Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

प्रेग्नन्सीदरम्यान तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे करा !

 

प्रसुतीनंतर महिलांमध्ये खूप सारे बदल होतात. तुमच्या कुटंबासोबत असलेले संबंध, तुमची भूमिका आणि कर्तव्य, तुमचं खाणं, तुमचे कपडे अशा अनेक गोष्टींच बदल होतो. प्रेग्नंट असताना पोषक आहार घेण्याचा सल्ला देण्यात आलेला असतो. त्यामुळे आपण सारखे काही तरी खात असतो. त्यामुळे बऱ्याच वेळा गरजेपेक्षा जास्त आहारही घेतला जातो. आपण आपल्यासाठी तसेच मुलाला हवं असतं म्हणून त्याच्यासाठी काही तरी हेल्दी खाण्याचा खातो. त्यामुळे याकळात वजनही वाढते.

प्रेग्नन्सीदरम्यान महिलांच वजन कसं वाढतं हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. पण काही महिलांच वजन यादरम्यान कमीही होतं. पण बहुसंख्य महिलांच वजन हे वाढतं. पण पोटातील बाळाच्या पोषणासाठी तुम्हाला चांगला पोषक आहार घेणं आवश्यकच आहे. पण त्यादरम्यान तुमचं वजन कसं वाढणार नाही याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. या काळात वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं काही टीप्स देणार आहोत.

१. वारंवार पण थोडा थोडा आहार घ्या

एकाच वेळी जास्त आहार घेणे, हे वजन वाढण्याचे मुख्य कारण आहे. पण त्याऐवजी थोडा थोडा आहार दिवसात पाच ते सहा वेळा घेतल्यास वजन नियंत्रणात राहते. पण त्याचवेळी तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य प्रमाणात प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमीन्स आणि खनिज मिळत आहेत की नाही याकडेही लक्ष द्या. याशिवाय तुमच्या शरीरातील कॅल्शीयमच् प्रमाण वाढवण्यासाठी दिवसातून दोन ग्लास दूध प्या.

 

 

२. तुमच्या गरजा समजून घ्या

तुमच्या बॉडीला कशाची गरज आहे हे डॉक्टरांशी चर्चा करून समजून घ्या. निरोगी आणि आनंदी बाळासाठी सुरक्षित प्रसुती होणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी शरीरासाठी काय आवश्यक आहे हे डॉक्टरांकडून समजून घेणे खूप आवश्यक आहे. तुमच्यासाठी कोणता पोषख आहार आवश्यक आहे, तसेच तुमचे शरीर मजबूत ठेवण्यासाठी कोणता व्यायाम आवश्यक आहे हे डॉक्टरांना विचारून घ्या. तुम्हाला या काळात किती वजन वाढवायचं, तम्ही दिवसात किती कॅलरी घ्यायला हव्यात हेही विचारून घ्या. ज्यांचा वजन कमी आहे. त्यांनी या काळात नॉर्मल महिलांपेक्षा जास्त आहार घेणं आवश्यक आहे.

 

३. सप्लीमेंट्स घेण्याचा विचार करा

तुम्हा दिवसभरात पुरेसा पोषक आहार घेवून शकत नसल्यास तुम्ही सप्लीमेंट्स घेण्याविषयी डॉक्टरांना विचारू शकता. ते तुमच्या शरीरानुसार सप्लीमेंट्विषयी मार्गदर्शन करू शकतील. ज्यांना दूध, मटन यांची अलर्जी आहे, त्यांच्यासाठी सप्लीमेंट्स खास उपयुक्त ठरतात. याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करा.

४. व्यायामाची आवश्यकता 

प्रेग्नन्सीदरम्यानही व्यायमाची खूप आवश्यकता असते हे बहुसंख्य लोकांना माहितीच नसते. पण तुम्हा प्रेग्नंट आहात म्हणून तुम्ही व्यायाम थांबवता कामा नये. फक्त या काळात तुमचं व्यायाम करायचं प्रमाण कमी करावं लागेल एवढंच. तसेच व्यायामाचे काही प्रकारही बदलावे लागतील. तुमच्या बाळांपणात तुम्हाला उपयुक्त ठरू शकतील असेही काही व्यायामप्रकार आहे. ते करणं जास्त फायद्याचं ठरू शखतं. तसेच तुमच्या पोटातील बाळं योग्य ठिकाणी असावं यासाठीही काही व्यायाम आहेत. त्यासाठी डॉक्टरांशी चर्चा करून कोणते व्यायाम करायचे याची माहिती घ्या.

५. निरोगी प्रारंभ करा

प्रेग्नंट होण्यापुर्वी ही सर्वात महत्त्वाची सुचना आहे. तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन आहे याची खात्री करून घ्या. त्यासाठी प्रयत्न करा. तसेच तुम्ही रोज पोषक आहार घेताय आणि दररोज व्यायाम करताय ना हे लक्षात घ्या. अशाप्रकारे तुमचं शरीर बाळासाठी तयार होईल. तुमच्या प्रेग्नन्सीसाठी ते उत्तम राहील.

६. भरपूर द्रव पदार्थ प्या

 तुमचं वजन आणि तब्येत नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज भरपूर प्रमाणात द्रव पदार्थ प्या. जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित नसाल, तर तुमची बॉडी व्यवस्थि काम करणार नाही. त्यामुळे तुमच्या प्रेग्नन्सीदरम्यान छातीत जळजळ होणे आणि अपचनासारखे लक्षण उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी हायड्रेटेड राहण्यासाठी नेहमी तुमच्याजवळ पाण्याची बाटली असले याची काळजी घ्या.              

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon