Link copied!
Sign in / Sign up
108
Shares

गरोदर असताना ९व्या महिन्यातील आहार काय असावा ? काय खावे काय खाऊ नये हे जाणून घ्या.

आनंदी होण्याची तुमची वेळ जवळ येत आहे. मग तो आनंदही साजरा करायला हवा. या आनंदा बरोबरच तुमच्यासमोर काही नवीन आव्हाने येतील. त्यांना समर्थपणे तुम्हाला तोंड द्यावे लागेल. तुम्हाला हे थोडेसे कठीण वाटेल पण, निसंशयपणे आपल्या बाळाला या जगात येण्यासाठीचा मार्ग जवळ आलेला असतो. गर्भधारणेचा हा अखेरचा, सर्वात रोमांचकारी भाग आहे. कारण, शेवटी आपल्या जीवनातील एका प्रवासी व्यक्तीस आपण भेटणार आहात.

आपल्या गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यात खाण्यासाठी काय?

आपल्या गर्भधारणेचा हा अंतिम टप्पा आहे. आणि आपले बाळ हे जवळजवळ पूर्ण विकसित आहे. चांगल्या सुदृढ बाळाची विकसित होण्याची गोष्ट म्हणजे बाळाचा मेंदू आणि फुफ्फुसांमधील परिपक्वता होय. जेव्हा आपण आपल्या आवडीचे पदार्थ खाण्याचा आनंद घेत असता. तेव्हा, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आता आपण काहीही खाऊ शकत नाही.

आपली पाचक प्रणाली अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे आपण कोणताही आहार घेण्यापूर्वी तो संतुलित आहार आहे की नाही. हे पाहायला हवे. तशी खात्री झाल्यावरच संतुलित आहारच घ्यावा.

फळे आणि भाजीपाला कमीतकमी दिवसातून तीन वेळा घ्यावीत.

तसेच धान्य आणि कडधान्ये ही खावे.

दिवसातून चार वेळा दुग्धजन्य पदार्थ.

दिवसातून तीन वेळा प्रथिने.

दिवसातून कमीत-कमी दोन लिटर पाणी प्यावे.

हा आहार घ्या

चांगले स्वच्छ आणि पौष्टिक अन्न आपले आरोग्य सुनिश्चित करेल. कारण, यामुळेच आपण आनंदी आणि सुरक्षित राहाल. त्याचबरोबर आपली गर्भधारणाही सुरक्षित होईल. जर, आपण चांगला उत्तम आहार घेत असाल तर, आपण बद्धकोष्ठता, अतिसार किंवा अम्लपित्त यांसारख्या आजारांना प्रतिकार करण्यास सक्षम असाल. हे फक्त आपल्या उत्तम गर्भधारणेसाठी नाही. तर, आपल्या बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी प्रोत्साहनही देईल.

यासाठी आपण पुढील आहार घ्यावा

१.लोह

तुमच्या आहारात लोहाचे चांगले प्रमाण असेल तर, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला चांगले आरोग्य लाभेल. त्यामुळे आहारात लोहाचे प्रमाण योग्य असावे. लोहाच्या पूर्ततेसाठी आपण मासे, चिकन, अंडी, अंड्यातील पिवळा बलक , पालक, सोयाबीन तसेच कोरडी फळे खावीत. जसे की मनुके, सुके अंजीर असा लोहयुक्त आहार कमीतकमी जेवणाच्या तिसऱ्या भागा एवढा घ्यावा.

२. तंतुमय पदार्थ

भाज्या, फळे, कडधान्य धान्यापासून तयार केलेल्या टोस किंवा पाव, खजूर तसेच मऊ खारका ही वापरू शकता. कारण, तंतूमय पदार्थांचा खजूर हा सर्वांत महत्त्वाचा स्रोत आहे. तसेच गर्भवती महिलांसाठी तर सर्वात उत्तम आहे.

३. कॅल्शियम

आपल्या गर्भधारणेच्या काळात कॅल्शियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे कॅल्शियम युक्त अन्न खाणे महत्त्वाचे आहे. तसेच आपण हिरव्या पालेभाज्या, दुधाचे पदार्थ, बदाम, जाडे भरडे पीठ, तीळ खायला हवेत. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळेल.

४. 'क' जीवनसत्व

लिंबूवर्गीय फळांमध्ये 'क' जीवनसत्त्व हे पुरेशा प्रमाणात आढळते. 'क' जीवनसत्त्वही थोड्याफार प्रमाणात लागणारे परंतु महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे तो आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. संत्री, द्राक्षे यासारखी लिंबूवर्गीय फळे तसेच टोमॅटो, फुलकोबी, ब्रोकोली ही खाऊ शकता. यातून आपल्याला निश्चितच 'क' जीवनसत्व मिळेल.

५. 'अ' जीवनसत्व

'अ' जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो.'अ' जीवनसत्व मिळवण्यासाठी आपण पालक, गाजर, तंतुमय पदार्थ, गोड बटाटे, आंबा, भोपळा ही भरपूर प्रमाणात खाऊ शकतात. कारण, हे अन्नपदार्थ 'अ'जीवनसत्त्वाचे समृध्द स्रोत आहेत. 'अ'जीवनसत्त्वामुळे दृष्टी चांगली राहते. हाडे मजबूत होतात. फुप्फुसे आणि रक्ताचे पोषण होते.

६.'ब' जीवनसत्व

'ब' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जन्मदोष निर्माण होतो. जन्मदोष टाळण्यासाठी आपण हिरव्या पालेभाज्या, पेंड, सोयाबीन, काळा वटाणा, चणे खायला हरकत नाही. याद्वारे आपल्याला 'ब' जीवनसत्व आवश्यक प्रमाणात मिळेल. 'ब'जीवनसत्त्व हे पेशींमध्ये ऊर्जा निर्मितीचे काम करते. 'ब' जीवनसत्त्वाचा अभाव असेल तर तोंड येते, तोंडावर फोड येतात. तसेच तोंडाच्या आतील भागात चट्टे निघतात. त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon