Link copied!
Sign in / Sign up
22
Shares

गरोदरपणात सी-फूड खाणे सुरक्षित आहे का ?

गरोदर असतांना तुम्ही काय खात आहात याकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक ठरते. आईच्या आहारातूनच गर्भातील बाळाला आवश्यक ती जीवनसत्वे अणि पोषण मिळत असते. आईचा आहार बाळाच्या वाढीवर परिणाम करतो. आता अनेक मातांना एक महत्वाचा प्रश्न पडलेला असतो की गर्भारपणात सी-फूड खावे की नाही?

सि-फूड खाणे सुरक्षित आहे ना? यामुळे माझ्या बाळाच्या वाढीवर काही परिणाम होणार नाही ना ? तसे पहिले तर मासे खाल्ल्याने प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळते आणि सोबतच ओमेगा-३ मेदाम्ल ( फॅटी अॅसिड)यामध्ये असते. तुम्हाला आणि बाळाला गरज असणाऱ्या पोषक द्रव्यांचा स्त्रोत सि-फूड मध्ये आहे. त्यामुळे सि-फूड खाण्यास हरकत नाही. परंतु हे खाताना तुम्हाला खास दक्षता घ्यावी लागणार आहे.

गरोदरपणात सि-फूड खाताना खाली दिलेले काही नियम पाळा.
१. पूर्णपणे शिजलेले.

तुम्ही खात असलेले सि-फूड पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहे याची खात्री करून घ्या. अर्धवट शिजलेल्या सी फूड मध्ये बॅक्टेरिया आणि पॅरासाईट्स असू शकतात. ‘टेपवर्म’ सारखे पॅरासाईट्स तुमच्या अन्नातील तुम्हाला आणि बाळाला गरजेचे असणारे पोषकद्रव्ये कमी करू शकतात.

२. समुद्रातील मासे खाणे टाळा.

समुद्रातील मासे जसे, स्वोर्ड-फिश, किंग मेकरेल, यांचे सेवन करणे टाळा. या माश्यांमध्ये पार्याचे प्रमाण जास्त असते. तुम्ही या ऐवजी सॅर्डिन(पाडवा), साल्मन फिश ( रवस), अंचव्ही (अंखोल्या) अशा प्रकारचे मासे खाऊ शकता.

३. साठवलेले मासे.

कॅनमध्ये बंद असलेले, साठवलेले मासे यांचे सेवन करणे टाळा. नेहमीच ताजे मासे खा.

४. ओमेगा-३ मेदाम्ल असणारे अन्नपदार्थ.

ओमेगा-३ असणारे काही अन्नपदार्थ जसे की, जवस, अंडी, दही हे तुम्ही तुमच्या आहारात वाढवू शकता. मासे खात नसल्यास या अन्नपदार्थातून तुम्हाला हे पोषकद्रव्य मिळेल.

ताजे मासे ओळखण्यासाठी त्याची काही वैशिष्ट्ये :

१. चमकणारे, स्वच्छ डोळे.

२. जवळजवळ असणारे खवले.

३. मासा बोटाने दाबल्यास त्याचे दाबलेल्या जागेवरचे मास परत वर यायला हवे.

४. विकत घेतल्यावर २४-४८ तासांच्या आत त्यांचे सेवन करा.

मासे खाण्यापूर्वी त्यांचा दर्जा तपासणे गरजेचे आहे.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon