Link copied!
Sign in / Sign up
75
Shares

गर्भावस्थेत पाठीवर झोपणे अशक्य का होते.

प्रत्येक व्यक्तीच्या झोपेच्या काही विशिष्ट सवयी असतात. काहींना पाठीवर तर काहींना पोटावर झोपायची सवय असते. ती सवय मोडून एका विशिष्ट अवस्थेत किंवा स्थितीत झोपणे नक्कीच अन्यायकारक वाटते. स्त्री जेव्हा गर्भवती असताना तेव्हा तिला जास्त झोप येते. पण गर्भवती असताना पाठीवर, पोटावर झोपता येत नाही. त्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. कारण झोपेची योग्य स्थिती कोणती असावी हेच समजत नाही.

गरोदर असणे ही स्त्रीच्या आयुष्यातील महत्वाची शारीरिक अवस्था आहे. काही स्त्रिया अगदी ९व्या महिन्यापर्यंत कार्यरत राहू शकतात मात्र काही वेळेस गर्भाची वाढ नीट न होणे किंवा उच्च रक्तदाब यामुळे काही गुंतागुंत निर्माण होते त्यामुळे गरोदर स्त्रीला सक्तीचा आराम करावा लागतो.

सर्व काही सुस्थितीत असताना गर्भवती स्त्री पाठीवर झोपू शकते ती काही विशिष्ट काळापर्यंत. म्हणजे पहिल्या तिमाही पर्यंत स्त्री पाठीवर आणि काही वेळा पोटावरही झोपू शकते. मात्र दुसऱ्या तिमाही पासून मात्र पाठीवर झोपणे अवघड होऊ लागते तसेच डॉक्टरही पाठीवर न झोपता एका कुशीवर म्हणजे एका अंगावर झोपण्याचा सल्ला देतात.

कुशीवर झोपण्याचा सल्ला का देण्यात येतो.

जसजसे महिने जातात गर्भाशयात गर्भ वाढतो आणि पोटाचा आकारही वाढतो. तसेच एकूण वजनही वाढते. त्यामुळे पाठीवर झोपल्यास वाढत्या गर्भाचे आणि पोटाचे वजन पाठीवर, आतड्यांवर आणि पायाकडील खालच्या बाजूने हृदयाला रक्तपुरवठा करणारी महानीला वाहिनी यांच्यावर पडते. त्यामुळे गर्भाशयाला होणारा रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो.

परिणाम

गर्भाशयाला रक्तपुरवठा कमी झाल्यास नाळेतून होणारे गर्भाचे पोषणातही अडथळे येऊ शकतात. काही वेळा रक्ताभिसरणास अडथळा निर्माण झाल्याने पाय सुजणे, पोट साफ न होणे असेही त्रास होऊ शकतात. तसेच रक्तदाब कमी देखील होऊ शकतो त्यामुळे गर्भवतीला चक्कर आल्यासराके वाटू शकते. अर्थात एखाद्या वेळी पाठीवर झोपल्यास असुरक्षित वाटावे असे काही नाही मात्र सातत्याने पाठीवर झोपणे नक्कीच त्रासदायक ठरु शकते.

कोणत्या स्थितीत झोपावे. 

गर्भवती असताना पुर्वीप्रमाणे पाठीवर किंवा पोटावर झोपता येणार नाही याची सर्वात पहिल्यांदा मनाला जाणीव करुन द्यावी. योग्य पद्धतीने झोपणे, उठणे, बसणे यासाठी स्वतःला प्रशिक्षित करावे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. एका अंगावर किंवा कुशीवर झोपत असताना पाठीमागे उशी लावावी किंवा पुढच्या बाजुला उशी ठेवावी जेणेकरून पुढे मागे वाकता येईल. गर्भवती असताना गर्भाच्या हालचालीमुळे अस्वस्थता येतेच त्यामुळे एका कुशीवर झोपताना दोन पायांच्या मधे उशी ठेवल्यास आरामशीर झोप लागू शकते.

कोणत्या बाजूला झोपावे

एका कुशीवर झोपताना डाव्या कुशीवर झोपावे की उजव्या कुशीवर हा प्रश्नही पडणे साहाजिक आहे. दुसèया आणि शेवटच्या म्हणजे तिसèया तिमाहीत शक्यतो डाव्या कुशीवर झोपणे शक्य असल्यास उत्तमच. त्यामुळे जास्तलरक्तपुरवठा होतो आणि नाळेला पोषक घटकांचा पुरवठा होतो. तसेच महानीलेवर दबाव येत नाही. तसेच मूत्राशयाच्या क्षमता वाढते त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये योग्य प्रकारे बाहेर टाकली जातात आणि पायावर, घोट्यावर आणि हातावर सुजेचे प्रमाण कमी होते. एखाद्या वेळी झोपताना एका कुशीवर झोपलेले असता आणि उठताना मात्र पाठ टेकलेल्या अवस्थेत उठलात तर qचता करु नका. कुशीवर वळा आणि झोपून जा. एखाद्या वेळी असे झाल्यास घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही.

अधिक आरामासाठी -

भरपूर उशांचा वापर- दोन पायांच्या मध्ये उशी ठेवा आणि पाठीच्या बाजूलाही उशी ठेवा. त्यामुळे अधिक आराम वाटेल.

गर्भवती स्त्रीला आराम मिळावा म्हणून पाच फूट लांबीची उशीदेखील मिळते.

उशी लावूनही आरामशीर वाटत नसेल तर आरामखुर्चीत झोपल्यासही आराम मिळू शकतो.

गर्भावस्थता जशी शेवटच्या टप्प्यावर येते तसे गर्भाशयातील बाळाच्या वाढीमुळे आईला अस्वस्थता येते, झोप लागत नाही असे त्रास होतात. अशा वेळी एका कुशीवर झोपल्यास हा त्रास कमी होतो. मात्र पाठीवर, पोटावर न झोपणे यासाठी आपल्या मनाला सतत बजावून सांगण्याचे काम नक्कीच करावे लागते. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
100%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon