान नाळ असल्यामुळे ती योग्यप्रकारे काम करू शकत नाही.

- जर तुम्हाला हायपरटेन्शन, मधुमेह, ब्लड क्लोटिंग आणि हृदयरोगासारखे आजार असतील, तर ही समस्या उद्भवू शकते.

- जर गर्भात दोन किंवा दोनपेक्षा जास्त बाळ असल्यास या समस्येला सामोरे जावे लागू शकते.

- मद्यपान, धूम्रपान किंवा ड्रगचा गैरवापर

- गंभीर कुपोषण

- अति औषधांचा परिणाम 

३) उपचार आणि प्रतिबंध

IUGR वर कोणताही उपचार नाही. एकदा तो झाल्यावर त्यावर उपचार करणे शक्य नाही. पण ही समस्या उद्भवूच नये यासाठी काही उपाय मात्र नक्कीच आहेत.

- त्यासंबंधी काही समस्या असल्याची थोडीही शक्यता वाटल्यास शक्य होईळ तेवढ्या लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा

- बाळाच्या वाढीवर आणि हालचालीवर लक्ष ठेवा. एखाद्यावेळी जरी तुम्हाला बाळाची हालचाल मंदावल्याचे लक्षात आले, तरी लगेच तुमची आणि बाळाची तपासणी करा.

- पौष्टिक आहार घ्या. हे तुमच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर बाळाच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य आहार खूप आवश्यक आहे.

- प्रेग्नन्सीच्या काळात योग्यरित्या विश्रांती घ्या. तुम्हाला खूप काम असलं तरीही आराम खूप आवश्यक आहे. तुम्ही किती योग्यरित्या विश्रांती घेता त्यावर बाळाचं आरोग्य अवलंबून असतं.

- प्रेग्नन्सीच्या काळात मद्यपान किंवा धुम्रपान करू नका. बाळात विकृती निर्माण होण्याचे हे मुख्य कारण आहे.

काही वेळा तुमच्या बाळाचं आरोग्य कसं असेल हे तुमच्या नियंत्रणात असू शकणार नाही. पण बऱ्याच वेळा तुमचं बाळ निरोगी असेल की नाही हे तुमच्यावरही अवलंबून असतं. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon