Link copied!
Sign in / Sign up
1
Shares

प्रेग्नन्सीच्या काळात टॅटू काढणं सुरक्षित आहे का ?

दररोज लाखो लोक आपल्या शरीरावर टॅटू काढत असतात. हे टॅटू त्यांच्या शरीरावर कायमस्वरूपपी राहतात. त्यामुळे शरीरावर टॅटू काढत असताना त्याची डिझाईन आणि पॅटर्नचा विचार करावा. तसंच महिलांच्या बाबतीतही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. प्रेग्नन्सीच्या काळात महिलांनी टॅटू काढावा की नाही ? ते सुरक्षित आहे की नाही ? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे.तुम्हाला कदाचित वाटत असेल, की तुम्ही चांगल्या टॅटू पार्लरमध्ये टॅटू काढल्यामुळे ते सुरक्षित आहे. पण तरीही तरीही त्या टॅटूचा तुमच्या आरोग्यावर, शरीरावर परिणाम होऊ शकतो.

प्रेग्नन्सीच्या काळात टॅटू काढण्याचे संभाव्य धोके काय आहेत ?

१. इन्फेक्शन होण्याची शक्यता

प्रेग्नन्सीच्या काळात टॅटू काढण्याचा सर्वात मोठा धोका हा म्हणजे त्याचे इन्फेक्शन होणे होयं. त्यामुळे तुम्हाला हिपॅटिटीस बी आणि एचआयव्हीचा धोका निर्माण ङोऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर शक्यतो प्रेग्नन्सीनंतर टॅटू काढण्याचा सल्ल देतात.

२.  गर्भावर होणार परिणाम

 तुमच्या पोटातील गर्भावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही जर प्रेग्नन्सीच्या पहिल्या बारा आठवड्यांत टॅटू काढला, तर बाळाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो.

३.  टॅटूमुळे बाहेरील त्वचेवर होणारा परिणाम

महिला पाठीच्या खालच्या बाजूस टॅटू काढताना चिंतीत असतात. जर टॅटूचा त्वचेवर परिणा झाला, तर अवघडं होऊ शकतं.

४.  बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका

बाळाला दूध पाजत असताना तुमच्या टॅटूचे त्यालाही इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. त्याची शक्यता कमी असली, तरी बाळाच्या बाबतीत धोका पत्करणे कधीही चुकीचच ठरेल.

५.  टॅटूमुळे गर्भातील बाळाच्या वाढीवर कसा परिणाम होऊ शकतो ?

टॅटू काढत असताना वापरण्यात येणाऱ्या निडल्स खूप तीक्ष्ण असतात. त्यांचा पोटातील गर्भाला धक्का पोहोचू शकतो. बहुसंख्य महिलांनाही टॅटू काढत असताना खूप त्रास होतं असतो. तेवढंच नाही तर प्रेग्नन्ट महिलांना टॅटू काढणं दोकादायक असल्याचं टॅटू आर्टिस्टही मान्य करतात. प्रेग्नन्सीच्या काळात त्वचा खूप संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेची ओढाताण झाल्यास आणि ती चोळल्या गेल्यास खूप त्रास होतो. आईसाठी तो वेळ खूप त्रासदायक आणि वेदनादायी असतो. तसेच तुमच्या बऑडी टॅटूची शाई काही प्रमाणात शोषूण घेते. त्याचा गर्भाचील बाळावरही परिणाम होऊ शकतो.

डॉक्टरांना कधी दाखवावं ?

जर तुम्हाला खालील लक्षणं जाणवली, तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा

१. सर्दी

२. ताप

३. टॅटूमुळे लाल पुरळ आल्यास

४. पू निर्माण झाल्यास

५. मेहंदीच्या टॅटूजबाबत काय ?

प्रेग्नन्सीच्या काळात टॅटू काढावा की नाही याबाबत विवध मतभेद आहेत. पण या काळात नैसर्गिक मेहंदी काढण्यापासून तुम्हाला कुणीही रोखणार नाही.

कित्येक शतकांपासून आणि पिढ्यांपासून भारतात, इजिप्त आणि मिडल-इस्ट देशांमध्ये प्रेग्नन्सीच्या काळात तुमच्या पोटावर मेहंदी काढणं शुभ मानलं जातं. जेव्हा प्रेग्नन्ट महिलेच्या पोटाची पूर्ण वाढं होते, ते पूर्ण गोल होते, तेव्हा पोटावर मेहंदी काढली जाते. त्यामुळे बाळाचा जन्म सुरक्षित होतो व होणार बाळंही आनंदी राहतं असं मानलं जातं.

रेग्यूलर टॅटूजपेक्षा मेहंदी हा प्रकार आरोग्यदायी आणि तात्पुरता असल्यामुळे सुरक्षित मानला जातो. पण नैसर्गिक मेहंदीच्या नावाखाली विकल्या जाणारी काळी

मेहंदी वापरणं टाळा. ती नैसर्गिक नसते. त्यात अनेक रसायने वापरलेली असतात. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते.

मेहंदी थंड असते त्यामुळे ती सुद्धा वापरण्याआधी डॉक्ट्रांचा सल्ला अवश्य घ्या. 

प्रेग्नन्सीच्या काळात सुरक्षित टॅटू कसा काढावा ?

१. जर तुम्हाला प्रेग्नन्सीच्या काळात टॅटू काढायचाच असेल, तर तुम्हाला आणि तुमच्या बाळाला सुरक्षित ठेवून टॅटू काढण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या.

२. तर स्वच्छता असलेले टॅटू पार्लर शोधा. जिथे टॅटू काढण्यासाठी स्वतंत्र जागा असेल.

तिथे सुई निर्जंतुकीकरण मशीन आहे की नाही हे तपासा. आपल्याला इन्फेक्शनचा कोणताही धोका पत्करायचा नाहीये.

तसेच टॅटू काढताना नवी सुई वापरतात की नाही हे पाहा.

३. टॅटू काढत असताना टॅटू आर्टिस्टने रबराचे हातमोजे वापरले आहेत की नाही हे पाहा

जर टॅटू काढत असताना तुम्हाल काही त्रास झाल्यास प्रश्न विचारण्यास कचरू नका. चांगला पार्लरवाला तुमच्या प्रश्नांची नक्कीच उत्तर देईल.

४. जर टॅटू आर्टिस्टला तुमच्या प्रेग्नन्सीची माहिती नसेल, तर तसं त्याला स्पष्टपणे सांगा. तो तुम्हा वेगळ्या हाताळेल. जर तुम्हाला थोडीशीही अस्वस्थता जाणवली, तर टॅटू काढण्याचा विचार तेथेच सोडून द्या. कारण नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच सुरक्षा बाळगणे कधीही उत्तम.  

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon