Link copied!
Sign in / Sign up
8
Shares

गरोदरपणात होणारी समागमाची इच्छा सर्वसामान्य लक्षण आहे ना ?


स्त्रीच्या गरोदरपणात काळात समागम करण्याच्या इच्छेत बदल हो असतो. हे बदल नैसर्गिक आणि सर्वसामान्य आहे. या काळात प्रत्येक स्त्रीची सामान्यपणे समागम करण्याची इच्छा बदलत जाते. हे बदल स्त्रीच्या हार्मोन्समधील बदलामुळे घडतात. विशेष स्त्रीच्या गर्भधारणेच्या काळात सुरूवातीला सेक्सची इच्छा कमी असते. या अवस्थेत स्त्रीची वारंवार इच्छा बदलत राहते. पण या काळात समागम करताना काळजी घ्यावी लागते. कधी, किती आणि कसा हा पश्न पडतो. कदाचीत तुम्हालाही पडला असेल, या प्रश्नांची उत्तरे आम्ही या लेखातुन देण्याचा प्रयत्न करत आहोत.

पहिले त्रैमासिकच्या 

गरोदरपणाचा हा पहिला टप्पा असते. स्त्रीला गर्भावस्थेची जाणीव होते. या पहिल्या तीन महिन्यात सहसा स्त्रीला समागम करण्याची इच्छा वाटत नाही. तिची इच्छा सहसा नसते पण समागमाचा आनंदही मनसोक्तपणे दोघांनाही घ्यायचा असतो. या काळात स्त्रीला शारिरीक आणि मानसिक थकवा जाणवतो. या काळात चीडचीड, मळमळ होण्याची शक्यता असते. या पहिल्या तीन महिन्याच्या काळात स्त्रीला सेक्स करणे नको वाटते आणि  पोटात वाढणाऱ्या बाळाला धोकाही पोहचू शकते. ह्यामुळे ती घाबरते. या तिमाहीच्या शेवटी स्त्रीच्या हार्मोन्समध्ये बदल होतात होते तेव्हा मात्र डॉक्ट्रांच्या सल्ल्याने सेक्स करू शकता.

दुसरे त्रैमासिक :

दुसऱ्या तीन महिन्याच्या काळात स्त्रीच्या गर्भात मोठ्या प्रमाणात बदल होते. उदा: योनिमार्गातील रक्त आणि रक्तवाहिन्या स्त्रीचा वाढत्या वक्रात बदल होतो. या दुसऱ्या तीन महिन्याच्या काळात लैंगिकतेचा सुख घेता येतो. गर्भधारणेच्या काळात सेक्सचा आनंद घेता येते पण काही काळजी घेवूनच. या काळात मुल जन्माला येत नाही आणि गर्भधारणेची शक्यताही नसते. समागम करण्याची ही  योग्य वेळ आहे.

तिसरे त्रैमासिक

या तीन महिन्याच्या काळात स्त्रीच्या गर्भात आणि स्त्रीमध्ये मोठा बदल होते. यामुळे सेक्स करण्याची इच्छा कमी होते. स्त्रीला तिच्या आणि तिच्या बाळाची विशेष काळजी घ्यावी लागते. यामुळे स्त्रीला या काळात समागम करण्याचा कल कमी होतो. स्त्रीचे वाढते पोट, पाठीचा त्रास, वाढतं वजनामुळे स्त्री सेक्ससाठी इच्छुक नसते. मळमळ होण्याची शक्यता असते. ह्या वेळी पोटातील बाळाची काळजी पुर्णपणे घेण्याच्या तयारीत असते. या शेवटच्या तीन महिन्यात गर्भवती स्त्री, फक्त तिच्या बाळाचाच विचार करत असते. 

स्त्रीच्या 9 महिन्याच्या काळात खूप काही बदल घडत असतात. विशेष समागम संदर्भात ती उदास होते कारण बाळावरच तीचा जीव जडला असतो. जर तुम्ही या टप्यातुन जात असाल तर काळजी करू नका. तर ह्यावेळी पती आणि पत्नीमध्ये संवाद होऊ द्या.  मनमोकळ्या पणाने गप्पा मारा. एकमेकांना समजुन घ्या,  हे सगळ करत असताना नवरा आणि बायको मध्ये चीडचीड होत असेल तर होऊ द्या थोडीफार भांडण होईल पण नवऱ्याने लक्षात ठेवावे की, सर्व ती बाळासाठीच करत आहे. म्हणून नवऱ्याने तिचा राग व चीड-चीड समजून घ्यावी. 

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon