Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

गरोदरपणात वांगे खाणे योग्य की अयोग्य?

गरोदरपणा हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात अद्भुत काळ असतो. हा आयुष्यातील असा काळ असतो; जेव्हा सगळेच जण तुमच्याबाबत आणि तुम्ही काय खाता, याबाबत विशेष काळजी दाखवतात. जरी मोठी माणसे तुम्ही काय खावे आणि काय नको याची यादी घेऊन तुमच्याकडे येत असले; तरी काही असे पदार्थ असतात जे खायच्या आणि न खायच्या अशा दोन्ही याद्यांमध्ये आढळतात. त्यातीलच एक पदार्थ म्हणजे वांगे! बाकी गर्भवती स्त्रियांप्रमाणेच जर तुम्ही देखील ते खावे की खाऊ नये, याबाबत साशंक असाल; तर आम्ही तुम्हाला याबाबत नक्कीच मदत करू. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा

वांगे (एगप्लान्ट) काय आहे?

वांगे, जे सामान्यतः ओबरजिन, बैंगन किंवा ब्रिन्जल या नावांनीही ओळखले जाते, ही आशियातील एक प्रचलित भाजी आहे. या चवदार असलेल्या भाजीला गरीबाची केव्हियर (एका माशाचे अंडे) असेही म्हणतात आणि ती तिच्या आरोग्यकारक फायद्यासाठी विख्यात आहे. ते तंतुमय पदार्थ, पोटॅशियम, कॉपर, थायमाईन, विटामिन बी-सिक्स, फोलेट, मॅग्नेशियम आणि नियासिनने युक्त असते. वांगे ही सगळ्या आबालवृद्धांमध्ये चालण्यासारखी भाजी आहे. तसेच त्याच्यामध्ये कमी कॅलरीज असतात; कारण एका अर्ध्या कप कच्च्या वांग्यामध्ये फक्त अकरा कॅलरीज असतात.

गर्भारपणात वांगी खाणे योग्य आहे का?

जेव्हा तुम्ही गरोदर असता; तेव्हा तुमच्या आणि बाळाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च अग्रक्रम असतो. म्हणून तुम्ही जे खाता त्यावर शंका उपस्थित करणे क्रमप्राप्त ठरते. मग प्रश्न हा येतो: गर्भारपणात वांगी खाणे कितपत योग्य आहे?

काही व्यक्तींच्या अनुसार वांगे हे गरोदर स्त्रियांसाठी योग्य नाही; कारण त्यामध्ये फायटोहार्मोन्स असल्याचे मानले जाते. यामुळे मासिक पाळीला आणि म्हणून गर्भपाताला चालना मिळते. तर दुसऱ्या बाजूला वांग्यामध्ये गरोदर स्त्रीसाठी अनेक आरोग्यकारक फायदे आहेत- जसे की अर्भकाचा विकास होणे. तसेच ते व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन इ सारखी आवश्यक जीवनसत्वे पुरवते. म्हणून गरोदर स्त्रियांसाठी ते प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

वांग्याचे फायदे

बाळाच्या योग्य वाढीस वेग देते: वांग्यामधील विटामिन सी, विटामिन ई, विटामिन ए, बी कॉम्प्लेक्स आणि नियासिन हे अर्भकाच्या योग्य वाढीत मदत करतात.

रोगप्रतिकारक शक्ती: वांग्यामधील विटामिन सी हे विविध रोगांच्या प्रतिकारासाठी ओळखले जाते. म्हणून हे गरोदर स्त्रियांना आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहण्यात सहाय्यता करते.

तांबड्या रक्तपेशींची संख्या

 तांबड्या रक्तपेशी अर्भकाच्या मज्जातंतू, मेंदूच्या पेशी आणि स्नायूंच्या विकासात मदत करून अर्भकाच्या वाढीत महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच त्यामुळे माता आणि शिशुमध्ये लोहाचे योग्य प्रमाण राखले जाते. वांग्यामधील फोलेट हे पचनानंतर फोलेट ऍसिडमध्ये रुपांतरीत होते आणि तांबड्या रक्तपेशीच्या निर्मितीमध्ये हातभार लावते.

इलेक्ट्रोलाइटचे नियंत्रण: वांग्यामधील मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, इत्यादी विविध खनिजे इलेक्ट्रोलाइटच्या नियंत्रणात मदत करतात. तसेच ते आई आणि बाळ दोघांनाही योग्य रक्त पुरवठा करण्यात सहाय्यता करते

कोलेस्ट्रॉलची पातळी

वांगे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी (LDL) कमी करते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी (HDL) सुधारते. तसेच ते हृदयविषयक समस्या, अथेरोस्क्लेरोसिस आणि स्ट्रोक्स रोखण्यास मदत करते. वांगे हे एकूण रक्तवाहिन्यांविषयक आरोग्य सुदृढ करते.

हायपरटेन्शन

 गरोदर महिलांना हायपरटेन्शन आणि रक्तदाबविषयक समस्यांचा धोका असतो. वांग्यामधील थायमाईन, बायोफ्लेवोनॉइड्स आणि रायबोफ्लेवीन हे हायपरटेन्शन आणि रक्तदाबाच्या पातळी नियंत्रित करतात आणि हृदयाच्या योग्य कार्याची हमी देतात.

गर्भधारणेविषयक मधुमेह: जर गरोदर महिलांना गर्भधारणेविषयक मधुमेह झाला असेल; तर वांग्याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.

गरोदरपणात वांगे खाण्याचे दुष्परिणाम

गर्भपात

वांग्यातील फायटोहार्मोन्स मासिक पाळीला चालना देते; ज्यामुळे गर्भपातदेखील होऊ शकतो. तथापि कमी प्रमाणात आणि कधीतरी वांगे खाण्याने गरोदर स्त्रियांना कोणतीही हानी उद्भवत नाही.

लवकर प्रसूती होणे

 ज्या मातीत वांगे वाढते, तिथे टॉक्सोप्लास्मोसिस असते. जर वांगे योग्यपणे न धुता सेवन केले; तर त्यामुळे लवकर प्रसूती होऊ शकते. तसेच जर गरोदर महिला ते भरपूर खात असतील; तर त्यामुळे गर्भाशयाच्या आकुंचनास चालना मिळू शकते. म्हणून यामुळे देखील अवेळी प्रसूती होऊ शकते.

ऍलर्जी

जर वांग्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन केले; तर पुष्कळ वेळा गर्भवती महिलांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. यामागचे कारण हे गरोदर शरीरातील हार्मोन्सचा बदल हे असू शकते.

ॲसिडीटीचे प्रमाण: वांग्यामुळे गरोदर स्त्रियांमधील ॲसिडीटीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे त्यांच्यात चिंतितपणा आणि अस्वस्थता वाढू शकते.

थंड/गरम पदार्थ

जपानमध्ये वांगे हे गडद पदार्थ (डार्क फूड) समजले जाते; जे थंड ऊर्जा पसरवते. म्हणून ते गरोदर स्त्रियांना न खाण्याचा सल्ला दिला जातो.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon