Link copied!
Sign in / Sign up
10
Shares

स्त्रियांमधली डोकेदुखीची ३ प्रमुख कारणे आणि त्यावरील उपाय

 

एक अशी गोष्ट जी निरोगी आणि तंदुरुस्त व्यक्तींनाही त्रास देऊ शकते आणि त्यांची उर्जा कमी करू शकते ती म्हणजे - डोकेदुखी. केवळ होणाऱ्या वेदनाच नव्हे तर डोकेदुखी आणि अर्धशिशीमुळे (माईग्रेन) नकळत विनाकारण चिडचिड होते आणि मूड देखील खराब होतो. त्यामुळेच हे अतिशय गरजेचे आहे की यामागील कारण आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्यावरील उपचार देखील अमलात आणायला हवेत.

तुमच्यासाठी आम्ही या डोकेदुखीची काही प्रमुख करणे आणि त्यांच्यावरील उपचार पद्धती इथे दिल्या आहेत.

न्यूरोट्रांसमीटर असंतुलनसिरोटोनिन , डोपामाईन आणि जीएबीए हे मानवी मेंदूचे महत्वाचे संदेशवाहक आहेत. त्यांना चेतापारेषक असे म्हणतात. संशोधनाद्वारे हे सिद्ध झाले आहे की या न्यूरोट्रांसमीटर्सच्या प्रमाणात कमतरता आल्यास अर्धशिशी म्हणजेच माईग्रेन होतो. सिरोटोनिन आणि डोपामाईन यांच्या पातळीतील घट मानसिक परिणाम घडवते जसे की राग येणे, निराशा येणे, हृद्यात धडधड होणे, असमान ठोके, ओब्सेसिव –कम्पल्सिव विचार मनात येणे इ.
या न्यूरोट्रांसमीटर्सच्या पातळीत समानता ठेवणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी सर्वात फायद्याचे आहेत अमिनो अॅसिड्स. हे न्यूरोट्रांसमीटर्स अमिनो अॅसिड्स पासून बनलेले असतात. त्यामुळे अमिनो अॅसिड्सचे सेवन तुम्हाला फायद्याचे ठरेल.

संप्रेरकांचे असंतुलनअनेक स्त्रियांना अर्धशीशीचा त्रास हा ठराविक काळात होतो म्हणजे महिन्याच्या काही दिवसां दरम्यान किंवा ठराविक कालावधीनंतर डोके दुखणे. याचे कारण प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन या संप्रेरकांच्या असंतुलनामध्ये आहे. या सम्प्रेराकांमधील असंतुलन हे माईग्रेनचे कारण असू शकते. यांची पातळी कमी असणे किंवा जास्त असणे दोन्हीमुळे डोके दुखते.
पण यासाठी कोणत्याही हार्मोनल संतुलन प्रकारच्या औषधी घेण्यापूर्वी तुम्ही तुमची ‘DUTCH Test‘ (Dried Urine Test for Comprehensive Harmones) करून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमच्या शरीरातील संप्रेरकांची योग्य पातळी कळेल. त्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घ्या.

लिव्हर फेज असंतुलनतुमचे डोके एखादा विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा एखादा वास आल्यानंतरच दुखते का ? याचे कारण असू शकते की तुम्हाला लिव्हर फेज असंतुलनाची समस्या आहे. आपले यकृत विशिष्ट प्रकारे बनलेले असते हे २ पातळीत निर्विषीकरण करते. पातळी (फेज) १ मध्ये जे निर्वीषीकरण होते त्याचा उर्वरित भाग पातळी २ मध्ये निर्वीषीकरणासाठी जातो. यात पातळी १ मधले उरलेले ते टॉक्सिन्स पातळी २ मध्ये जातात. पण या दोन पातळीच्या टप्प्यांमध्ये संतुलन नसेल तर पातळी २ मध्ये निर्वीषीकरण न झालेले टॉक्सिन्स शरीरात जातात आणि पसरतात. ज्यामुळे तुमचे शरीर विशिष्ट प्रकारच्या पदार्थांना किंवा वासा प्रती संवेदनशील बनते.
आपण यात पातळी १ पेक्षा पातळी २ च्या कामासाठी वेळ दिला तर ती पूर्वपदावर येऊन काम करू शकते आणि ही संवेदनशीलता कमी होऊ शकते. पातळी २ च्या निर्वीषीकरण प्रक्रियेला आधारासाठी अमिनो अॅसिडचे सेवन फायदेशीर ठरते तसेच आहारात आणि राहणीमानात योग्य ते बदल केल्यास फरक पडेल.   Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon