गर्भारपणाच्या नवव्या महिन्यात आल्यावर तुम्हाला हायसे वाटते की, आता एक महिन्यानंतर मी बाळाला प्रत्यक्ष पाहणार आहे. प्रत्यक्ष बाळाला पाहण्याचा आनंद घेऊन तुमचा हा महिना जात व्यतीत होत असतो. पण ह्या महिन्यात जितका आनंद वाटतो त्याच प्रमाणात ह्या महिन्यातच लेबर पेन, झोप न लागणे, सदैव चिंता काळजी प्रसूतीची, आणि गर्भाशय खूपच जड झाल्याने तेही असह्य वाटते. तेव्हा नववा महिना ह्या सर्व गोष्टींचा असतो आणि खूपच घाईचा सुद्धा असतो. तेव्हा ह्या महिन्यात तुमच्या सोबत कोणत्या गोष्टी घडतील आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात.
१) बाळाची वाढ

ह्या महिन्यात बाळाची जवळजवळ जन्म घेण्यासाठीची पूर्णच वाढ झालेली असते. बाळ ह्या महिन्यात कधीही जन्माला येऊ शकतो. ह्या महिन्यात गर्भाशयामध्ये बाळाचे उगवलेले लहान केस निघून गेले आहेत. ऍम्नीऑटिक फ्लुइडच्या आवरणामुळे बाळाच्या त्वचेवर चिकट आवरण आलेले असते. ते सुद्धा निघून जाते. हे ऍम्नीऑटिक फ्लुइड बाळाचे गर्भाशयाच्या आत बाहेरच्या धक्यापासून सरंक्षण करत असते. बाळाची त्वचाही चांगलीच विकसित झाल्याने चरबीचा थर आल्याने त्याचा फायदा बाळाच्या जन्मानंतर उबदार राहण्यास होईल. बाळाचा जन्म झाल्यावर बाळांना उबदार राहतील असेच ठेवायला पाहिजे. बाळाला आईच्या कुशीत नेहमीच उबदार आणि शांत वाटते. आणि आईलाही बाळाला कुशीत घ्यायला आवडते.
२) लेबर पेन आल्यावर काय करावे आणि लेबर पेन कसे ओळखावे

ह्याबाबतीत ह्या महिन्यात खूप दक्ष राहावे. तुम्हाला रात्री, पहाटे किंवा कधीही ओटीपोटात खूप जोराने दुखायला लागेल. त्याला आपण कळा म्हणतो. आणि ह्या कळा खूप वेदनादायी आणि असे वाटेल की, जसे बाळ खालीच पडणार आहे. ते खेचत आहे की काय ? तुमच्या आतल्या कपड्यात रक्ताचे डाग असलेला स्त्राव दिसलाच तर समजून घ्या कदाचित ही लेबर पेनची चिन्हे असू शकतील. आणि त्याच वेळी येत नसतील तर एक दिवसांनी येतील.
५) प्रसूती वेदना येतील त्याअगोदर घ्यायची काळजी

नवव्या महिन्यात कधीही लेबर पेन येऊन बाळाचा जन्म कधीही येऊ शकतो तेव्हा नवऱ्याला, कुटुंबातील घरच्यांना ह्याविषयी सतर्क राहायला सांगावे. तुम्ही जर गावात, शहरापासून थोडे लांब, रानावनात राहत असाल तर रिक्षा, टॅक्सी ह्यांचा नंबर घेऊन ठेवावा. जर तुमची स्वतःची चारचाकी असेल तर उत्तम असेल. फॅमिली डॉक्टर ह्यांना कधीही बोलावता येईल असे राहिलेच तर बरे.
६) हॉस्पिटल निवडताना
हॉस्पिटल आणि प्रसूतीतज्ञ् निवडताना खबरदारी घ्यावी की, खूपच सुविधांबाबत वाईट आणि उध्दट लोक असलेली हॉस्पिटल्स निवडू नका आणि असे हॉस्पिटलला कुणाला जाऊ देऊ नका. हॉस्पिटल ला जाताना कोणते साहित्य घ्यावे त्याविषयी tinystep मराठीवर ब्लॉग लिहला आहे तो तुम्ही वाचून घ्या. आणि डिलिव्हरी अनुभवी सुईण कडून सुद्धा करू शकता. आजही काही ठिकाणी घरीच डिलिव्हरी करतात तर ते काहीवेळा धोकादायक असेल तर टाळा.

ह्यावेळी लघवीला जायला संकोच करू नका. तर जितक्या वेळेस लघवी लागेल तितक्या वेळेस जा. तुम्हाला शक्य असेल तर कोमट, स्वच्छ, सुरक्षित पाण्याचे हबके मारा. फ्रेश राहा.
ज्या वेळी बाळ अगदी खाली येते व जन्मासाठी तयार होते तेव्हा तुमच्या कळा ह्या बदलू लागतील. तुम्हाला तुमच्या पायांच्या मध्ये तुमच्या बाळाच्या डोक्याचा दाब जाणवू लागेल. प्रत्येक वेळी कळ आल्यानंतर तुम्हाला कदाचित २ किंवा ३ वेळा जोर द्यायची तीव्र इच्छा होईल.
