Link copied!
Sign in / Sign up
3
Shares

गरोदरपणात कारले खाणे सुरक्षित आहे का?

गरोदरपणात कारले खाणे सुरक्षित आहे का?

कारले ही एक अशी भाजी आहे, जी एकतर काही लोकांना भरपूर आवडते; तर काही लोकांना ती कडू चवीमुळे अजिबात आवडत नाही! गर्भारपणात आपल्याला वेगवेगळे पदार्थ खायच्या इच्छा होऊ लागतात आणि आपल्यातील काहींनी जरी अगोदर कधी कारले खाल्ले नसले; तरी ते खायची इच्छा होऊ लागते. पण गरोदरपणात ते खाणे सुरक्षित आहे का? ज्याप्रमाणे गरोदरपणात पपई आणि अननस खावे का नको, हा जसा प्रश्न आहे; त्याचप्रमाणे कारले खाण्याचाही प्रश्‍न अनेक काळापासून अनुत्तरित आहे.
भारतामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधतो- करेला, पवक्का, काकराकया, हगालाकायी, इ. इंग्रजीमध्ये याला बिटर गार्ड वा बिटर मेलन असे म्हणतात. या भाजीमध्ये पुष्कळ पोषकद्रव्ये आहेत; म्हणूनच अनेक लोकांना ती भाजी आवडत नसली तरी ते खातात. पण काही गर्भवती महिलांनी इशारा दिलाय की, या भाजीमुळे गर्भाशयातील रक्तस्राव होतो आणि बाकी अनेक दुष्परिणाम होतात.

कारल्याचे फायदे

सर्वप्रथम कारणे तुमच्यासाठी वाईट कसे ठरू शकते, हे जाणण्याआधी ते तुमच्यासाठी किती गुणकारी आहे; हे जाणून घेऊ. ते फोलेटचा एक उत्तम स्त्रोत आहे, जे गर्भवती महिलांसाठी आवश्यक असते. ते अर्भकाला मज्जासंस्थेच्या नलिकेतील दोषांपासून सुरक्षित ठेवते. ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि गर्भधारणेतील मधुमेहाची शक्यता पुष्कळअंशी कमी करते. हा एक तंतुमय पदार्थ आहे, जो पचनामध्ये मदत करतो आणि यामुळे तुम्हाला पोट भरल्याची जाणीव होते, ज्यामुळे तुम्ही बाकीचे शरीरास अयोग्य असे पदार्थ खात नाही. हे तुमच्या रोगप्रतिकारक संस्थेसाठी देखील उपयुक्त असते; कारण यामध्ये जीवनसत्वे, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशिअम, मॅंगेनीज आणि झिंक असते आणि यामुळे तुम्ही गर्भारपणात आजारी पडत नाही.

कारले खाण्याचे संभाव्य धोके

कोणत्याही गोष्टीप्रमाणेच अतिप्रमाणात कारणे खाणेही वाईटच असते! कारले आणि त्याच्या बियांचे अतिप्रमाणात सेवन हे अनियोजित प्रसूतीला कारणीभूत ठरते. याच्या कडू चवीमुळे पोटात आणि गर्भाशयात कंपनेदेखील निर्माण होऊ शकतात. तसेच भरपूर कारल्याच्या सेवनामुळे अनेक पचनाचे विकार होऊ शकतात. पण या सर्व दुष्परिणामांचा अर्थ असा नव्हे की, तुम्ही हे खाणे पूर्णपणे बंद केले पाहिजे! याचे संतुलित प्रमाणातच सेवन केलेले बरे.

तुम्ही कारले कधी खाल्ले पाहिजे?

गर्भारपणात कारले खाण्याचे काही सौम्य दुष्परिणाम होतातच. म्हणून पहिल्या त्रैमासिकात ते खाणे टाळा. एकदा तुम्ही दुसऱ्या त्रैमासिकात प्रवेश केला की, मग ते खाणे तुम्ही चालू करू शकता. कारण कारले खाण्याचे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी भरपूर फायदे आहेत. म्हणून जर तुम्हाला कारले खायची खुप इच्छा होत असेल; तर ती तुमच्या दुसऱ्या त्रैमासिकासाठी राखून ठेवा. मग तुम्ही बाकी भाज्यांबरोबरच कारल्याच्या वेगवेगळ्या भाज्या आजमावू शकता.

कारले खाणे हे कितपत सुरक्षित आहे?

लक्षात घेण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्ही गरोदरपणाच्या पहिले कधी कारले खाल्ले नसेल; तर आता त्याची सुरुवात करू नका. जर तुम्ही ते नेहमीच खायचे टाळले असेल; तर आतादेखील टाळलेलेच बरे! कारण यावेळी तुमचे शरीर ते हाताळू शकेल की नाही, याची खात्री देता येत नाही. ज्यांनी ते अगोदर खाल्ले आहे, त्यांनी जर त्यांच्या डॉक्टरांचा यावर काही आक्षेप नसेल; तर नेहमीप्रमाणे ते खाऊ शकतात. जर तुम्हाला आरोग्यविषयक समस्या असतील वा अगोदर गर्भपात झाला असेल; तर कारले खाण्याअगोदर डॉक्टरांना विचारणे शहाणपणाचे ठरते. तुम्ही सामान्यतः खाता त्यापेक्षा जास्त कारले खात नाही ना याचे भान ठेवा. दररोज पातळ भाजीच्या वा  सॅलडच्या रूपात एक कप कारले खाणे योग्य ठरते. तुम्ही जास्तीत जास्त दोन कप कारले घेऊ शकता; पण ते एकाचवेळी नव्हे! तूम्ही ते एकदा दुपारी आणि एकदा रात्री घेऊ शकता.

टीप-ज्यांना कारल्याची ऍलर्जी आहे किंवा कारले  खाल्याने कधी त्रास जाणवला असेल किंवा जाणवत असेल तर कारले खु नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खाऊ नये 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon