Link copied!
Sign in / Sign up
72
Shares

गरोदर असताना सेक्स करण्याने येणारी भावनोत्कटता लाभदायक असते का?

        जी स्त्री आई होणार आहे. त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे की, गरोदर असताना सेक्स करणे हे त्यांच्या शरीरासाठी लाभदायक असणार आहे. (पण ह्यात गरोदर असताना केव्हा सेक्स करू नये ह्याबाबत लेख लिहला आहे तो वाचून घ्यावा. कारण काही विशिष्ट वेळी सेक्स करणे हे धोकादायक असते.) ह्यामुळे तुमचे नाते खूप घट्ट होते जोडीदाराला तुमच्या विषयी आदर तयार होतो. आणि तुमच्या शरीरालासुद्धा शेप मध्ये ठेवत असतो. आणि ह्यावेळी काही स्त्रिया समागम करायला घाबरत असतात कारण त्या ह्यावेळी होणाऱ्या ओर्गास्म(समागमाच्या वेळी शिगेस पोहचलेली उत्कटता) ह्या स्थितीला ती घाबरते. पण ही अवस्था तुम्हाला तुमच्या गर्भाला हानी पोहोचवत नसते.

१) मानसिक टेन्शनला दूर करतो

ही भावनोत्कटता तुम्हाला एका आनंदाच्या स्तरावर घेऊन जाते त्यामुळे तुम्ही कोणत्याही चिंता किंवा काळजीला दूर करत असते. ह्यामुळे तुम्हाला हलके आणि ऍक्टिव्ह वाटायला लागते. आणि झोपही खूप गाढ लागते. म्हणून ह्यामुळे तुम्हाला एक वेगळाच आनंदाची अनुभूती होती.

२) पोटाचा आकार काही प्रमाणात बदलतो

कधी कधी ज्यावेळी तुम्ही भावनोत्कटता स्थितीला पोहोचत असता त्यावेळी पोटातील मांसपेशी आणि गर्भाशय आकुंचन पावत असते. आणि त्यामुळे काही क्षणापर्यंत पोटाचा आकार हा थोडा तिरकस होऊन जातो पण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात. आणि हे खूप दुर्मिळ असते. ह्याविषयी आणखी ब्लॉग वाचू शकता. 

ह्याविषयी आणखी ब्लॉग वाचू शकता.  https://www.tinystep.in/blog/garodarpanachya-pahilya-trimasikat-sex-karane-dhokadayak

३) बाळाला ऍक्टिव्ह ठेवत असतो

बऱ्याचदा ज्यावेळी तुम्ही गरोदरपणात सेक्स करत असतात तेव्हा गर्भातल्या बाळाला जाग येऊन जाते आणि तो इकडे - तिकडे गर्भात इकडे - तिकडे होतो. म्हणजे तो सजग असतो.

४) तुमचे नाते आणखी घट्ट होते

सेक्स किंवा समागम ही गोष्ट दोन्हींना मनाने आणि शरीराने एकत्र बांधून ठेवत असते. त्यावेळी नवा सुगंध, आकर्षित करणारे शरीर, आणि नवऱ्याला ह्यावेळी पत्नीच्या सर्वच गोष्टी आवडायला लागतात. आणि ओर्गास्म च्या वेळी ऑक्सीटोसिन नावाचा हार्मोन रिलीज होत असतो. जो स्त्राव तुम्हाला व पतीच्या नात्याला अतूट बनवत असतो. ह्यामुळे दोन्हीत अतूट विश्वास, ओली सहानुभूती, आणि नेहमी काळजी घ्यायची भावना नवऱ्यात विकसित होत असते.

५) भावनोत्कटता

काही स्त्रियांचे ह्यावर असे म्हणणे आहे की, जे ओर्गास्म निघत असते त्यावेळी कधी कधी पेल्विक रिजन मधून रक्त निघायला लागते किंवा योनीतुन रक्तही निघते( ह्यासाठी गरोदरपणात सेक्स करावा का ?) हा लेख वाचून घ्यावा.

आणि जर गरोदरपणात सेक्स करताना त्रास होत असेल किंवा काही दुखत असेल तर समागम करू नये. आणि जर काही समस्या आलीच तर डॉक्टरांना भेटून घ्या. पण खूप रिस्क घेऊ नये. 

 गरोदरपणात समागम करण्याविषयी माहितीचा लेख :: https://www.tinystep.in/blog/garodarpanat-honari-samagmachee-ichha

आमचा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद ! आमच्या वाचकांसाठी आम्ही एक सवलत ऑफर देत आहोत त्यासाठी इथे क्लिक करा.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon