Link copied!
Sign in / Sign up
9
Shares

प्रेग्नन्सीच्या काळात पपई खावी की नाही ?


डॉक्टर आणि पालकांमध्ये प्रेग्नन्सीच्या काळात पपई खाणे सुरक्षित आहे की नाही हा खूप चर्चेचा विषय असतो. जर पपई खाणे सुरक्षित असेल, तर ती कधी खावी ? त्यातही कच्ची पपई आणि पिकलेली पपई खाण्यात काय फरक आहे ? या काळात पपई खाणं खरचं लाभदायक आहे का ? तुमच्याही डोक्यात हे प्रश्न असतील. तुम्हाला अनेकांनी प्रेग्नन्सीच्या काळात पपईपासून पूर्णपणे दूर राहण्याचा सल्लाही दिला असेल. तर काही जणांनी प्रेग्नन्सीच्या काळात सकाळच्या उलट्या उमाशे यासाठी पपई मदत करू शकते, असंही सांगितलं असेल. त्या दोघांच्याही म्हणण्यात काही प्रमाणाच तथ्य आहे. त्याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊयात.

१) प्रेग्नन्सीच्या काळात कच्ची पपई असुरक्षित का ?

 कच्च्या पपईत लॅटेक्सच प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावतं. त्यामुळे त्रास होऊ शकतो. या काळात कच्ची पपई खाल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो. तसेच कच्च्या पपईत पॅपेन आणि पेप्सिनही असतं. त्यामुळे गर्भाची वाढ थांबू शकते. तसेच त्यामुळे गर्भाच्या पडद्यालाही इजा होऊ शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्रावही होऊ शकतो. ते होणाऱ्या बाळाला आणि आईलाही घातक ठरू शकतं. गर्भपातसुद्धा पपई खाण्याने होत असतो. त्यामुळे कच्ची पपई खाणं हानीकारक मानल्या जातं.

२) प्रेग्नन्सीच्या काळाच पिकलेली पपई खाणं सुरक्षित आहे ?

प्रेग्नन्सीच्या काळात पिकलेली पपई खाणं महिलांसाठी खूप लाभदायक आहे. पिकलेल्या पपईत बॅटा कॅरोटिन, पॉटॅशिअम, पायबर, फॉलिक अॅसिड तसेच व्हिटॅमीन A, B, C आणि E असते. तसेच ही पपई खाल्या पचन शक्तीही सुधारते. तसेच पिकलेल्या पपईमुळे सकाळच्या आजारपणात मदत होऊ शकते. प्रेग्नन्सीच्या काळात छातीत जळजळ होणे आणि बद्धकोष्ठता या समस्याही जाणवतात. पिकलेली पपईने त्या समस्याही दूर होऊ शकतात. तसेच प्रसुतीनंतर आईचे दुध वाढण्यासही पिकलेल्या पपईमुळ मदत होते.

त्यामुळे प्रेग्नन्सीच्या काळात पिकलेली पपई खाताना कोणतीही काळजी करण्याची आवश्यकता नाही. कच्च्या पपईच्या तुलनेत या पपईत हानीकारक ठरू शकणारे लॅटेक्स खूप कमी प्रमाणत असते. त्यामुळे शरिराला ते त्रासदायक ठरतं नाही. पण जर तुम्हाला लॅटेक्सची अॅलर्जी असेल, तर तुम्ही ही पपईही खाणे टाळा. तसेच जर यापुर्वीही तुमचा गर्भापात झाला असेल, तर पहिल्या तिमाहीत कोणत्याही प्रकारची पपई खाणे तुम्ही कटाक्षाने टाळायला हवं.

* दुकानात पिकेलेली पपई कशी निवडायची ?

 पपई पूर्णपणे पिकलेली आहे की नाही हे ओळखण्यासाठी पपईचा रंग, नरमपणा तसेच तिचा स्मेल या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. चांगल्या पिकलेल्या पपईचा रंग खूप गडद असतो. तसेच काळे डाग असलेली पपई घेणे टाळा. त्याऐवजी गडद लाल किंवा पिवळे डाग असलेली पपई निवडा. तसेच पपई दाबून पाहा. जर ती नरम असेल, तर ती पूर्णपणे पिकलेली असते.

महत्वाचे - तरीही पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon