Link copied!
Sign in / Sign up
31
Shares

गरोदर आहात ? मग गरोदरपणात हे ६ प्रश्न डॉक्टरांना नक्की विचारा..

जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल किंवा या आधी देखील तुमचे बाळंतपण झाले असेल तरी प्रत्येक गरोदर स्त्रीने या गोष्टी डॉक्टरांना विचारणे आवश्यक असतात. इतरांचा अनुभव माहिती असणे चांगलेच असते परंतु प्रत्येक स्त्रीची तब्बेतच काय तर प्रत्येक गरोदरपण वेगळे असते पहिल्या गरोदरपणात आलेले अनुभव दुसऱ्यावेळी येतीलच असे नाही. तसेच पहिले बाळंतपण सुखरूप झाले असेल तर दुसऱ्या बाळंतपणमध्ये समस्या उद्भवणार नाहीत असे नाही. त्यामुळे काही गोष्टींबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आहोत.

१. “मी कोणत्या प्रकारचा व्यायाम करू शकते ?”

गरोदरपणात निरोगी रहाणे आई आणि बाळाच्या वाढीसाठी चांगले आहे. सहसा गर्भवती महिलांना व्यायाम म्हणून चालणे, योगा आणि पोहणे या गोष्टी सुचवण्यात येतात. परंतु कोणत्याही प्रकारचा व्यायाम करण्यापूर्वी तुमची स्थिती समजून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करावे. गरोदरपणातील व्यायाम हा निरोगी ठेवण्याव्यतिरिक्त, व्यायाम गर्भधारणा संबंधित वेदना आणि पेटके कमी करण्यास मदत करते.परंतु कोणत्याही प्रकारचं ताण आणणारा व्यायाम करू नका आणि डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

२. “कोणते पदार्थ खाणे टाळावे ?”

गरोदर असताना खाण्याच्या बाबत जागरूक असणे अत्यंत गरजेचे असते. अनेक जण अनेक प्रकारचे पदार्थ आणि फळे खाण्याचा सल्ला या दरम्यान देतात परंतु नेहमीच्या आहार व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे पदार्थ आणि रोज आहारातील पदार्थच्या सेवनाचे प्रमाण हे तुम्ही डॉक्टरकडून जाणून घेणे आवश्यक असते. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या बाळावर, गर्भवर होणार असतो, साधरणतः या काळात पौष्टिक आणि संतुलित आहार खाण्याचा सल्ला देतात. तसेच जंक आणि उष्ण गुणधर्म असलेले पदार्थाचे सेवन टाळण्याचा सल्ला देण्यात येतो.

३. “ गरोदरपणतील जोडीदाराशी शाररिक जवळीक 

गर्भधारणे दरम्यानच्या समागमाबाबत डॉक्टरांना विचाराणे अत्यंत आवश्यक असते. गरोदरपणात समागम करणे हे नैसर्गिक आणि सुरक्षित असते. बहुतांश वेळी या काळात दुसऱ्या त्रैमासिकात समागम करण्याची इच्छा वाढण्याची शक्यता असते.पण काही प्रकरणात असे आढळून आले आहे कि चुकीच्या पद्धतीने समागम केल्यामुळे किंवा योग्य ती काळजी न घेता समागम केल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे गर्भपात किंवा वेळेपूर्वी म्हणजेच प्रिम्यच्युर जन्म झाला. याचे प्रमाण कमी असले तरी उगाच काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून याबाबत डॉक्टरांना विचारून त्यांचा सल्ला घेणे कधीही उत्तम

४. “गरोदर असताना काही लसी घेणे आवश्यक असते का ?”

गर्भवती महिलांसाठी काही लसी त्यांच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या आरोग्यासाठी देण्यात येतात. या लसी कधी आणि कश्या घ्याव्या याबाबत डॉक्टरांना विचारणे आवश्यक असते. ज्यामुळे पुढील समस्या निर्माण होणार नाहीत.

५. “ प्रसूती आणि प्रसूती कळा ”

प्रसूती कशी असते त्याबाबतची माहिती जाणून घेणे तसेच प्रसूती कळाबाबतची माहिती, त्या काळातील वेदनाना कसे सामोरे जायचे, तसेच घरी कळा सुरु झाल्यावर काय करायचे.याबाबत माहिती डॉक्टरांकडून करून घेणे आवश्यक असते.

६. “सी-सेक्शन प्रसुतीचे काही संकेत आहेत का ?”

गरोदरपणात काही गुंतागुत किंवा काही समस्या असतील तर किंवा इतर काही कारणांमुळे सी-सेक्शन प्रसूती करणे आवश्यक असते. याबाबत काही शक्यता तुमच्याबाबतीत आहेत का ? असल्यास प्रसूती कशी होईल याबाबत विचारणा करा.तसेच सी-सेक्शन प्रसूती करावी लागणार असल्यास त्याबाबत कश्याप्रकारे शाररिक आणि मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. याची माहिती करून घेणे आवश्यक असते.  

हॅलो मॉम्स... आम्ही तुमच्यासाठी एक खुशखबर घेऊन घेऊन आलो आहोत.

Tinystep ने तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी नैसर्गिक घटक असलेले फ्लोर क्लिनर लॉन्च केले आहे. जे तुम्हांला आणि तुमच्या बाळाला जंतूंपासून आणि हानिकारक केमीकल्स पासून दूर ठेवेल. चला तर मग जंतूंना आणि हानिकारक केमिकल्सला नाही म्हणूया... हे फ्लोर क्लिनर वापरून बघा आणि तुमची प्रतिक्रिया आम्हांला कळवा. तुम्ही हे फ्लोर क्लिनर इथे ऑर्डर करू शकता

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon