Link copied!
Sign in / Sign up
72
Shares

गरोदरपणातील आहार नियोजन करताना या गोष्टी उपयुक्त ठरतील

गर्भवती असताना त्या महिलेची प्रचंड काळजी घ्यावी लागते. यामध्ये प्रमुख गोष्ट असते ती म्हणजे गर्भवती महिलेचा आहार. हे सर्वानांच माहीत आहे की, गर्भधारणेदरम्यान आईपासून बाळाचे पोषण होता असते. अशा प्रकारे गर्भवती महिलेचा आहार हा विविध जीवनसत्वे आणि पोषक तत्वांनीयुक्त असल्यास आई आणि बाळासाठी लाभदायी ठरतो. आज आम्ही गर्भवती असलेल्या महिलेने जास्तीत जास्त कोणते पदार्थ खाणे आवश्यक आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत.

एका सामान्य स्त्रीला निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात १८०० ते २००० कॅलरीजची आवश्यकता असते. गरोदरपणी स्त्रीला तिच्या बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी अधिक ३००-४०० अधिक कॅलरीजची गरज भासू शकते शकते. हे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार निराळॆ असण्याची शक्यता असते. परंतु सर्वसाधारणपणे नेहमी पेक्षा ३००-४०० जास्त उष्मांकाची गरज असते. यासाठी तुम्हांला आहाराचे नियोजन कसे करावे यासाठी काही माहिती देणारा आहोत.

आहारात या घटकांचा समावेश असावा

१. भाज्या-vegetable

२. फळे-fruits 

३. डाळी-pulses

५. मांसाहार-non-veg

६. दुग्धजन्य पदार्थ-dairy product 

७. आवश्यक जीवनसत्वे घटक

१.भाज्या

मेथी, शेपू, करडई, अळू, शेवग्याची पाने, आंबटचुका कोबीची , कोथिंबीर यापैकी पालेभाज्या अशा प्रकारची कोणतीही पालेभाजी रोजच्या आहार असावी. गवार, दोडका, घोसावली, भोपळा अशा प्रकारच्या फळभाज्याही मधून मधून जेवणात असाव्यात. मुळा, गाजर, बीट, टोमॅट काकडी हे कच्चे खावे. परंतु खाण्याआधी नीट धुवून घेणे आवश्यक आहे.

२. फळे

पेरू, चिकू, केली, सफरचंद, संत्री, मोसंबी अशा प्रकारची फळे रोजच्या जेवणानंतर खावीत. जांभूळ, करवंद, बोरं, आवळा, कवठ ही फळेही आरोग्याच्या दृष्टीने चांगली असतात.

४. सर्व धान्ये/ डाळी

बहुतेक स्त्रियांना गर्भवती असताना बद्धकोष्ठता, अशक्तपणा किंवा लोहाच्या कमतरता जाणवते. सर्व धान्य, ब्राऊन राईस, आहारातील फायबर आणि विशेषतः 'ब' जीवनसत्वांनी युक्त असते. अशक्तपणा आणि बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी लाभदायी आहेत.

५. मांसाहार

मटण, मासे, अंडी, यापैकी काहीतरी मधूनमधून जेवणात असावे. परंतु याचे प्रमाण औषधापुरते असावे अति प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय करू नये

टीप- मांसाहाराबत प्रत्येकाने आपल्या डॉक्टराचा सल्ला घेणे योग्य ठरते.

६. दुग्धजन्य उत्पादने

गर्भधारणेदरम्यान दूध आणि इतर दुग्धजन्य उत्पादनांचे महत्व प्रचंड आहे. कॅल्शियमयुक्त दुधाचे पदार्थ जसे की, दही 'ड' जीवनसत्वाचा आणि प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहे जे बाळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी अत्यंत गरजचे असते.

७. विविध आवश्यक घटक /जीवनसत्वे त्यानुसार आहार

 

अ. कॅल्शियम

गरोदरपणी कॅल्शियमची सर्वात अधिक गरज असते.बाळाच्या हाडांच्या योग्य वाढीसाठी तुम्हाला १२०० मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यक्ता असू शकते.यासाठी नियमित कॅल्शियम औषधांसोबत आहारातून नैसर्गिक कॅल्शियम घेणे देखील तितकेच गरजेचे असते.दूध व दूधाचे पदार्थ,सुकामेवा,ब्रोकोली आणि पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.

ब . पोट्याशियम

गर्भधारणेदरम्यान इतर आवश्यक फळे म्हणजे पोटेंशियमनी समृद्ध केळे, 'अ','ड','क','ई' जीवनसत्वांनी युक्त सफरचंद, ऍप्रिकॉट यामध्ये लोह, पोटॅशियम, बिटा कॅरोटीन, कॅल्शियम इत्यादी जीवनसत्वांचे उत्तम स्रोत आहेत. गर्भधारणे दरम्यान शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे. पाण्या व्यतिरिक्त, कलिंगड, काकडी हे शरीरात दीर्घकाळ पाण्याचे प्रमाण नियंत्रित करण्याचा चांगला मार्ग आहे. गर्भवती महिलेने भाज्यांमध्ये ई जीवनसत्वसाठी रताळे, बटाटे, गाजर (बीटा कॅरोटीन), मटार (फायबरयुक्त), श्रावणघेवडा यांचा समावेश करावा.

