Link copied!
Sign in / Sign up
14
Shares

जाणून बाळ पोटात असताना कसे आणि कधी झोपते

आपल्या गर्भधारणेदरम्यान घडणारी प्रत्येक गोष्ट सहजपणे आपल्या रोजच्या हालचालीतून स्पष्ट दिसते. तुम्ही तुमच्या बाळाच्या हालचालींवर लक्ष दिले तर तुम्हांला  अनेक गोष्टी लक्षात येऊ शकतात.  ​तुमचे बाळ एका दिवसात नव्वद मिनिटे झोपते, पण ते तुम्ही झोपता तेव्हा ते झोपत नाही. कदाचित असे होण्याची शक्यता असते की, आपले बाळ झोपलेले असताना आपल्याला लक्षात आले नाही, परंतु आपण खात्री बाळगा की, ते गर्भाशयात पुरेशी झोप घेत आहे. बहुतेक आयांना त्यांचे मूल झोपल्यानंतर थोडे अस्वस्थ वाटू शकते. गर्भवती असताना अशा काही हालचालींमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. आज या ब्लॉग मधून आम्ही तुम्हाला या अस्वस्थतेची कारणे आणि त्यावर काय उपाय करता येतील याची माहिती देणार आहोत.

आपल्या काही हालचाली बाळाला झोपवतात 

आईने कोणत्याही प्रकारच्या हालचाली केल्या तरी जसे की, चालणे, वाकणे, उभे राहणे, बसणे यासारख्या दैनंदिन हालचाली ज्या आहेत त्यामुळे सुद्धा बाळाला झोप येते. या विशिष्ठ हालचालींचा परिणाम थेट बाळावर होतो आणि आई अंगाई गीत गायला लागल्यावर तर ते थेट एका तासात किमान तीस ते चाळीस मिनिटे झोपते. एकदा बाळा​ची झोप ​झाली की, त्यानंतर ते दिवसभर सक्रिय आणि आनंदी असते. जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी अंथरुणावर जाता तेव्हा तुमच्या सर्व हालचाली थांबलेल्या असतात तेव्हा बाळाला ​अशा शांततेची सवय नसते आणि ते जास्तीच हालचाली ​करायला लागते.​ ​हे एक कारण आहे की​. दिवसभर आपल्या आजूबाजूच्या अनिश्चिततेमुळे, हालचालींमुळे बाळ अतिशय सक्रिय असते.

तुमचा आवाज सुखकारक वाटतो. 

​दररोज तुम्ही कोणाशी ना कोणाशी सारखे बोलत असता - गाणी म्हण​त असता किंवा एखादी नुसती धून गुणगुणत असता. ​तुमच्या आवाजाची त्याला खूप लवकर सवय होते व ते तुमचा आणि तुमच्या अवतीभवती जे आवाज येतात ते ओळखायला लागते. ज्यावेळी तुम्ही झोपता तेव्हा बाळ तुमचा आवाज ऐकू शकत नाही, त्यामुळे जास्त सक्रिय होते.

 ​मध्यरात्री खाणे 

 

तिसऱ्या त्रैमासिकात तुमच्या बाळाचे आवाजाचे आणि वासाचे ज्ञान वाढलेले असते. मध्यरात्री जेव्हा तुम्ही काही तरी कुरकुरीत खाण्याची इच्छा करता तेव्हा त्या पदार्थाचे ज्ञान बाळाला ओळखणे जास्त सोपे असते. रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारचे कॅफिन बाळाला अधिक खाण्याकरिता उत्तेजन देते कारण आपण जे खात आहो​त ते अन्न आपल्या बाळाला थेट एमनिओटिक द्रवपदार्थ मार्गाद्वारे पाठवले जाते.

आता बाळाला झोपण्यासाठी प्रोत्साहित करणारे सोपे मार्ग बघूया.

शांत​तेचा आश्चर्यकारक मार्ग : तुमचे बाळ नेहमी तुमच्या हालचालींप्रमाणे​ ​वागत​ ​असते. दिवसभराच्या हालचालींनंतर त्यांना रात्री अस्वस्थता वाटते. यासाठी ​दिवसा ​ध्यान धारणा करायाला शिका यामुळे बा​ळाला शां​ततेची सवय होते आणि तरीही सक्रिय होते.

रात्रीचा दिनक्रम दिवसा : रात्रीप्रमाणे दिवसा​ ​नुसते झोपण्याच्या स्थितीत पडावे. यामुळे बाळ स्थिर राहण्याच्या दृष्टीने त्याची स्थिती सामान्य राहण्यास मदत होईल. यामुळे रात्रभर झोपण्यास अधिक वेळ मिळतो. तुमच्या बाळा​च्या तुमचा दिनक्रम अंगवळणी पडेपर्यंत असे दोनदा करावे.

 अस्वस्थता टाळा : ​तुम्हाला जर का एखाद्या वाईट स्वप्नामुळे किंवा त्रासदायक गादीमुळे झोपेत थोडीशी सुद्धा अस्वस्थता जाणवत असेल तर त्यामुळे तुमच्या बाळाची झोप लगेच बिघडते व जागे होते. त्यामुळे झोपताना होणाऱ्या या सगळ्या अस्वस्थतांच्या शक्यता नीट पडताळून बघा आणि त्या दूर करा जेणे करून तुम्हाला आणि पर्यायाने तुमच्या बाळाला एक सुखद झोप मिळेल.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon