Link copied!
Sign in / Sign up
198
Shares

गरोदरपणातील आहार नियोजन - दुसरे त्रैमासिक

 

गरोदरपणाचे दुसरे त्रैमासिक बरेचसे आनंददायी असते. धोकादायक असणारे पहिले ३ महिने  मातांनी यशस्वीरीत्या पार केलेले असतात. या त्रैमासिकात घेतल्या जाणाऱ्या आहारामुळे त्याला गरोदरपणाचा ‘मधु-चंद्र’ म्हटले जाते कारण सुरवातीची मळमळ, उलट्या, थकवा आता जाणवत नाही. आता वास, अनिच्छा ,कंटाळा न येता गरोदर स्त्री आनंदाने तिचे आवडते पदार्थ खाऊ शकते.

    दुसऱ्या त्रेमासिकातील बदल.

आपल्या बाळाच्या वाढीत होणारी प्रगती आणि त्यानुसार गर्भात होणारे बदल जाणून घेणे आहार नियोजन करण्यासाठी उपयोगी ठरते. हे बदल जाणून घेऊन बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी माता आपल्या आहारात बदल करू शकते.

 

चौथा महिना :

बाळाची हाताची आणि पायांची बोटे आता तयार होऊन वाढू लागली असतात, बाळ अंगठा चोखू लागते.  नाळ आता बरीच विकसित झालेली असते आणि बाळ जवळपास दर तासाला लघवी करते! आईला बाळाच्या हालचाली जाणवतात . त्याचा आकार ८ इंच एवढा झालेला असतो.

 

पाचवा महिना.

चेहऱ्यावरील भुवया विकसित होतात, त्याची ऐकण्याची क्षमता वाढते. बाळ आता हालचाली करू लागते आणि आजूबाजूच्या गर्भजलात पोहु लागते. त्याच्या अंगावर बारीक बारीक केस येतात ज्यावर पांढऱ्या  रंगाचे द्रव (Vernix) चिकटलेले असते. बाळ आता हळू हळू जन्मस्थिती घेते, जसे डोके खाली अथवा पाय खाली.

 

सहावा महिना.

गर्भात असलेला अंधार आणि उजेड यातला फरक बाळाला कळू लागतो. ते डोळे उघडू शकते. त्याच्या हाताच्या बोटांच्या हालचालीला गती मिळते, विशेषतः अंगठा आणि सोबतच बाळाचे वाजत आता वाढते.

 

दुसऱ्या त्रेमासिकातील आहार

 

१. नियमित वैद्यकीय तपासणी, फोलो-उप आणि डॉक्टरांचे सल्ले ह्याकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही टप्प्यावर टाळावे. स्त्रीरोगतज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार पथ्य पळून औषधी वेळेवर घ्यावीत. तुम्ही आई होणार आहात तेंव्हा तुमच्या मनानुसार सगळे होऊ दया.

२. अनेक गरोदर स्त्रियांना रोजचा ठरवून नियोजित केलेला आहार घेणे सोपे जाते. तरीही ‘छोटे आणि पौष्टिक’ हा मंत्र पाळायला हवा. तुम्हाला खाव्याश्या वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचा आनंद घेऊन खा पण आहारी जाऊ नका. संपूर्ण गरोदरपणाच्या काळात बाहेरचे खाणे शक्यतो टाळाच, घरचेच अन्न खा. बाहेरचे खाणे आलेच तर एखादे स्वच्छ उपहारगृहच बघा. पैसे महत्वाचे नसून बाळाचे आणि तुमचे आरोग्य महत्वाचे आहे, हे लक्षात ठेवा.

३. रोजच्या जेवणातील पोळी-भाजी-भात याचा कंटाळा आला असेल तर इंटरनेटचा वापर करून  नवीन नवीन पाककृती जाणून घ्या आणि बनवून खा. भारतीय जेवण आता जागतिक पातळीवर गेले आहे, रोज अनेकानेक पाककृती येत असतात, त्या बनवून बघा. जसे ओट्स उपमा, व्हेजीटेबल डोसा, पनीर डोसा इत्यादी. अशा प्रकारच्या पदार्थांमुळे तुम्हाला नवीन शिकायला मिळेल आणि तेवढेच तुमचे डोहाळे पुरवले जातील.

४. तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात विटामिन डी, कॅल्शियम त्यासोबतच मॅग्नेशियम याचा समावेश असायला हवा. बाळाची हाडे व दात यांच्या वाढीसाठी याची मदत होते. पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद आम्ले यांचा समावेश असणारा आहार घ्या. ओमेगा-३ मेद आम्ले बाळाच्या मेंदू-विकासासाठी उपयोगी ठरतात.

५. भरपूर प्रमाणात स्वच्छ हिरव्या भाज्या, फळे जसे की कोबी, गाजर, वाटाणे, मेथी इत्यादी. खा. दुधाचे पदार्थ खाताना ते योग्यरित्या प्रक्रिया केलेले आहेत ना याची खात्री करून घ्या. मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत ही काळजी जास्त घ्या. स्वयंपाक करताना भाज्या, मांस सर्व स्वच्छ धुवून मगच वापरा.

६. सी-फूड किंवा मांस खाल्ल्यावर काही त्रास झाल्यास, आलेर्जी उद्भवल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्या. अशावेळी हयगय करणे योग्य नाही. नेहमी ताजे आणि स्वच्छच खा ,काळजी घ्या.

७. जास्त करून पाणी किंवा नैसर्गिक पेय घ्या जसे, नारळाचे पाणी, सरबत अथवा फळांचा रस. कॉफी सारखे  कॅफेनयुक्त पेय शक्यतो टाळा.

८. तुम्हाला आवडत असतील तर चोकोलेट, आईस्क्रीम, चाट, पाणीपुरी सारखे चटपटीत पदार्थ एखाद्या वेळी खाणे ठीक आहे ,परंतु नेहमी नेहमी असे खाणे टाळावे.

९. मध्यरात्री लागणारी भूक एखादे फळ किंवा एनर्जी बार सारखे पदार्थ खाऊन भागवावी.

१०. हलकं व्यायाम, योगासने किंवा लमेझचे वर्ग अशा गोष्टीं पौष्टिक आहारा घेण्यासोबत उपयोगी ठरतील.

 

सगळ्यात महत्वाचे म्हणजे निवांत आणि आनंदी राहा. गरोदरपणात वाढलेले वजन निरोगी असते त्यामुळे स्वतः बद्धल  चांगला विचार करा. प्रत्येक दिवसाला आनंदाने सामोरे जा. सुंदर रहा आणि सुंदर दिसा!

ह्या काळाचा आनंद घ्या आणि सोबतच आई होण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा!      

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon