Link copied!
Sign in / Sign up
38
Shares

प्रेग्नन्सी : नवव्या महिन्यातील डायट प्लॅन


बाळाचा जन्म हा कोणत्याही मातेच्या दृष्टीने सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. पण त्यापुर्वीचा एक महिना हा मातेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. प्रेग्नंट असताना नवव्या महिन्यात तुम्हाला तुमचे शरीर खूप जड वाटायला लागते. या काळात तुम्ही विशेष काळजी घेणे आवश्यक असते. विशेषत: या काळात खाण्यापिण्याकडे योग्यप्रकारे लक्ष पुरवणे खूप आवश्यक असते.

प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यात कसा आहार हवा ?

- हा तुमच्या प्रेग्नन्सीचा महत्त्वाचा टप्पा आहे. तुमचा बाळाचा जवळपास पूर्णपणे विकास झालेला असतो. बाळाच्या फक्त मेंदू आणि फुफ्फूसांचा या महिन्यात विकास होत असतो. त्यामुळे या काळात आहार कसाही घेतला तरी चालेल हे मनातून काढून टाका. या काळात तुमची पचनसंस्था ही अतिशय संवेदनशील असते. त्यामुळे तुम्ही तुमचा डायट योग्यप्रकारे पाळणं अतिशय आवश्यक ठरते. असा असावा तुमचा डायट

-  फळं आणि भाज्या - दिवसातून कमीत कमी तीन वेळा फळं खावीत.

-  धान्य - सात ते दहा वेळा घ्यावेत.

-  दुधाचे पदार्थ - दिवसातून चार वेळा

-  प्रोटिन - तीन वेळा

-  पाणी - दिवसात कमीत कमी 2 लिटर पाणी प्यावे.

असा असावा डायट प्लॅन

१)  लोह - तुमचं आणि तुमचा बाळाची तब्येत चांगली राहण्यासाठी आहारात लोह खूप आवश्यक असते. त्यासाठी आहारात मासे, चिकन, अंडी, ब्रोकोली, वाटाणे, मसूर, पालक, सोयाबीन यांचा समावेश करावा. दिवसांत यापैकी कमीत कमी तीन गोष्टी तरी खाण्यात हव्यात.

२) फायबर - फळ, भाज्या, कडधान्य यांचा आहारात समावेश करावा. तसेच तुमच्या आहारत खजूर असणं खूप आवश्यक आहे. कारण खजूर हा फायबरचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे.

३) कॅल्शीअम - प्रेग्नन्सीच्या काळात तुमच्या शरिरातील कॅल्शियमचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. त्यासाठी कॅल्शिअम असलेली फळं खावीत. तसेच हिरव्या भाज्या, दूध आणि दूधाचे पदार्थ, बदाम आणि तीळ यांचा समावेश आहारात असावा.

४) व्हिटॅमीन सी - या काळात सायट्रस हा तुमच्या डायटचा खूप महत्त्वाचा भाग असतो. त्यासाठी संत्री, द्राक्षे यांचा आहारात समावेश असवा. तसेच बेरी, टोमॅटो, फुलकोबी आणि ब्रोकोली यांचाही आहारात समावेश असावा.

५) व्हिटॅमिन ए - पालक, गाजर आणि रताळे ही ए व्हिटॅमिन असेलेली फळभाज्या आहारात असाव्या.

६) फॉलिस अॅसिड असणारं अन्न - बाळाच्या जन्मातील दोष टाळण्यासाठी फॉलिक अॅसिडने समृद्ध असलेली हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, सोयाबीन, मटार आणि चणे हे पदार्थ आहारात असणं आवश्यक आहे. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon