Link copied!
Sign in / Sign up
122
Shares

गरोदरपणात घरातली कामे करायची का ?


 गरोदर राहिल्यावर पुढचा प्रश्न येतो की, आता घरातली कामे करता येईल का ? कपडे धुता येतील का? जिना चढायला काही समस्या नाही ना ? वजन उचलता येणार नाही मग किती वजनाचे वजन उचलायचे ? असे कितीतरी प्रश्न येत असतात. ह्या दिवसात खूप काही छान गोष्टी घडत असतात जसे की, वजन उचलते असे समजल्यावर नवरा धावत - पळत येतो आणि वजन स्वतः घेऊन सांगतो. कशाला इतका त्रास घेते. तसेच सासू,सासरा म्हणजे कुटुंबातली सर्वच सदस्य खूप काळजी घेत असतात. आणि खरंच तितकी काळजी घ्यावी लागतेच. तेव्हा ह्या दिवसांमध्ये कोणते वजन उचलू नये. आणि घरातली कोणती कामे करू नयेत. आणि तुम्ही जरी माहेरी आला असाल तरीही “बाईला काम करावेच लागते तेव्हा तिथेही अशी कामे करू नयेत. नाहीतर काही स्त्रिया माहेरी जास्त काम करतात. आणि सासरी कमी. जाऊ द्या ते आपण ब्लॉगकडे येऊ, तर ह्या दिवसात कोणती कामे करू नयेत.

         १) कोणतेही जास्त वजन असलेली वस्तू उचलू नये. त्यात किती वजन असायला हवे ते सांगता येणार नाही कारण गर्भात बाळ असल्याने पुढच्या बाजूला खूप जोर पडत असतो. आणि त्यामुळे त्याचा ताण अगोदरच पाठीवर पडत असतो. आणि बाळाचेही वजन वाढत असल्याने पूर्ण शरीर वजनयुक्त असते. आणि त्यात तुम्ही वजन उचलण्याचा विचार करत असाल तर काय म्हणावे लागेल?

२) ह्यामध्ये किराणाचा समान, सिलिंडर सरकावणे, पाण्याची बादली, सोफा सरकवणे ह्या सर्व गोष्टी बिलकुल करायच्या नाहीत. व त्याचबरोबर कपडे धुताना जर खूप खाली वाकावे लागत असेल किंवा खूप पाठीला ताण पडत असेल तर कपडे धुवू नका. जिना चढण्याचा खूपच कमी प्रयत्न करा आणि चढताना रेलिंगला किंवा भिंतीला धरून चला जर दम लागला किंवा चक्कर आली तर तुम्ही पडणार नाहीत.

घरातली स्वछता करताना

३) जर तुम्ही केमिकल वापरत असाल तर मास्क लावून घेत चला. नाहीतर काही नैसर्गिक साधनांचा वापर स्वच्छता करताना करावा. जसे की, सिरका, बेकिंग सोडा इ. केमिकल मुळे उलटी वैगरे होऊ शकते.

४) घरात कुत्रा किंवा मांजर पाळली असेल तर तिचे मल तुम्ही साफ करायचे नाही. त्याचबरोबर धूळ पासून लांब राहावे.

५) स्वयंपाक करताना कापण्याचे काम असेल तर उभे राहून कापण्यापेक्षा बसून कापावे. आणि कांदा कापताना रडू येईलच. ह्यामध्ये जर तुम्हाला स्वयंपाक करावा लागत असेल तर आस लागेल म्हणून दूरच असावे. ह्यासाठी तुमच्या नवऱ्याची किंवा सासूची मदत घ्यावी.

६) ह्या दिवसांमध्ये नवऱ्याची खूप मदत घ्यावी. आणी त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगून त्यांची मदत घ्यावी. जेणेकरून तुम्हाला खूप त्रास होणार नाही. कारण ह्या दिवसांची कोणतीही रिस्क तुम्हाला व बाळाला आयुष्यभरासाठी त्रास देऊ शकते.

७) काहीवेळा खूप वजन उचलल्यामुळे रक्तस्त्राव किंवा ऍम्नीऑटिक द्रवाची पिशवी फटू शकते. किंवा काही वेळा खूप काही जोखमीचे झालेच तर तारीखेआधीच डिलिव्हरी होऊ शकते. तेव्हा गरोदरपणात ह्या सर्व गोष्टींची दक्षता घ्यावी.

Tinystep Baby-Safe Natural Toxin-Free Floor Cleaner

Click here for the best in baby advice
What do you think?
0%
Wow!
0%
Like
0%
Not bad
0%
What?
scroll up icon