क. फॉलिक अॅसिड

हे देखील अर्भकाच्या मेंदू व मणक्याच्या वाढीसाठी आवश्यक असते.यासाठी दररोज ४०० मिग्रॅ फॉलिक अॅसिडची तुम्हाला गरज असू शकते.टोफू किंवा सोया पनीर,पालक व मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या,दुधीभोपळा,टरबूज,शेंगदाणे व पिनट बटर यांमध्ये चांगल्या प्रमाणात फॉलिक अॅसिड असते

ड .लोह (आयर्न)

गरोदरपणात बाळाच्या अवयवांच्या विकासासाठी तुमच्या रक्त पेशींमध्ये आवश्यक तितके हिमोग्लोबीन असणे गरजेचे असते.यासाठी आहारात दररोज ३० मिग्रॅ लोहाचे प्रमाण घ्या.पालक,ब्रोकोली,मेथी या सारख्या हिरव्या पालेभाज्या,खजूर मनूका,अंजीर,बीट व सफरचंद यामध्ये चांगल्या प्रमाणात लोह असते.

ई. प्रथिनेयुक्त आहार

आतापर्यंत आपण प्रथिने बाळाच्या गुंतागुंत वाढीसाठी किती महत्वाची भूमिका बजावतात हे पाहिले आहे. जसे की मायंसाहार, मीट, अंडी, मासे (पाऱ्याचे उच्च प्रमाण असल्यास टाळा) सुके सोयाबीन, नट्स, मटार यासारख्या पदार्थांतून गर्भवती मातेला प्रथिने मिळतात. यासोबतच गर्भवती महिलेने नारळाचे पाणी, सुकामेवा, सुके आक्रोड, मनुका, खजूर, रासबेरी, स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी, फिश ऑलिव्ह ऑइलचा देखील आहारात समावेश करावा.

हे पदार्थ टाळावे

१. कॅफेनयुक्त पदार्थ

अन्नपदार्थ घेताना ती थंड व शीतपेये असतील तर त्यात कॅफेन असते व बाकीचे घटक असतात ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अपायकारक होऊ शकतात. आणि महत्वाचे म्हणजे कॅफेनचा मात्रा असलेली शीतपेये किंवा फूड जर खाणे बंद केलेच तर योग्यच राहील कारण कॅफेन हा घटक शरीरातील आयरन शोषणाचे काम करतो व गरोदरपणात आयरनचे प्रमाण कमी झाले तर शरीर कमजोर होते. तेव्हा हे पदार्थ खाण्याचे बंद करावीत. आणि आयरन चे प्रमाण कमी होईल असा पदार्थ घेऊच नये. काही संशोधनानुसार ज्या महिला जास्त प्रमाणात कॅफेन घेतात ती बाळ दगावण्याचा धोका असतो. प्रसूती ही सिझेरियन होते. प्रसूतीनंतर बाळाचे वजन कमी भरते, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली नसते. म्हणून जर तुम्ही खूप कॉफी व शीतपेये घेत असाल तर बंद करा मोहीम सुरु करा.

२. पपई

काही फळ अशी असतात ती गरोदर स्त्रीने खाऊच नये. तिच्यासाठी ती फळं निषिद्धच असतात, जरी तिला कितीही खाण्याची इच्छा असेना. त्याच वर्गात पपई नावाचे फळ मोडते. कच्ची पपई कधीच खायला देऊ नये. कारण पपईमध्ये latex ( रबरासारखा पदार्थ असतो) नावाचा घटक असतो आणि त्यामुळे गर्भपात होऊ शकतो. आणि जर तुम्ही म्हणाल की, ‘मग आम्ही पिकलेली पपई खाऊ शकतो’ तेव्हा तुम्ही खाऊ शकता पण यामुळेही प्रसूतीनंतर बाळाला गॅस व पोटाचा त्रास होऊ शकतो.

३. मासे व विशेषतः शिजवलेली

असे आढळून आले आहे की, प्रसुतीपूर्व मासे खाणे गरोदर मातेला खूप हानिकारक आहे. याचे महत्वाचे कारण माशांमध्ये मर्क्युरी नावाचा घटक असतो. आणि हा घटक बाळाच्या मानसिक व शारीरिक वाढीवर परिणाम करतो. काहींना मासे खूप आवडत असतील पण बाळाच्या व स्वतःच्या आरोग्यासाठी काही कालवधीपर्यंत खाण्याचे टाळावे.

४. जंक फूड

गरोदर असताना खूप खाण्याची इच्छा असते, मग त्यात जंक फूड किंवा इन्स्टंट फूड. तेव्हा या अन्नला तुम्हाला टाळता येईल तितके तुमच्या हिताचे आहे. कारण यात तुमचे वजनही वाढते आणि ऍसिडिटी व आतड्याविषयीची समस्या तुमच्या तिसऱ्या त्रैमासिकात येते. त्याऐवजी हिरवा भाजीपाला खावा त्यातून फॉलीक ऍसिड मिळेल व प्रसूती नॉर्मल होईल.

५. हवा किंवा डबाबंद खाद्यपदार्थ

डबाबंद खाद्यपदार्थाने आमचे जीवन सुखकर करण्यास खूप मदत केली आहे. जसे की, फ्रोझन फूड. तेव्हा बाजारातून फ्रोझन फूड आणून फ्रीज मध्ये संग्रहित करून ठेऊ नका. आणि प्रसूतीच्या तिसऱ्या तिमाहीत तर नाहीच. कारण ही पदार्थ preservatives केलेली असतात आणि त्यात काही बॅक्टरीयाचा वापर केलेला असतो ते बाळाला व तुम्हाला हानिकारक आहे. कॅन फूड मध्ये बिसफेनॉल A ( BPA ) हा घटक असतो तो गरोदरपणात अंतःस्राव होऊ शकतो.

महत्वाचे- प्रत्येक स्त्रीनुसार आहाराबाबत काही गोष्टी निराळ्या असू शकतात, त्यामुळे हा आहार मार्गदर्शक म्हणून वापरावा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि ते सांगतील तसा  बदल करत रहावा.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon