Link copied!
Sign in / Sign up
19
Shares

गरोदरपणात वारंवार बाथरूमला का जावे लागते ?

१) गरोदरपणात खूप वेळा बाथरूमला जावे लागते. अशी समस्या प्रत्येक गरोदर स्त्रीची असते. आणि ह्याचे कारण म्हणजे तुमच्या शरीरात बदलणारी हार्मोन आणि ह्या हार्मोन बदलामुळे रक्ताचे वहन जोराने होते. आणि गर्भाशयही वाढत असते.

हा हार्मोनल बदल तुमच्या रक्ताचे वहन तुमच्या किडनीकडे जोराने वाहते. त्या कारणाने तुमचे मूत्राशय लवकर भरून जाते. म्हणूनच तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जावे लागते.

२) गरोदरपणाच्या वेळी तुमच्या रक्ताचा व्हाल्यूम खूप वेगाने वाढत असतो. आणि जोपर्यंत वाढतो की, तुमच्या शरीरात ५० टक्के सर्क्युलेट होत नाही. ह्याचा अर्थ असा झाला की, तुमच्या शरीरात जास्तीचे तरल पदार्थ तयार होत आहेत. जे तुमच्या किडनीपासून जाऊन मूत्राशय पर्यंत पोहोचतात.

३) तुमचे वाढते गर्भाशय तुमच्या मूत्राशयावर दबाव टाकतो त्यामुळे तुम्हाला खूप वेळा लघवीला जावे लागते.

पुन्हा पुन्हा लघवीला जाणे गरोदरपणाचे लक्षण आहे का ?

४) हो, गरजेपेक्षा जास्त तुम्हाला लघवीला जावे लागत असेल तर ते गरोदरपणाचे लक्षण असते. आणि हे लक्षण तुमच्या पहिल्या त्रैमासिकाच्या सहाव्या आठवड्यात दिसत असते. काही डॉक्टर व पुस्तकातही असे दिले आहे की, तुमचे गर्भाशय पेल्व्हिसच्या बाहेर निघून जाते. पण संशोधनानुसार तसे आढळून आले नाही.

 ह्यावर काय उपाय करता येईल

५) काही पेय ह्या दरम्यान घेऊ नका - कॉफी, चहा, कार्बोनेट पेय, घ्यायला नको. आणि सोडा हे सर्व ड्रिंक डुरेटिक्स असतात. म्हणजे, हे पेय लघवी करण्याच्या क्षमतेत वाढ करतात. ह्या वेळी ही घेऊ नकाच .

६) आपल्या मुत्राशयाला पूर्ण खाली करून द्या. जेव्हा तुम्ही लघवीला जाणार त्यावेळी पुढे झुकून लघवी करा कारण त्यामुळे तुमचे मूत्राशय पूर्ण खाली होईल.

लघवीला थांबवून ठेवू नका : ज्यावेळी तुम्हाला लघवी लागेल त्यावेळी लगेच जा. तिला थांबवून ठेवू नका. कितीही मोठे कारण असले तरी. कारण लघवी रोखून धरल्यामुळे पेल्विक, आणि मूत्राशयाच्या स्नायूंवर खूप ताण पडून ती दुखतात.

 शिंक येते तेव्हा लघवी का निघून जाते

७) तुमचे मूत्राशय व पेल्विक चे स्नायू वर गर्भाशयाचा दबाव पडत असतो. ज्यावेळी तुम्ही खोकता, शिंक, किंवा व्यायाम करतात किंवा रनिंग करत असतात तेव्हा तुमचे मूत्र निघून जाते. ह्याला लीकेज 'स्ट्रेस यूरिनरी इंकॉन्टीनेंस'(stress urinary incontinence) असे म्हणतात. जर खूप लघवी होत असेल किंवा तुम्हाला कुठे कार्यक्रमात जावे लागत असेल तर अशा वेळी मिनी पॅड किंवा पँटी लायनर घालू शकता. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon