Link copied!
Sign in / Sign up
24
Shares

गरोदरपणातील गॅझेट्सचा वापर करणे कितपत योग्य आहे...

वायरलेस गॅजेट हे गरोदर असताना तुमच्या बाळाला हानिकारक ठरू शकते. पण याचा अर्थ असा नाही की, आता वायरलेस गॅजेट वापरायचे नाही. उलट प्रसूतीमध्ये बऱ्याच गोष्टीची मदत वायरलेस गॅजेटने होते. पण आता तुम्ही गरोदर आहात, तुमच्या प्रत्येक लहान- लहान गोष्टी ह्या बाळावर परिणाम करणारी ठरतात. तेव्हा गॅजेटमधील इलेकट्रोमॅग्नेटीक रेडिएशन गर्भातल्या बाळाला भविष्यात  विविध मानसिक  विकार उत्पन्न करू शकते. काही केसेसमध्ये बाळाला जन्मातच आलेले  व्यंग हे रेडिएशन मुळे आलेले आहे. तेव्हा याबाबत काळजी घ्यायला हवी ते सांगणार  आहोत.

   गरोदरपणात खूप वेळपर्यत बाळ असलेल्या पोटासमोर लॅपटॉप उघडून बसू नका. मोबाईलवर खूप वेळपर्यत बोलू  नका, त्याचबरोबर  बाळाच्या जवळ मोबाईल व्हायब्रेट मोडवर ठेवू नका, बाळाच्या मानसिक विकासावर त्याचा परिणाम होतो. गरोदरपणात  सतत मोबाईलवर व लॅपटॉपवर वेळ खर्च करू नका. मर्यादित वेळेसाठी व गरजेइतकाच गॅजेटचा वापर करा.

संशोधनानुसार वायरलेस गॅजेटच्या प्रभावामुळे  गरोदर मातेच्या गर्भातले बाळ हायपर ऍक्टिव्ह होऊ शकते. बर्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ यांनी ८० हजार मातांना घेऊन सर्व्हे केला त्यात त्यांना आढळले की, गरोदरपणात खूप वेळ ज्या  माता वायरलेस गॅजेट वापरत होत्या, त्यांची मुले इतर मुलापेक्षा जास्त चीड चीड करत होती. ज्या माता मोबाईलवर कमी बोलत होत्या त्यांची मुले कमी चीड चीड करताना आढळली. याचा अर्थ असा नाहीच की, मोबाईल, लॅपटॉप वापरू नये. गरोदर व गर्भातले बाळ या दोन्हीही गोष्टी खूपच संवेदनशील आहेत. बाळाची वाढ करताना मानवी मूल्यांचा संवाद व्हायला हवा. आपल्या गोंडस, निरागसबाळाच्या आरोग्यासाठी इतके नक्कीच करायला हवे. गर्भात बाळाची वाढ ऑरगॅनिक व्हायला हवी जेणेकरून काही व्यंग व्हायला नको.Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon