Link copied!
Sign in / Sign up
152
Shares

गरोदरपणात रडल्यामुळे बाळावर हा परिणाम होत असतो !


तुम्ही ज्यावेळी गरोदर असतात तेव्हा सर्वच लोक सांगतात की, तू आनंदी रहा, चिंता, दुःख करत बसू नको. गरोदरपणात हार्मोनल बदल होत असल्यामुळे खूप राग येतो आणि खूप इमोशनल होऊन जातात. मूडही सतत बदलत असतो. त्यावेळी बऱ्याच स्त्रिया खूप इमोशनल होऊन जातात आणि त्यामुळे त्या रडायलाच लागतात आणि त्या रडण्यामुळे तुमच्या बाळावर काय परिणाम होतो ते आपण बघणार आहोत. तुमच्या रडण्याने गर्भात बाळ नेमके काय करत असतो ह्या विषयी जाणून घेऊ.


      * जी गरोदर स्त्री गरोदरपणात थोड्या कारणांनी रडायला लागते आणि खूप चिंता करत बसते त्याचा नकारात्मक प्रभाव बाळावर पडतो. आणि एका रिसर्चनुसार काही गोष्टी लक्षात आल्या आहेत की, ह्या गोष्टीमुळे बाळ त्याच्या पुढच्या आयुष्यात लगेच दुखी होऊन जातो. किंवा कोणत्याही गोष्टींचा त्या बाळावर तात्काळ परिणाम व्हायला लागतो.

* अशी बाळ खूप रडके होऊन जातात त्यांच्यात न्यूनगंडाची भावना जास्त वाढीस लागते. कारण तुमच्या चिंता व उदास होण्याने गर्भात त्यांना ह्या अवस्थेची जाणीव होत असते. कारण इमोशन्स हे खूप प्रभावी असतात. म्हणून काही डॉक्टर व मानसोपचार तज्ञ् ह्याविषयी सल्ला देतात की, खूप आनंदी आणि उत्साही राहून गर्भारपण जाऊ द्या.

* बाळ जन्माला येते तेव्हा आई-वडिलांकडून काही गोष्टी आनुवंशिक घेऊन येत असते. आणि त्यात ९ महिण्याच्या गर्भारपणाचा खूप मोठा वाटा असतो. तुम्हाला अर्जुन - सुभद्रा ह्यांची अभिमन्यू गर्भात असतो ती गोष्ट माहिती असेलच. त्यामुळे बाळ गर्भात असताना शूर व्यक्तींची पुस्तके वाचायला लावतात जेणेकरून तुम्ही तो विचार करणार आणि तोच विचार गर्भातल्या बाळामध्ये रुजणार.

* गरोदरपणात उदास, दुखी, निराशा ह्या गोष्टी वाटणारच त्यात हार्मोन्स आणि ती अवस्था ह्यांचा दोढ असतो पण तुम्ही त्यात वाहवून जाऊ नका. त्यासाठी नवऱ्याशी खूप गप्पा मारा. मैत्रिणीशी बोलत रहा. आवडता चित्रपट पहा.

* गरोदर असताना तुम्ही तुमच्या बाळाला जन्मानंतर पेक्षा जास्त वळण लावू शकता. म्हणून ह्या दिवसात मनाला कमकुवत ठेऊन रडू नका. तर खूप आत्मविश्वास व सामर्थ्य असू द्या. सामर्थ्याची पूजा करा. ह्या सर्व गोष्टीचा बाळावर परिणाम होईल. तुमचे बाळ मनाने खूप ठाम असलेलं होईल. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon