Link copied!
Sign in / Sign up
15
Shares

गरोदरपणात ह्या गोष्टी तुमच्यासोबत घडल्या असतील किंवा घडणार !

                गर्भारपणात गर्भाशयात वाढत असलेल्या गर्भाला सामावून घेण्यासाठी शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. या बदलांमध्ये अनेक बाह्य आणि शरीरांतर्गत बदल समाविष्ट असतात जसे बाह्य स्वरुपातील दिसणारे बदल म्हणजे वाढणारे वजन, मोठे झालेले स्तन तर अंतर्गत बदलात बाळाच्या पोषणासाठी तयार होणारी वार किंवा नाळ. या सर्वांमुळे शरीराची ठेवण बदलते आणि ते गर्भवती राहण्यापुर्वी जशी होते तसेच पूर्वपदावर येण्यासाठी शरीर जादूचे बनलेले नाही.

१) गुबगुबीतपणा

गर्भवती असताना वजन वाढणे अगदीच नैसर्गिक आहे. आपल्या शरीरात जे काही बदल होत असतात त्यामुळे वजन वाढते. त्या वजनाबाबत काही हालचाल केली नाही तर मात्र ते तसेच राहाते. त्यासाठी गर्भारपणाच्या तिसऱ्या तिमाही पासून हळूहळू (जास्त काळजीपूर्वक आणि स्वतःला जास्त न रेटता)व्यायाम करायला सुरुवात करावी. अर्थात अनेक स्त्रिया असा पद्धतीने व्यायाम करत नसल्याने त्याचे हात आणि शरीराचे इतर भाग थुलथुलीत दिसू लागतात. केवळ शरीर थुलथुलीत दिसते असे नव्हे तर अति प्रमाणात संप्रेरके स्रवल्यामुळे सांधे अशक्त किंवा दुबळे होतात त्यामुळे बाळाला घेऊन इकडे तिकडे करणे अवघड होते. त्यामुळेच गर्भवती असताना आणि नंतरही शरीराची विशेष काळजी घ्यावी.

२) सूज

गर्भारपणा दरम्यान संप्रेरके किंवा हार्मोन्स अतिप्रमाणात स्रवतात आणि रक्तप्रवाह, बोटे, तळवे, घोटा आणि मनगटे यांना सूज येऊ लागते. शरीरात अतिप्रमाणात वाहणारे द्रव पदार्थ जेव्हा पूर्ववत नैसर्गिक प्रमाणात वाहतील तेव्हा अंगावरची सूजही नैसर्गिकरित्या कमी होईल.

3) केस गळणे

केसाच्या वाढीचा एक विशिष्ट असा आकृतीबंध असतो असे म्हणूया ज्यामध्ये एक आरामाचा काळ असतो त्या दरम्यान केस गळतात. स्त्री जेव्हा गर्भवती होते तेव्हा संप्रेरकांची किंवा हार्मोन्सची निर्मिती केसाच्या वाढीच्या आकृतीबंधावर परिणाम होतो ज्यामुळे केसाचा हा काळ थांबतो. प्रसुतीनंतर किंवा बाळाच्या जन्मानंतर शरीरातील हार्मोन्सची पातळी पूर्ववत होण्यास, स्थिर होण्यास सुरुवात होते तेव्हा केसाची हे चक्रही पूर्ववत होऊ लागते. अधिकाधिक काळ कमीत कमी केस गळावेत असे वाटते पण गर्भारपणात केस गळतातच त्याला आत्ता सुरुवात झाली.

४) गर्भाशय

बाळाच्या जन्मानंतर ताबडतोब गर्भाशयाचा आकार कमी होत नाही किंवा ते अगदी चपटे होत नाही. गर्भारपणा दरम्यान गर्भाला वाढवण्यासाठी गर्भाशयाचा आकार खूप जास्त वाढतो. बाळाचा जन्म होईपर्यंत त्याचा आकार तसाच राहतो आणि त्यानंतर तो कमी कमी होऊ लागतो. बाळाच्या जन्मानंतर गर्भाशय पूर्ववत होईपर्यंत सुमारे दोन आठवड्यांचा काळ जावा लागतो. तरीही गर्भारपणाच्या काळात वजन वाढलेले असतेच त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर गर्भवती होण्यापुर्वी जितके पोट होते त्याहून ते मोठे वाटत असेल तर ते कमी करण्यासाठी काही ना काही केले पाहिजे.

५) नाजूकपणा

अत्यंत महत्त्वाची गोष्ट : आपल्या शरीराच्या अगदी लहानश्या तोंडातून एक मानवी आयुष्य जगात आणलेले असते. त्यामुळे गर्भाशय मुखाचा भाग दुखरा आणि थोडा हळवा, नाजूक होणार हे नैसर्गिक आहे. सर्वसाधारणपणे योनीमार्गाचा भाग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ आठवड्यांचा कालावधी लागतो पण तिथे थोडासा त्रास जाणवू शकतो विशेषतः लैंगिक संबंधांमध्ये थोडा त्रास जाणवू शकतो. ते पुन्हा पूर्ववत होण्यास काही कालावधी लागेल पण त्याची चिंता नको ते नैसर्गिकच आहे. बाळाच्या जन्मानंतर काही दिवस पाळीसारखा रक्तस्राव होतो आणि गर्भाशयातील अस्तरही गळून पडत असते. हा रक्तस्राव म्हणजे गर्भाच्या काळजीसाठी तयार झालेले गर्भाशयातील अस्तर असते ज्याची भविष्यात गरज नाही.

६) पोट बिघडणे

गर्भवती असताना जाणवलेली बद्धकोष्ठता किंवा असंयमित शौचभावना ही बाळाच्या जन्मानंतरही कदाचित जाणवत असेल. गर्भवती असताना काही स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास उत्पन्न होऊ शकतो ज्यामुळे शौचाला त्रास होतो. तसेच याच काळात मूत्रमार्गाचा संसर्गही खूप पटकन होऊ शकतो. त्यामुळेही शौचाला जाणे आणि मूत्र विसर्जन करणे वेदनादायी ठरू शकते. त्यासाठी तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात खावेत आणि अर्थातच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७) स्ट्रेच मार्क किंवा त्वचा ताणणे

गर्भारपणात शरीर फुगते त्यामुळे त्वचा ताणली जाऊन त्याचे व्रण निर्माण होतात. हे व्रण किंवा स्ट्रेच मार्क नको असतील तर त्यावर प्रतिबंध हा एकच उपाय आहे. आपली त्वचा ओलसर राहील याची काळजी घेऊन आणि गर्भारपणात त्वचेला भरपूर मॉश्चरायझर लावून स्ट्रेच माक्र्स टाळता येतील. त्वचेला तेलाने किंवा लोशन ने मालिश करून त्वचा कोमल मुलायम राहते त्यामुळे स्ट्रेच माक्र्स किंवा ताणल्याचे व्रण राहात नाहीत. वारंवार प्रयत्नांनतरही स्ट्रेच माक्र्स किंवा ताणल्याचे व्रण अटळ आहेत पण ते ठीकच आहे कारण आपल्यापैकी प्रत्येकीला ते असतात. हे व्रण किंवा माक्र्स पूर्णपणे जाऊ शकत नाहीत पण ते फिकट होऊ शकतात त्यासाठी आपल्या त्वचेची सतत काळजी घ्यायला हवी.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Dear Mommy,

We hope you enjoyed reading our article. Thank you for your continued love, support and trust in Tinystep. If you are new here, welcome to Tinystep!

We have a great opportunity for you. You can EARN up to Rs 10,000/- every month right in the comfort of your own HOME. Sounds interesting? Fill in this form and we will call you.

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon