Link copied!
Sign in / Sign up
4
Shares

गरोदरपणात इन्स्टंट नूडल्स खाणे योग्य आहे की नाही?

 


गर्भवती असताना हमखास खारट आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते, ते स्वाभाविक देखील आहे. गर्भवती स्त्रिया त्याच त्याच खाण्याला खूप लवकर कंटाळतात आणि त्यांना भूक पण सारखी लागते, त्यामुळेच त्या कधी कधी काही तरी लवकर तयार होणारे असे पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात जसे की नूडल्स किंवा सूप्स. खरंच त्यांनी पौष्टीक खाण्याला प्राधान्य द्यायला हवे, पण कधी असे मसालेदार पदार्थ खाणे देखील गरजेचे असते.

जेव्हा कोणतीही गोष्ट गर्भधारणेशी निगडीत असते तेव्हा आपल्या डोक्यात निरनिराळ्या शंकांचे डोम उठतात - तयार नूडल्स खाणे योग्य आहे की नाही? तुम्ही गर्भवती नसताना देखील तयार नूडल्स खाणे आरोग्यासाठी चांगले नसते त्यामुळे ते तुमच्या बाळाच्या दृष्टीने देखील अयोग्यच आहे. तुमचा आहार आणि जीवशैलीचा परिणाम तुमच्या गर्भात वाढत असलेल्या बाळावर होत असतो. त्यामुळे तुम्ही काय खाता याची कायम दक्षता घ्यायला हवी.

तयार नूडल्स क्वचित खाण्याने काही नुकसान होत नाही. तुम्ही जर का त्या सारख्या वरच्यावर खात असाल तर मात्र नक्की धोका संभवतो. आज आम्ही तुम्हाला तुम्ही तयार नूडल्स का खाऊ नये यामागची काय-काय कारणे आहेत हे सांगणार आहोत.

पोषक मूल्य 

नूडल्समुळे तुमच्या जिभेची भूक पूर्ण होते आणि तुमची भूक देखील भागते पण त्यात तुमच्या शरीराला (आणि तुमच्या बाळाला) आवश्यक असलेली पोषकमूल्य काहीच नसतात. जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने ज्या जेवणात नसतात ते तुम्ही सारखे खाल्ले तर तुमच्या बाळाला देखील ही पोषक मूल्ये मिळत नाहीत.

विशेष टीप 

तुमच्या तयार नूडल्स मध्ये भाज्या आणि उकडलेले अंड घाला त्यामुळे ते पौष्टिक होतील.

सोडियम (मीठ) 

तयार नूडल्समध्ये खूप प्रमाणात सोडियम (मीठ) असते जे गर्भवती मातांच्या आरोग्यास हानिकारक असते. हे गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये नुकसान कारक ठरू शकते.

विशेष टीप - तयार नूडल्स करताना त्याच्या बरोबर येणारा मसाला सगळा वापरू नका, अर्धाच वापरा. तुम्ही तुमच्या स्वादानुसार मसाले आणि मिठाचे योग्य प्रमाण ठरवून घरगुती मसाला देखील तयार करून वापरू शकता.

मैदा 

बऱ्याच लोकप्रिय तयार नूडल्समध्ये मैद्याचे प्रमाण जास्ती असते. तो पचनासाठी चांगला नसतो आणि त्यात पोषणमूल्ये देखील नसतात. शक्यतो गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या नूडल्सला प्राधान्य द्या.

एमएसजी (मोनोसोडियम ग्लुटामेट) 

 हे तयार नूडल्स जास्ती काळ टिकावेत यासाठी त्यात घातले जाते आणि यामुळे त्याची चव देखील बदलते. गर्भवती असताना एमएसजीचे जास्ती प्रमाण धोकादायक असते म्हणून नूडल्स वरचेवर खाणे टाळावे, आणि ज्यात एमएसजी आहे असे सगळे पदारथाचे सेवन करू नये.

वरील सर्व टिप्स तुम्ही पाळल्या तर तुम्ही नूडल्स नक्कीच चविष्ठ आणि पोषक बनवू शकाल. नूडल्स तयार करताना हे बदल जरी केलेत तरी याच्या आहारी जाऊ नका आणि त्या कधी तरी नाष्ट्याला खाव्यात. 

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon