Link copied!
Sign in / Sign up
12
Shares

गरोदरपणात पचनक्रियेत अडथळे येऊ नये म्हणून काही टिप्स

गरोदरपणात बहुतेक स्त्रियांना पचन आणि पचनसंस्थेविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमागे मागे अनेक कारणे असू शकतात. या पैकी काही पुढील प्रमाणे आहेत. जसे गरोदरपणात होण्याऱ्या संप्रेरकीय बदलामुळे किंवा गरोदरपणात तुमच्या बदललेल्या खाण्याच्या पद्धतीमुळे किंवा पोट जसे वाढत जाते त्याच्यामुळे आतड्यांवर येणाऱ्या दाबामुळे देखील अनेक स्त्रियांना पचनविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आणि त्या होऊ नये म्हणून काय करावे याबाबत माहिती या लेखाद्वारे देणार आहोत.

गरोदरपणात निर्माण होणाऱ्या पचनविषयक सर्वसाधारण समस्या

१. बद्धकोष्ठता

संप्रेकीय बदलांमुळे तसेच जसं-जसं बाळाची वाढ होते तसं-तसं आतड्यांवर येणाऱ्या दाबामुळे पचन मंद गतीने होते आणि हो मल पुढे सरकण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते.

२.छातीत जळजळणे आणि मळमळणे

शरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे तुमच्या पोटातील अन्ननलिका जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो. हा त्रास शेवटच्या तीन-चार महिन्यांत जास्त होतो. कारण पोटात जागा कमी उरल्याने खाल्लेले अन्न व जठररस वर अन्ननलिकेत घुसतात. आणि यामुळे छातीत जळजळणे आणि मळमळणे असे त्रास सुरु होतात. हा त्रास साधारणतः शेवटच्या तीन-चार महिन्यात जास्त होतो . त्यामुळे गरोदरपणात खाण्याच्याबाबत काळजी घेणे आवश्यक असते मसालेदार पदार्थ कमी खा.

गरोदरपणात पचन क्रिया योग्य राहण्यासाठी यासाठी काही टिप्स

१. योग्य प्रमाणात पाणी प्यावे

 तुम्हांला योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे महत्व आपण जाणतोच, तसेच गरोदरपणात पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने अन्नाचे योग्य पचन होते. तसेच शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण तुम्हांला ताजेतवाने ठेवते. साधारणतः दीड-दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते.

२. तंतुमय पदार्थांचे सेवन करा (फायबर युक्त पदार्थ)

गरोदरपणात पचनशक्ती मंदावते आणि तंतुमय पदार्थ हे अन्नचे पचन सुकर करते त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असेल याची काळजी घ्या. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिरव्या पालेभाज्या अश्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते.

३. जेवणाच्याबाबतीत काही टिप्स

थोड्य-थोड्या वेळाने थोडे थोडे खा. विशेषतः शेवटच्या त्रैमासिकात थोडे थोडे खावे एकदम पोट भरून खाऊ नये कारण या काळात पोटातील या अवयवांवरील दाब वाढलेला असतो आणि अश्यावेळी तुम्ही जर एकाच वेळी भरपेट खाल्ले तर पोटावरील ताण जास्त वाढतो. तसेच अन्न चावून-चावून खाल्याने अन्न पचण्यास मदत होते.

४. प्रकिया केलेलं अन्न म्हणजेच प्रोसेस्ड

प्रकिया केलेल्या अन्न पदार्थ्यात असणाऱ्या आरोग्यास हानिकारक असणारे घटक असतात आणि त्याच बरोबर या पदार्थाच्या सेवनाने पचन प्रकिया देखील मंदावते. तसेच या पदार्थात शरिराला काहीच पोषक घटक मिळत नाही याने फक्त पोट भरल्या सारखे होते आणि काही स्त्रियांना यामुळे मळमळणे आणि पोटाच्या तक्रारी वाढल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे या काळात पचायला हलके आणि सोप्पे आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ खाणे गरजेचे असते.

५. साध्या शारीरिक हालचाली चालू ठेवा

गरोदर असताना कार्यरत असणे गरजेचे असते, म्हणजे थोड्या वेळ चालणे घरातील साधी सोप्पी कामे करणे घरातल्या घरात फिरणे अश्या हालचाली दिवसभरात केल्याने अन्न पचण्यास मदत होते. एका जागेवर नुसते बसून राहिल्याने अन्नचे पचन मंद गतीने होते. आणि पचन विषयक इतर समस्या निर्माण होता.

६. मानसिक ताण-तणाव कमी करा  

तुम्ही गरोदर नसताना देखील मानसिक ताण-तणाव हा तुमच्या पचनावर नकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही गरोदर असता त्यावेळी तर हा परिणाम अधिक होतो. मानसिक ताण-तणाव असेल तर यामुळे झोप न येणे , छातीत जळजळणे किंवा मळमळणे या समस्या वाढतात तसेच या सगळ्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या काळात जास्त विचार करू नये आणि मानसिक ताण घेऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्हांला आवडणाऱ्या गोष्टी मध्ये वेळ घालवा. य दरम्यान तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही योग प्रकार करू शकता पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon